Sukanya Samruddhi Yojana सुकन्या समृध्दी योजना २०२४


Sukanya Samruddhi Yojana सुकन्या समृध्दी योजना :मित्र मंडळीनो शक्तिशाली देशांपैकी एक असणारा एक देश म्हणजे आपला भारत देश या शक्तिशाली देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी .यांच्या केंद्र सरकारने
आपल्या देशातील मुलीचे भविष्य सर्वसंपन्न सुरक्षित करण्यासाठी सन २०१५ मध्ये अस्तित्वात आणलेली बेटी बचाव बेटी पढाव या योजनेअंतर्गत असणारी सुकन्या समृद्धी योजना अंमलात आणली आहे.
या सुकन्या समृद्धी योजनामुळे कित्येक कुटुंबात आज आनंदाचे वातावरण आहे , कित्येक पालकांचे डोक्यावरील आर्थिक ओझे आज कमी झाले आहे त्याच कारण म्हणजे हि सर्वसमावेशक दिलासादायक Sukanya Samruddhi Yojana .

या उत्कृष्ठ सुकन्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती या सोबत या योजनेमध्ये कोण पात्र असणार आहेत तसेच Sukanya Samruddhi Yojana मधून किती मोबदला आपल्याला मिळणार आहे हे सर्व आज इथे पोस्ट मध्ये पाहणार आहोत .


Sukanya Samruddhi Yojana : सुकन्या समृध्दी योजना
Sukanya Samruddhi Yojana सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृध्दी योजना यामध्ये आपण प्रामुख्याने खालील मुद्दे पाहणार आहोत –

१.सुकन्या समृध्दी योजना थोडक्यात माहिती
२. खाते बंद अथवा निष्क्रिय केंव्हा होते
३.मुदतीपूर्वी खाते बंद करणे शक्य कि अशक्य
४.खाते उघडण्याची प्रक्रिया
५.कागदपत्रे
६.फायदे
७.वैशिष्टे
८.कर सवलत
९.खात्याची रक्कम कुठे व कशी पहावी
१०. व्याज कसे मिळेल
११.योजनेशी संबधित बँका
१२.आधार कार्ड , पॅन कार्ड का आवश्यक
१३. व्याजाची गणना करण्याचे सूत्र
14. सुकन्या समृध्दी योजनेचे कॅल्क्युलेटर

Sukanya Samruddhi Yojana Marathi Information : योजनेची थोडक्यात माहिती


-Sukanya Samruddhi Yojana मध्ये भारतातील कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीच्या मुलीच वय हे १० वर्षांपेक्षा कमी असावे तरच त्या व्यक्तीला सुकन्या समृद्धी योजनेमध्ये (Sukanya Samruddhi Yojana) भाविष्याची गुंतवणूक करू शकतो .
-या योजनेमध्ये पात्र असणाऱ्याच मुलीच्या नावेच खाते उघडता येते.
-यासाठी मुलगी जन्माला आल्यापासून ते वय वर्ष १० या कालावधी मध्ये कधीही आपण खाते उघडू शकता.
-एका मुलीच्या नवे फक्त एकच खाते उघडता येवू शकते
-या योजनेमध्ये आपण किमान २५० रुपयांपासून ते रुपये १.५ लाख पर्यंत पैसे खात्यावर भरू शकता.
-नवीन नियमावलीनुसार या सुकन्या समृध्दी योजनेसाठीचा व्याजदर हा आधीच्या ७.२ टक्क्यावरून ८.२ % इतका करण्यात आलेला आहे .
-खाते उघडल्यानंतर बरोबर २१ वर्षांनी ते खाते परीपूर्ण /परीपक्क्व होऊन जाते

Sukanya Samruddhi Yojana: या योजनेचे खाते केंव्हा बंद किंवा निष्क्रिय होते

-सुकन्या समृद्धी योजना यामध्ये खातेदाराचा मृत्यू झाल्यास खाते बंद/निष्क्रिय होते .
-खात्याशी सलंग्न असणाऱ्या पालकांचा मृत्यू झाल्यावर .
-sukanya samruddhi yojana खाते बंद करावयाचे असल्यास जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावून संबंधित योजनेचा अर्ज तसेच खाते पासबुक आपल्याला जमा करावे लागेल.

सुकन्या समृध्दी योजना : खाते मुदतीपूर्वी बंद करणे :शक्य कि अशक्य

-समजा मुलीचे वय १८ वर्ष पुर्ण झाले असेल अन तिच्या विवाहाच्या उद्देशाने तुम्ही विचार करत असाल तर मुदतीपूर्वी SSY खाते बंद करणे शक्य आहे.

