Vidhansabha 2024 |सर्वात तरुण ८ आमदार

Vidhansabha 2024 सर्वात तरुण ८ आमदार आपला भारत देश म्हणजे एक प्रगत राष्ट्र जे सर्वच क्षेत्रात प्रगल्भ विचाराने जगणार ,वावरणारे हे राष्ट्र ,या देशात जसे सण उत्सव साजरे केले जातात तसेच या देशात जनतेचे प्रतिनिधी निवडताना सुद्धा अगदी सणाप्रमाणे उत्साहात निवडणुकीतून निवडले जातात.देशात १९५२ मध्ये पहिली निवडणूक पार पडली त्यानंतर बऱ्याच निवडणुका झाल्या यातून अनेक कणखर नेते या देशाला मिळत गेले , ज्यांनी देश घडवण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आपण पहिले ,त्याकाळी देशात झालेली विविध क्षेत्रातील क्रांती आज देशाला कणखर उभे राहण्यास मदत करत आहे .देशात ९० च्या दशकात विविध प्रकारचे तंत्रद्यान उदयास येवू लागले तसे देशाने नवीन कात टाकण्याचे काम केले ,प्रगती झपाट्याने वाढू लागली .या सर्व विकासामागे वेळोवेळी देशाला मिळालेले , जनतेने पाठवलेले प्रतिनिधी , कणखर विचाराचे नेते यांचा यात सिंहाचा वाटा आहेच पण त्यावेळी त्यांनी घेतलेले निर्णय आज देशाला महासत्तेकडे घेऊन चालले आहेत असे आपण सध्या पाहतोय . नुकतीच म्हणजे २०२४ च्या सुरवातीला भारत देशात लोकसभा निवडणूक पार पडली यात भाजप प्रणीत NDA ने मजबूत संख्याबळ मिळवत पुन्हा देशाच्या सिंहासनावर विराजमान होण्याचा मिळवला.अगदी तसेच वर्षाच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र राज्याची निवडणूक पार पडली ,अपेक्षेप्रमाणे म्हणजेच ज्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने अनेक योजना जनतेच्या भल्यासाठी दिल्या त्या सरकारला जनतेने मोठ्या संख्याबळाने पुन्हा सत्तेवर बसवले.याच निवडणुकी दरम्यान अनेक तरुण आमदार या ठिकाणी निवडून आले , त्यातील अनेक जायंट किलर सुद्धा ठरलेले आपण पाहिले ,आज आपण यातीलच काही तरुण आमदार मंडळींनी बद्दल जाणून घेणार आहोत.

Maharashtra Vidhansabha 2024 |सर्वात तरुण ८ आमदार

महाराष्ट्र विधानसभा मध्ये निवडून आलेले सर्वात तरुण ८ आमदार पुढीलप्रमाणे –

आमदारांचे नाव पक्ष विधानसभा क्षेत्र
रोहित रावसाहेब(आर.आर) पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार)तासगाव कवठेमहांकाळ ,सांगली
विक्रमसिंह बबनराव पाचपुते भाजप श्रीगोंदा ,अहिल्यानगर
वरुण सतीश सरदेसाई शिवसेना (उद्धव ठाकरे)बांद्रा पुर्व , मुंबई
श्रीजया अशोक चव्हाण भाजप भोकर, नांदेड
आदित्य उद्धव ठाकरे शिवसेना (उद्धव ठाकरे )वरळी ,मुंबई
राघवेंद्र मनोहर पाटील भाजप धुळे ग्रामीण
बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख शेकाप सांगोला,सोलापूर
करण संजय देवतळे भाजप वारोरा ,चंद्रपूर

