Teerth Darshan Yojna|महाराष्ट्र तीर्थ दर्शन योजना 2025

Teerth Darshan Yojna |महाराष्ट्र तीर्थ दर्शन योजना 2025 : महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मिळणार तीर्थ दर्शनाचा लाभ .

Teerth Darshan म्हणजे देशातील सर्वानांच कुठेतरी फिरायला अथवा देवधर्म करावा असे वाटत असते ,विशेष करून जेष्ठ नागरिकांना याबद्दल फार उत्सुकता असते .परंतु काहींची आर्थिक परिस्थिती अथवा प्रवासाबद्दल अपुर्ण माहिती यामुळे बऱ्याच मंडळीना यापासून वंचित राहवे लागते अथवा हे Teerth स्थळ फिरण्याचे स्वप्न अपुर्णच राहते. याच सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने जेष्ठ मंडळी करिता हि नवी Teerth Darshan Yojna अंमलात आणली आहे .या योजनेचा खरा उद्देश म्हणजे राज्यातील वय वर्ष ६० पूर्ण केलेल्या नागरिकांना देशातील तीर्थ स्थळांचे मोफत दर्शन घडावे .या योजनेचा लाभ राज्यातील सर्वच धर्माना लागू असेल .

यात महाराष्ट्र राज्यासहित देशातील एकूण १३९ Teerth स्थळ दर्शन घेता येणार आहे .यामध्ये सरकार तिकीटपासून,जेवण ,प्रवास याचा खर्च मोफत करणार आहे.हि योजना यशस्वी पाने राबवता यासाठी सरकारचा प्रतिनिधी म्हणून सामाजिक न्याय विभागमधील नोडल विभाग याकडे जबाबदारी देण्यात आली आहे .जिल्हानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे ,ठराविक कोटानुसार प्रत्येक जिल्ह्यातून लाभार्थी निवड करण्यात येईल .निवडलेली व्यक्ती काही कारणास्तव न आल्यास ,प्रतीक्षा यादी मध्ये असणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल,यात्रेदरम्यान सर्व खर्च शासन करणार आहे ,पर्येवेक्षक याने दिल्लेल्या सर्व सूचनांचे पालन यात्रेकरूला करणे बंधनकारक असणार आहे.


योजनेचे नाव तीर्थ दर्शन योजना 2025
योजना कधी लागू करण्यात आली २९ जून २०२४
लाभार्थी राज्यातील जेष्ठ नागरिक
फायदे १.मोफत तीर्थयात्रा २.संपूर्ण प्रवासाचा खर्च सरकार द्वारे करण्यात येईल
अर्ज प्रकार ऑनलाईन तसेच ऑफ लाईन अर्ज करावयाचा असल्यास सेतू केंद्रात जावे ,स्वतःच्या मोबाईल द्वारे सुद्धा अर्ज करू शकतात
वयोमर्यादा वय वर्ष ६० पूर्ण असावे

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मध्ये जेष्ठ नागरिकांना खालील फायदे मिळणार आहेत

  • राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ यात्रा करण्याची संधी मिळणार आहे
  • हि योजना राज्यात असणाऱ्या सर्वच धर्मासाठी लागू होणार आहे.
  • हि योजना एका व्यक्तीला फक्त फक्त एकदाच लागू होईल
  • या योजनेच्या प्रवासाठी बस तसेच रेल्वेच्या तिकिटांची व्यवस्था करून दिली जाईल.

या तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थी मंडळीना खालील तीर्थक्षेत्रांची सैर करता येणार आहे