Sukanya Samruddhi Yojana :खाते उघडण्याची प्रक्रिया

-मुलीच्या नावे सुकन्या समृध्दी योजना ( sukanya samruddhi yojana )मध्ये खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिस मधुन या योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल
-फॉर्म मध्ये दिलेली सर्व माहिती वाचूनच भरावी जसे कि, आई- वडिलांचे नाव , मुलीचे नाव , मुलीचे वय .
-या फॉर्म सोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत
-ज्या पोस्ट ऑफिस मधुन अथवा बँकेतून आपण फॉर्म घेतला असेल तिथेच तो जमा करावा
-या सर्व प्रकियेनंतर सुकन्या समृध्दी योजना मध्ये अर्ज ग्राह्य धरला जातो .

Required documents for Sukanya Samruddhi Yojana :कागदपत्रे


-मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र
-पालकांचे आधार कार्ड तसेच पण पॅन कार्ड आवश्यक
-मुलीचे आधार कार्ड
-चालु मोबाईल क्रमांक
-राहत्या पत्त्याचा पुरावा

Sukanya Samruddhi Yojana : फायदे

– सुकन्या समृद्धी योजना मध्ये परिवारातील फक्त दोन मुलींनाच याचा फायदा घेता येतो.
-दत्तक घेतलेल्या मुलीला सुद्धा या योजने मध्ये समाविष्ठ केलेले आहे.
-मुलीचे वय १८ वर्ष किंवा तिने दहावी उत्तीर्ण केल्यावर या खात्यामधुन काही रक्कम काढता येईल,पण एका वर्षात फक्त एकदाच रक्कम काढता येते
-सुकन्या समृध्दी योजना भारत सरकारने कर मुक्त केलेली आहे ,यात गुंतवलेली रक्कम त्यावर मिळणारे व्याज हे सर्वच करमुक्त केलेले आहे
-आधी एक मुलगी असेल अन नंतर जुळ्या मुली जन्माला आल्या तरी त्यांचेही खाते उघडता येईल.
-जुळ्या मुलीच्या नंतर मुलगी जन्माला आली तरी सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडता येते .

Sukanya Samruddhi Yojana :वैशिष्टये

  • मुलीचे वय १८ पुर्ण झाले असेल किंव मुलीला उच्च शिक्षणाला पैसे हवे असतील तर मागील आर्थिक वर्षाच्या शेवटी जेवढी रक्कम जमा झालेली असेल त्याच्या निम्मी म्हणजे ५०% रक्कम खात्यातून काढता येते

सुकन्या समृध्दी योजनेमधील कर सवलत :


-सुकन्या समृध्दी योजना एक प्रकारे खासस आहे कारण गुंतवणूकदारांना इनकम टेक्स एक्ट १९६१ च्या सेक्शन ८०Cअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर वर्षाला १.५ लाख रुपयापर्यंत टेक्सचे फायदे घेवू शकतात.
-दीर्घकालीन गुंतवणूक असलेली हि सुकन्या योजना वार्षिक पद्धतीने चक्रवाढीचा भरपूर लाभ देतेच शिवाय दीर्घ मुदतीने छोटी असलेली गुंतवणूक मध्ये जास्त परतावा मिळतो .

सुकन्या समृध्दी योजना : खात्याची रक्कम कुठे अन कशी पहावी

-तुम्ही घरी बसल्या खात्यावरील रक्कम चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला जो लॉगीन क्रेडेन्शीयल्स मिळतो त्याद्वारे तुम्ही इंटरनेट बँकिंग पोर्टल वर गेले कि सुरवातीलाच आपल्या सुकन्या समृध्दी योजनेच्या खात्यावरील रक्कम दिसेल.
-सुकन्या समृध्दी योजनेच्या हिशोबानुसार तुमच्या ९ लाखाच्या रकमेवर १७ लाख ९३ हजार ८१४ रुपये व्याज मिळणार जे गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पटच असेल.
-सुकन्या समृध्दी योजनेमध्ये जर २०२४ मध्ये गुंतवणूक केली तर २०४५ मध्ये खाते परीपूर्ण होईल , योजनेतील संपूर्ण रक्कम याच वर्षी म्हणजे २०४५ या कालवधीतच मिळणार आहे.

Sukanya Samruddhi Yojana Marathi :व्याज कसे मिळेल


-सदरचे खाते हे तिमाही पद्धतीने वित्त विभागाने अधिसूचित केलेल्या विहित दारावरतीच कमाई करेल
-व्याज हे आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यावर जमा केले जाईल .
-मिळालेले व्याज हे करमुक्त असेल.

सुकन्या समृध्दी योजना संबंधीत असणाऱ्या बँका :

-युनियन बँक ऑफ इंडिया
-ॲक्सिस बँक
-इको बँक
-स्टेट बँक ऑफ इंडिया
-पंजाब नॅशनल बँक
-HDFC बँक
-इंडिअन ओवरसीस बँक
-बँक ऑफ महाराष्ट्र
-ICICI बँक
-कॅनरा बँक
-बँक ऑफ बडोदा
-बँक ऑफ इंडिया

सुकन्या समृध्दी योजनेसाठी आधार कार्ड ,पॅन कार्ड आवश्यकच :