१.रोहित रावसाहेब(आर. आर) पाटील

रोहित रावसाहेब पाटील म्हणजे नव्या दमाचे ,नव्या युगाचे आर आरचं असं म्हंटल तर वावग ठरणार नाही कारण त्या आर आर नावाला अजरामर केले ते या नवख्या तरुण आमदाराच्या वडिलाने ,जिल्हा परिषद पासून केलेली सुरवात राज्याच्या उपमुख्यमंत्री या पदापर्यंत घेऊन गेलेले तासगाव सांगली मधून तब्बल ६ वेळा विधानसभेवर निवडून गेलेले रावसाहेब पाटील अर्थात आर आर आबा ,अतिशय नम्र ,साधेपणा असलेला हा माणुस राज्यातील जनतेच्या काळजावर नाव कोरून गेला.२०१५ मध्ये वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला ,त्यावेळी आताचे रोहित पाटील अवघ्या १५ वर्षाचे होते ,जनतेचा असणारा आधार गेला अशी भावना लोकांच्या मनात त्यावेळी आली ,अतिशय कठीण असणारा हा काळ आबांच्या परिवाराने धाडसाने सामोरे जाऊन समर्थपणे पेलला. रिक्त झालेल्या जागेवर आबांच्या सुविद्य पत्नी सुमनताई पाटील निवडणूकीला सामोरे गेल्या. २०२५ म्हणजेच निवडणुकांचे वर्ष लोकसभा झाली आता विधानसभाही झाली ,यात नुकतीच वयाची पंचविशी ओलांडलेल्या रोहित पाटील यांना राष्ट्रवादीने (शरद पवार गट ) उमेदवारी दिली ,गेली ७/८ वर्ष आई आमदार असताना रोहित पवार यांनी केलेला प्रचंड दौरा ,जनतेचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद यामुळे ते यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून येतीलच याच आशेने पक्षाने त्यांना तिकीट देवू केले .आबांचा नम्रपणा साधेपणा रोहित पाटलांच्या मध्ये असल्याने , मतदारांमध्ये यामुळे अजुनच सहानुभूती मिळत राहिली .समोर प्रतिस्पर्धी पण काय कमी अनुभवांचा नव्हता . याच जोरावर अगदी कमी वेळात रोहित पाटील यांनी आर आर आबांचा असलेला तासगावचा गड प्रचंड मताधिक्याने राखलाच शिवाय देशात सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला.maharashtra vidhansabha 2024 मध्ये निवडून आलेले रोहित पाटील यांचे वय सध्या २५ वर्ष आहे .

उमेदवारांचे नाव मिळालेली मत पक्ष
रोहित पाटील (विजयी)१२८४०३ राष्ट्रवादी (शरद पवार )
संजय पाटील १००७५९ राष्ट्रवादी (अजित पवार)
विजयी उमेदवाराचे मताधिक्य -२७६४४

२.विक्रमसिंह बबनराव पाचपुते

श्री .विक्रमसिंह पाचपुते यांची पार्श्वभूमी सांगायची म्हणजे ते अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावचे.तस पाहिलं तर त्यांच्या कुटुंबात राजकीय वलय आले ते १९७५ नंतरच , विक्रमसिंह पाचपुते यांचे वडील म्हणजे नगर जिल्ह्यातील सुसंस्कृत , नम्र राजकारणी म्हणून ज्यांना ओळ्खल जात असे राज्याचे माजी मंत्री श्री बबनराव पाचपुते यांचे ते चिरंजीव, विक्रमसिंह हे उच्चशिक्षित ,अभ्यासु एक व्हिजन असलेला तरुण युवा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात गेली कित्येक वर्ष झाले परिचित आहेत .गेली ५ वर्षापासून पक्षाच्या संघटनेचे अतिशय तळमळीने काम करणारा कार्यकर्ता ते विधानसभा २०२४ मधील सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांनी ओळख मिळवलेली आपण पाहिलीच आहे .नुकत्याच झालेल्या विधानसभेसाठी त्यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळाली आई वडिलांचा आशिर्वाद घेवून बाहेर पडलेले विक्रमसिंह हे अगदी कमी वेळात जनतेच्या गळ्यातील ताईत होऊ लागले होतेच शिवाय वडिलांप्रमाणे समाजाचा ध्यास घेवून नम्रपणे ‘माणस माणुसकीने ,प्रेमाने कशी जपावी‘ हे अगदी कमी वेळात त्यांना उमजलं होतच .त्याचमुळे समोर प्रचंड अनुभव असलेले राजकारणी असताना कित्येक वर्ष श्रीगोंद्याचा गड अबाधीत राखणारे पाचपुते कुटुंब .याही वेळेला गड राखेल यात कोणाला शंका नव्हतीच .अगदी कमी वेळात उल्लेखनीय कामगिरी करणारे विक्रमसिंह हे महाराष्ट्र भर चर्चेत आले ते त्यांच्या प्रचंड मताधिक्याच्या विजयाने ,अन विजयानंतर दिलेल्या विकासात्मक भाषणामुळे .भाजप पक्ष केडर बेस पक्ष असल्याने अभ्यासू चेहऱ्यांना त्यांनी नक्कीच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आपण पाहिल्या आहेतच त्यामुळे Vidhansabha 2024 मधील अभ्यासू असलेले तरुण आमदार विक्रमसिंह भविष्यात मोठ्या जबाबदारीवर काम करताना आपल्याला दिसतीलचं.