महाराष्ट्र

मंदिराचे नाव ठिकाण
श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबई
श्री महालक्ष्मी मंदिर मुंबई
मुंबादेवी मंदिर मुंबई
चैत्यभूमी दादर मुंबई
माउंट मेरी चर्च मुंबई
श्री वाळकेश्वर मंदिर मलबार हिल ,मुंबई
विश्व विप्पंना पगोडा मुंबई
मयुरेश्वर मंदिर मोरगाव ,पुणे
चिंतामणी गणपती मंदिर थेऊर ,पुणे
गिरिजात्मक मंदिर लेण्याद्री ,पुणे
महागणपती मंदिर रांजणगाव ,पुणे
खंडोबा मंदिर जेजुरी पुणे
श्री माऊली मंदिर आळंदी ,पुणे
भिमाशंकर मंदिर पुणे
संत तुकाराम महाराज समाधी मंदिर देहू ,पुणे
संत सावता माळी मंदिर सोलापूर
संत चोखामेळा समाधी पंढरपुर , सोलापूर
श्री विठ्ठल रुखमाई मंदिर पंढरपुर ,सोलापूर
श्री शिखर शिंगणापूर सातारा
अंबाबाई मंदिर (महालक्ष्मी )कोल्हापुर
श्री ज्योतिबा मंदिर कोल्हापुर
जैन मंदिर कुंभोज ,कोल्हापुर
रेणुका माता मंदिर नांदेड
गुरु गोविंद सिंह समाधी हुजूर साहिब ,नांदेड
खंडोबा मंदिर मालेगाव नांदेड
श्री नामदेव महाराज देवस्थान उंब्रज ,नांदेड
श्री तुळजा भवानी मंदिर धाराशिव
श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर छत्रपती संभाजीनगर
श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर छत्रपती संभाजीनगर
जैन स्मारक वेरूळ ,छत्रपती संभाजीनगर
श्री विघ्नहर मंदिर ओझर नाशिक
संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर त्र्यंबकेश्वर ,नाशिक
त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक
सप्तश्रुंगी मंदिर नाशिक
मुक्तिधाम मंदिर नाशिक
श्री काळाराम मंदिर नाशिक
जैन मंदिर मांगी तुंगी नाशिक
गजपथ नाशिक
श्री साई बाबा मंदिर शिर्डी ,अहिल्यानगर
श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक ,अहिल्यानगर
शनी मंदिर शनी शिंगणापूर ,अहिल्यानगर
श्री क्षेत्र भगवानगड पाथर्डी ,अहिल्यानगर
श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली ,रायगड
श्री गजानन महाराज मंदिर शेगाव ,बुलढाणा
एकविरा देवी कार्ला ,पुणे
दत्त मंदिर औदुंबर सांगली
केदारेश्वर मंदिर मणी
वैजिनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परळी ,बीड
पावसाळा रत्नागिरी
मार्लेश्वर मंदीर रत्नागिरी
गणपतीपुळे रत्नागिरी
महाकाली मंदिर चंद्रपूर
काळूबाई मंदिर सातारा
श्री अष्ठभुज मंदिर रामटेक ,नागपुर
श्री चिंतामणी गणेश मंदिर कळंब ,यवतमाळ
दिक्षाभूमी नागपुर
चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ मुंबई
सेंट आंड्र्यू चर्च मुंबई
सेंट जॉन बाप्तीष्ठ चर्च अंधेरी मुंबई
सेंट जॉन बाप्तीष्ठ चर्च मारोल ,मुंबई
गोदिजी पार्श्वनाथ मंदिर मुंबई
नेसेट एलीयाऊ सिनागोग किल्ला मुंबई
शर हरहमीम सिनेगोग मुंबई
मेगन हरहमीम सिनेगोग भायखळा ,मुंबई
सेंट जॉन थे बाप्तीष्ठ चर्च ठाणे
अग्निमंदीर ठाणे