-सुकन्या समृद्धी योजना साठी भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पॅन कार्ड , आधार कार्ड आवश्यक आहे जर तुम्हाला आधार क्रमांक प्राप्त नसेल झाला तर तुम्ही आधार नोदणी केल्यानंतर जो अर्ज केला होता तो सादर करावा लागेल
-१ एप्रिल २०२४ पासून ६ महिन्याच्या कालावधीत सादर करणे गरजेचे आहे
-पॅन क्रमांक दिला नसेल तर ज्या दिवशी खाते उघडले असेल त्या तारखेपासून २ महिन्याच्या आत सबमिट करणे गरजेचे आहे
-नियमित केलेल्या ६ महिन्याच्या कालावधीत आधार क्रमांक तसेच २ महिन्याच्या कालावधीत ,पॅन सबमिट नाही केले तर खाते निष्क्रिय होऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजना मध्ये व्याजाची गणना पुढील सूत्राप्रमाणे होते

A=p(1+r/n)^nt

A-चक्रवाढ व्याज
P-मुद्द्लीची रक्कम
r-व्याजदर
n-चक्रवाढ व्याज वर्षातून किती वेळा होते
t-एकूण वर्षाची संख्या

सुकन्या समृध्दी योजनेचे कॅल्क्युलेटर:

उदाहरण :समजा मुलीचा जन्म हा सन २०२३ मध्ये झाला असेल अन त्याच वर्षी तिच्यासाठी पालकांनी सुकन्या योजनेचे खाते उघडले आते बरोबर २१ वर्षांनी खाते परीपक्क्व होईल

-एका वर्षाची गुंतवणूक १ लाख रुपये
-कालावधी १५ वर्ष
-१ लाख प्रत्येक वर्षी म्हणजे १५ वर्षात गुंतवलेली रक्कम १५ लाख रुपये होईल
-१ वर्षासाठी ठरवलेला व्याजदर ८.२%
-२१ वर्षांनी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम ३१,१८,३८५
-२१ वर्षांनी खाते परीपूर्ण झाल्यावर मिळणारी एकूण रक्कम ४६,१८,३८५


सुकन्या समृध्दी योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वरती क्लिक करावे

Visit Official website सुकन्या समृध्दी योजना

Visit Official Website भारतीय पोस्ट ऑफिस

Visit My Homepage https://smartsahyadri.com/


सतत विचारले जाणारे काही प्रश्न :
१ . आपण सुकन्या समृध्दी योजनेमध्ये किती वेळा पैसे भरू शकतो ?
-वर्षातून कितीही वेळा आपण रक्कम भरू शकता त्यासाठी प्रतिवर्ष रुपये १००० ते १५०००० पर्यंत गुंतवणुकीची रक्कम आपण भरू शकतो .

२.सुकन्या समृध्दी योजना मधील खाते आपण ओंनलाईन पद्धतीने उघडू शकतो का ?
-नाही , कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिस मधुन तुम्ही ओंनलाईन खाते उघडू शकत नाही.

३. सुकन्या समृध्दी योजनेत किमान किती रुपये गुंतवू शकतो ?
-किमान २५० रुपयांची गुंतुवणूक सुकन्या समृध्दी योजनेत करता येईल .

४.या योजनेमध्ये एका वर्षात किती रक्कम ठेवता येते?

-या योजनेमध्ये १.५ लक्ष रुपये रक्कम ठेवता येते

५.सुकन्या समृध्दी योजना खात्यातील वार्षिक पेमेंट थकवल्यास किती दंड होतो ?
-रुपये ५०० दंड भरावा लागणार आहे .

६.मुलगी अन मुलीचे पालक दुसऱ्या देशात गेल्यास या योजनेमध्ये गुंतवणुक करणे सुरु ठेवू शकतो का ?
-मुलीने भारतीय नागरिकत्व सोडूण दुसऱ्या देशात NRI झाल्यावर खाते बंद करावे लागेल .

७.सुकन्या समृध्दी योजनेच्या खात्याच्या व्याजावर कर आकाराला जाणारा आहे का ?
-या योजेनेत गुंतवलेली रक्कम , मिळणारे व्याज हे सर्व करमुक्त आहे.

८.सुकन्या समृद्धी योजना मध्ये अनिवासी भारतीय खाते उघडू शकेल का ?
-अजिबात नाही , अनिवासी असणारे खातेही उघडू शकत नाहीत

९.या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेवू शकतो का ?
-या योजनेद्वारे कोणतेही कर्ज उपलब्ध होत नाही.

१०.प्रत्येक महिन्याला प्रत्येकी १००० रुपये जमा केल्यास किती रक्कम मिळेल ?

-महिना १००० म्हणजे वर्षाला झाले १२ हजर रुपये याप्रमाणे २१ वर्षांनी खाते परिपक्व झाल्यावर जवळपास ५ लाख रुपये मिळतील.

११. मुलीचे वय किती असेपर्यंत सुकन्या समृध्दी योजनेमध्ये खाते उघडू शकतो ?

-वय वर्ष १० पर्यंत आपण सुकन्या योजनेत खाते उघडू शकतो