उमेदवारांचे नाव मिळालेली मते पक्ष
विक्रमसिंह पाचपुते (विजयी)९९८२० भाजप
राहुल जगताप ६२६६४ अपक्ष
सौ अनुराधा नागवडे ५४१५१ शिवसेना (उबाठा)
विजयी उमेदवाराचे मताधिक्य – ३७१५६ मत

३.वरूण सतीश सरदेसाई

वरुण सरदेसाई म्हणजे मजबुत राजकीय पार्श्वभूमी लाभलेला युवा कार्यकर्ता/नेता म्हणतल तर वावगे ठरणार नाही .वरुण हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे ते मावस बंधु . हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे शिवसेना या वटवृक्षाचे नंतर अनेक छोट्या मोठ्या सामाजिक संस्था , संघटना निर्माण होत गेल्या त्यातीलच एक म्हणजे शिवसेना युवासेना ,युवासेनेची स्थापना सन २०११ मध्ये स्थापना झाली ,युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात वरून सरदेसाई यांनी आपले काम चालू केले त्यावेळी नवखे असेलेले वरूण सरदेसाई अल्पावधीतच आंदोलन करणे ,कार्यकर्त्यांना बळ देणे याच्या माध्यमातून ते प्रभावी ठरू लागले होते याच प्रभावी कामामुळे त्यांना शिवसेना उबाठा गटाकडून विधानसभा २०२४ ची उमेदवारी बांद्रा पूर्व मधून त्यांना मिळाली ,अत्त्यंत High profile असणारा हा मतदारसंघ जिंकणे एवढ सोप्पही नव्ह्त.पण तरीही कामाच्या जोरावर , प्रचंड जनसंपर्क असल्याने त्यांनी हा मुंबई तील प्रभावी बांद्रा पूर्वचा गड चांगल्या मताधिक्याने जिंकलाच अन या विधानसभेत एक तरुण आमदार म्हणून होण्याचा मन त्यांना मिळाला.

उमेदवारांचे नाव मिळालेली मत पक्ष
वरूण सरदेसाई (विजयी)५७७०८ शिवसेना (उबाठा )
झीशान सिद्दिकी ४६३४३ राष्ट्रवादी (अजित पवार )
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -११३६५ मत

४.श्रीजया अशोक चव्हाण

गेली काही दशकं भोकर मतदारसंघ म्हणजे कॉंग्रेसच ,या भोकर मधून कित्येक दशकं चव्हाण कुटुंबाचा वरचष्मा पाहायला मिळत होता ,या ठिकाणी माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नंतर हा गड त्यांचे चिरंजीव राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांनी राखला होता,पण नुकतेच ते भाजपा कडून राज्यसभेवर निवडून गेल्यामुळे या ठिकाणी विधानसभा २०२४ साठी कोणाला संधी द्यावी म्हणून पक्ष विचार करत होता ,गड कॉंग्रेसचा कि चव्हाणांचा ठरविण्याची ही वेळ आली होती . भाजपने यावेळी अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी दिली. अनेक वर्ष समाजकारणाचा अनुभव शिवाय उच्चशिक्षित वकील असलेल्या या श्रीजया यांची हीच उमेदवारी मिळवण्यासाठी जमेची बाजू ठरली होती. वडिल राज्याचे मुख्यमंत्री राहिले असल्याने जनतेपर्यत पोहचायला श्रीजया यांना जास्त मेहनत घ्यावी लागली नाही .तीन पिढ्यांचा अनुभव असलेले हे कुटुंब त्यामुळे श्रीजया यांचा सहज सोप्पा सुकर झालेला होता .त्या भोकर मधून विक्रमी मतांनी निवडून आल्याच, शिवाय निवडून आलेल्या तरुण आमदारांमध्ये त्यांचेही नाव जोडले गेले.