भारतातील तीर्थस्थळे

तीर्थस्थळ ठिकाण
श्री वैष्णोदेवी मंदिर कटरा ,जम्मू व काश्मीर
श्री अमरनाथ मंदिर जम्मू व काश्मीर
सुवर्ण मंदिर अमृतसर ,पंजाब
अक्षरधाम मंदिर दिल्ली
श्री दिगंबर जैन मंदिर दिल्ली
लक्ष्मीनारायण मंदिर दिल्ली
बद्रीनाथ धाम उत्तराखंड
गंगोत्री उत्तराखंड
केदारनाथ मंदिर रुद्रप्रयाग , उत्तराखंड
नीलकंठ मंदिर ऋषिकेश ,उत्तराखंड
यमुनोत्री उत्तराखंड
बैधनाथ धाम झारखंड
काशी वाराणसी
इस्कॉन मंदिर वृंदावन ,उत्तर प्रदेश
श्री राम मंदिर अयोध्या ,उत्तर प्रदेश
देवगड उत्तर प्रदेश
जगन्नाथ मंदिर ओडीसा
सूर्यमंदिर ओडीसा
लिंगराज मंदिर ओडीसा
मुक्तेश्वर मंदिर ओडीसा
कामाख्या देवी मंदिर आसाम
पावपुरी बिहार
महाबोधी मंदिर गया ,बिहार
रनकपुर मंदिर पाली,राजस्थान
अजमेर राजस्थान
रनकपुर राजस्थान
दिलवाडा मंदिर राजस्थान
श्री सोमनाथ मंदिर गुजरात
द्वारकाधीश मंदिर द्वारका , गुजरात
नागेश्वर मंदिर गुजरात
शत्रुंजय मंदिर गुजरात
गिरनार गुजरात
सांची स्तूप मध्य प्रदेश
खजुराहो मंदिर मध्यप्रदेश
महाकालेश्वर मंदिर मध्य प्रदेश
ओंकारेश्वर मंदिर मध्य प्रदेश
रंगनाथस्वामी मंदिर कर्नाटक
गोमटेश्वर मंदिर कर्नाटक
महाबळेश्वर मंदिर कर्नाटक
मुरुडेश्वर मंदिर कर्नाटक
श्रीकृष्ण मंदिर कर्नाटक
तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेश
मल्लिकार्जुन मंदिर आंध्र प्रदेश
कांचीपुरम मंदिर तामिळनाडू
शबरीमाला मंदिर केरळ
श्रीकृष्ण मंदिर केरळ

यामध्ये अजूनही काही Teerth स्थळे सरकार कडून जाहीर करण्यात आलेली आहेत


तीर्थ दर्शन योजना साठी भाविकांनी काही पात्रता तसेच अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे , खालील पत्रातांची पूर्तता केल्यास योजनेचा लाभ घेता येईल .

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती हि महाराष्ट्र राज्याची कायमची रहिवाशी असावी
  • व्यक्तीचे वय हे ६० वर्षापेक्षा अधिक असावे
  • व्यक्ती हि आयकर भरण्री नसावी किंवा आयकर कक्षात बसणारी नसावी
  • या योजनेचा लाभ आधी कधीही घेतलेला नसावा
  • अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा अधिक नसावे
  • अर्जदार व्यक्ती हि शारीरिक दृष्ट्या तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम असावेत
  • अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले तसेच कामगार , स्वयंसेवी कामगार , कंत्राटी कामगार हे या योजनेस पात्र असतील.

खालील गोष्टीमुळे अर्जदार व्यक्ती अपात्र असेल

  • अर्जदार करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत असेल तर ती व्यक्ती अपात्र आहे
  • जर कुटुंबातील व्यक्ती आमदार ,खासदार असेल तर ते अपात्र ठरेल
  • जर कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत अथवा निवृत्ती नंतर पेन्शन घेत असल्यास ते या योजनेस अपात्र ठरतील .
  • जर कुटुंबातील व्यक्ती हि राज्य सरकार किंवा भारत सरकारच्या कुठ्य्लाही महामंडळ किंवा सार्वजनिक उपक्रम मध्ये सहभागी असेल तर ते यास अपात्र ठरतील
  • जर एखादी व्यक्ती एखद्या मोठ्या आजाराने ग्रस्त असेल तर या योजनेस अपात्र ठरतील . उदा-टीबी ,कर्करोग, मानसिक आजारी.
  • जर एखाद्या व्यक्तीची मागील वर्षी या योजनेत निवड झालेली असेल अन त्याने त्यात भाग घेतला नसेल तर ते यावेळी अपात्र असतील

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र (जर हे नसेल तर खालील कागदपत्रे चालतील )
    • रेशन कार्ड
    • मतदार ओळखपत्र
    • शाळा सोडल्याचा दाखला
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • तीर्थ दर्शन योजनेचा अर्ज

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • तीर्थ दर्शन योजना 2025 या योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करू शकतात
  • ऑफलाईन अर्जासाठी प्रथम अर्जदाराला जवळच्या सेतू केंद्रात जावे लागेल
  • अर्जाच्या वेळी अर्जदार व्यक्तीला /लाभार्थीला उपस्थित असणे गाजेचे आहे
  • अर्जदार व्यक्तीने तीर्थ दर्शन योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतू केंद्रावर जाताना आपली अधिकृत कागदपत्रे जवळ ठेवावीत
  • सेतू केंद्रात अर्ज करण्यासाठी गेल्यानंतर तिथे असलेल्या कर्मचाऱ्याला आपल्याकडील सर्व माहिती द्यावी
  • अर्ज केल्यानंतर अर्जदाराला सर्व माहिती मोबाईल वरती मेसेज द्वारे कळवली जाईल