उमेदवारांचे नाव मिळालेली मत पक्ष
श्रीजया अशोक चव्हाण (विजयी)१३३१८७ भाजप
तिरुपती कदम ८२६३६ कॉंग्रेस
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -५०५५१ मत

५.आदित्य उद्धव ठाकरे

मराठी माणसांच्या न्य्याय हक्कासाठी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले आदित्य ठाकरे यावेळी मराठी माणसांचा मुंबईतील गड म्हणजेच वरळी भागातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत ,युवासेनेची स्थापना २०११ मध्ये स्थापन केल्यानंतर त्याचे प्रमुख म्हणून त्यांनी करायला सुरवात केली राज्यात तळागाळात युवासेनेच्या माध्यमातून प्रचंड काम त्यांनी केले .याच्या माध्यमातून तरुणाचा ओढ शिवसेनेकडे वळवलेले आपण पाहिला.नुकत्याच विधानसभा २०२४ साठी त्यांना वारली मधून पक्षाने तिकीट दिले नवीन चिन्ह असताना सुधा त्यांनी हा गड पुन्हा खेचून आणला. यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी सुद्धा तगडे होते , शिवसेना (एकनाथ शिंदे )यांच्या पक्षाकडून मिलिंद देवरा तसेच मनसे कडून संदीप देशपांडे उभे होते .अतितटीच्या लढतीत आदित्य ठाकरे बाजी मारत हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणला आणि पुन्हा एक तरुण आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा बहुमान मिळवला.

उमेदवाराचे नावं मिळालेली मत पक्ष
आदित्य ठाकरे (विजयी)६३३२४ शिवसेना(उबाठा)
मिलिंद देवरा ५४५२३शिवसेना (एकनाथ शिंदे)
संदीप देशपांडे १९३६७ मनसे
विजयी उमेदवारांचे मताधिक्य – ८८०१ मत

६.राघवेंद्र मनोहर पाटील

भाजपला उत्तर महराष्ट्रात मिळालेला प्रभावी दमदार तरुण चेहरा म्हणजे राघवेंद्र उर्फ राम पाटील ,आजोबांच्या पावलावर पूल टाकत ,अगदी वयाच्या १८ व्या वर्षापासून राजकरणाला समाजकारणाला सुरवात करणारा हा तरुण आज राज्यातील तरुण आमदारांपैकी एक आमदार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय.लहानपणापसून घरात राजकारण पाहिलेला हा युवक , आजोबांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपासून ते ४ वेळा विधानसभा आमदार होण्याचा केलेला विक्रम हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकीय वाटचाल करणाऱ्या या तरुण आमदारासमोर आव्हानही काही सोप्पी नव्हती .लोकांमध्ये जनसंपर्क आजोबांची पुण्याई ,पक्षासोबत कित्येक वर्षाची निष्ठा यामुळेच समोर कुणाल पाटील याचं कॉंग्रेस कडून असलेल आव्हान त्यांनी अगदी सहज पेलवून टाकलेले आपल्याला दिसले.धुळे ग्रामीणच्या जनतेने या नवख्या दमदार तरुणाला प्रचंड मताधिक्य देत विधानसभेत तरुण ,सुशिक्षित आमदार म्हणून पोहचवलच.