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • Teerth Darshan Yojna अर्ज हा ऑन लाईन पद्धतीने सुद्धा करता येणार आहे
  • राज्य सरकारने ज्या सरकारी योजना आहेत त्यांच्या साठी एक नवीन पोर्टल आणलेले आहे त्याच्या माध्यमातून आता अश्या योजनाचा लाभ सामान्य व्यक्तीला घेता येणार आहे
  • योजनेच्या लाभासाठी अधिकृत वेबसाईटच्या मुख्य पृष्ठभागावर आपण या अर्जाची नोंदणी करता येईल
  • अर्ज दाखल करताना लाभार्थी व्यक्तींनी आपली कागदपत्रे सुद्धा व्यवस्थित अपलोड करावीत
  • लाभार्थीने अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जाची छाननी हि संबधित विभाग करत असते
  • छाननी मध्ये अर्ज वैध ठरला तर संबधित विभाग निवड झालेल्या लाभार्थी व्यक्तींची यादी जाहीर करत असते ,अन याच नंतर योजनेचा लाभ घेता येईल

  • या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी व्यक्तीला देशातील तब्बल १३९ देवस्थानांना भेटी देता येणार आहेत
  • या Teerth Darshan सहलीचा संपूर्ण खर्च सरकार तर्फे होणार आहे , जो एका व्यक्तीसाठी रुपये ३०००० इतका असणार आहे
  • या योजनेसाठी लाभार्थीला दोन्ही पद्धतीने अर्थात ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल
  • यात फक्त निवड झालेल्या व्यक्तींनाच तीर्थ दर्शनचा लाभ घेता येणार आहे .
  • यात निवड न झालेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या सहलीसाठी ज्या लाभार्थीचे वय ७५ पेक्षा अधिक असेल अश्या व्यक्तींना एक सोबती घेण्यास संमती आहे.
  • या सोबती असणाऱ्या व्यक्तीची माहिती अर्ज नोंदणी करतेवेळी देणे गरजेचे आहे
  • सोबतीचे वय हे २१ ते वय वर्ष ५० मध्येच असायला हवे
  • पती पत्नी दोन्ही लाभार्थी असेल अन दोघांपैकी एकाचे वय ७५ पेक्षा अधिक असेल तर त्यांना सोबती नेण्यास परवानगी नाही.
  • दोन्ही पती पत्नी यांचे वय ७५ पेक्षा अधिक असेल तर त्यांना सोबती घेण्यास परवानगी असेल
  • प्रवासादरम्यान काही अति महत्वाची गोष्ट घडल्यास प्रवास अर्धवट सोडण्याची परवानगी पर्यवेक्षकाकडून मिळेल
  • प्रवासादरम्यान कुठलेही अंमली पदार्थ अथवा ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगण्यास मनाई आहे.
  • प्रवासादरम्यान पर्यवेक्षकाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

महाडीबीटी पोर्टल https://shorturl.at/tio4g
तीर्थ दर्शन योजना-नाशिक विभाग https://nashik.gov.in/
तीर्थ दर्शन योजना -हिंगोली विभाग https://www.samajkalyanhingoli.in/

या योजनेच्या संबंधित अर्ज सरकारच्या विभागाकडून जाहीर करण्यात येत आहेत


तीर्थ दर्शन योजना संबधित असलेली हेल्पलाईन संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल


योजनेचे नाव संकेतस्थळ
पोस्ट ऑफिस भरती 2025 https://shorturl.at/s380v
तुकडा बंदी कायदा 2025 https://shorturl.at/9btGw
प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2025 https://shorturl.at/shiSs
गाय गोठा योजना 2025 https://shorturl.at/0aBw4
शेतकरी फार्महाऊस योजना 2025 https://shorturl.at/gu9oD
महाडीबीटी योजना 2025 https://shorturl.at/tio4g
कृषी ड्रोन अनुदान योजना 2025 https://shorturl.at/v5BN7
आमचे अधिकृत संकेतस्थळhttps://smartsahyadri.com/