उमेदवारांचे नाव मिळालेली मताधिक्य पक्ष
राघवेंद्र पाटील (विजयी)१७०३९८ भाजप
कुणाल पाटील १०४०७८ कॉंग्रेस
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -६६३२० मत

७.बाबासाहेब आण्णासाहेब पाटील –

“काय झाडी , काय डोंगर , काय हाटील ,समद कसं एकदम ओक्के” हा डायलॉग तर सर्व भारताला परिचितचं. इथल्या मतदार संघाच्या नावापेक्षा इथल्या आमदाराची चर्चा भारत भर असते हे गेले ३ वर्ष झाले आपण पाहतोय ,हि चर्चा ज्यांच्या माध्यमातून घडली ते शहाजी पाटील हे याच सांगोला मतदारसंघातील ,२०१९ साली शेकापचा गड असलेला हा मतदारसंघ भेदुन त्यांनी विजय संपादन केलेला होता ,कित्येक वर्षाची असणारी शेकापची सत्ता त्यांनी उलथवून टाकली होती ,प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बापुना यावेळी तिरंगी लढतीचे नुकसान झाले ,त्यांचे एकेकाळचे सोबती असलेले दिपक साळुंके शिवसेना (उबाठा ) कडून लढल्याने यावेळी बापुना एका नवख्या उमेदवारांकडून पराभव स्विकारावा लागला .गेली ५० दशक ज्यांनी हा गड मजबूत ठेवला ते गणपतराव देशमुख यांचा हा मतदारसंघ , आता त्यांच्याच नातवाने पुन्हा तो गड शेकापला मिळवून देवून पुन्हा एकदा या पक्षाला उमेद दिली अन प्रचंड मताधिक्याने निवडून आलेला हा एक तरुण आमदार बाबासाहेब विधासभेत सामान्य लोकांचा आवाज बुलंद करताना आपल्याला दिसेल.

उमेदवारांचे नाव मिळालेली मत पक्ष
बाबासाहेब देशमुख (विजयी)११६२५६ शेतकरी कामगार पक्ष
शहाजी पाटील ९०८७० शिवसेना (एकनाथ शिंदे )
दिपक साळुंके ५०९६२ शिवसेना (उबाठा )
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -२५३८६ मत

८. करण संजय देवतळे –

गेली ३० वर्ष ज्यांनी वरोरा मतदार संघावर मजबूत पकड ठेवली असे स्व . संजय देवतळे यांचा हा मतदारसंघ ,उत्तम आणि विकासाच्या जोरावर त्यान तब्बल ३० वर्ष आमदार म्हणून इथे आपली सत्ता मजबूत ठेवली होती ,३ वर्षापूर्वी आलेल्या कोरोनामध्ये श्री संजय देवतळे यांचे दुखद निधन झाले. तीन पिढ्यांनी वाढवलेला मतदारसंघ देवतळे यांच्या मृत्युनंतर पोरके झाले होते ,अश्यातच विधानसभा २०२४ मध्ये लोकांच्या इच्छाखातर पक्षाने देवतळे यांचे चिरंजीव करण यांना उमेदवारी देण्याचे ठरवले, उच्च शिक्षित , प्रचंड जनाधार असलेले देवतळे कुटुंब हि उमेदवारी मिळण्याचे कारण ठरले . अगदी कमी वेळात या वरोरा मतदार संघातून त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवलाच शिवाय सर्वात तरुण आमदारांमध्ये ते अग्रस्थानी आहेत .

उमेदवारांचे नाव मिळालेली मत पक्ष
करण देवतळे (विजयी )६५१७० भाजप
प्रवीण काकडे २५०४८ कॉंग्रेस
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -४०१२२ मत

विधानसभा २०२४ मध्ये निवडून आलेल्या इतर उमेदवारांचे निकाल पाहण्यसाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा

http://results.eci.gov.in
https://www.eci.gov.in/

सरकारच्या इतर योजनांच्या माहितीसाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा

योजनांचे नाव संकेतस्थळ
लाडकी बहिण योजना २०२५ https://smartsahyadri.com/mukhyamantri-mazi-ladki-bahin-yojna-2024/
महिलांसाठी ६ योजना २०२५ https://shorturl.at/sYbKR
प्रधानमंत्री आयुषमान भारत योजनाhttps://shorturl.at/jRPsY
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी( PM Kisan ) https://shorturl.at/edLoj
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना https://shorturl.at/niZP9
आमचे अधिकृत संकेतस्थळ https://smartsahyadri.com/