Shivsena Eknath Shinde शिवसेना एकनाथ शिंदे मंत्री 2024 -नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने जनेतेने कौल देवून पुन्हा सत्तेत विराजमान केले आहे .महायुतीमध्ये शिवसेना हा मोठा घटक असल्याने त्यानंही सत्तेत अर्थात मंत्रिपदात मोठा वाटा मिळेल या कुठलीच शंका नसेल.एकूण विधानसभेच्या २८८ जागेवर महायुतीने आपले उमेदवार उभे केले होते .त्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने मुसंडी मारली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तब्बल ५७ जागांवर विजय मिळवला सोबत इतर ४ अपक्ष आमदारांनी सुद्धा शिंदे यांच्या शिवसेनेला पाठींबा देत एकनाथ शिंदे यांच्या मागे मोठी ताकद उभी केली .शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला ११ मंत्रिपद आलेली आहेत त्यात , ९ कॅबिनेट तर २ राज्यमंत्री मिळाले आहेत
Shivsena Minister List शिवसेना मंत्री
Shivsena Minister List शिवसेना मंत्री पुढीलप्रमाणे –
मंत्री महोदयांचे नाव | मतदारसंघ |
श्री एकनाथ शिंदे | कोपरी-पाचपाखाडी |
श्री दादा भुसे | मालेगाव बाह्य |
श्री उदय सामंत | रत्नागिरी |
श्री शंभूराज देसाई | पाटण |
श्री प्रताप सरनाईक | ओवळा -माजिवडा |
श्री भरत गोगावले | महाड |
श्री प्रकाश आबिटकर | राधानगरी |
श्री योगेश कदम | दापोली |
श्री आशिष जयस्वाल | रामटेक |
श्री गुलाबराव पाटील | जळगाव ग्रामीण |
श्री संजय राठोड | दिग्रस -दारव्हा |
श्री एकनाथ शिंदे -उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
अत्यंत साधेपणा , सहज सरळ उपलब्ध होणारा सर्व सामान्य जनतेला वर्षा निवासस्थानाची दार खुली करणारा दिलखुलास व्यक्ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे .नुकतीच पार पडलेली विधानसभा २०२४ त्यांच्याच नेतृत्वात पार पडली होती ,त्यांच्या अनेक योजना ,आणि जलद निर्णयाने जनता त्यांच्यावर मात्र खूपच खुश होती .याचमुळे जनतेने महायुती बाजूने कौल देवून पुन्हा सत्तेवर बसवले , यात सर्वात मोठा पक्ष भाजप ठरल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद मिळणे साहजिकच होते ,मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली . एकूण विधानसभेच्या संख्याबळानुसार ४३ मंत्रिपदे देता येतात , यानुसार शिवसेनच्या वाट्याला १२ मंत्रिपदे आलेली आहेत .shivsena eknath shinde यांच्याकडे नगरविकास तसेच राज शिष्टाचार खाते त्यांना मिळाले आहे .आता आपण पहाणर आहोत Shivsena Minister List .
१ . श्री दादा भुसे
विधानसभा २०२४ मध्ये पाचव्यांदा निवडुन येवून भुसे यांनी मालेगाव बाह्य मध्ये असलेले हिरे कुटुंबाचे वर्चस्व मोडीत काढलेले आहे. सुरवाती पासून शिवसेनेशी एकनिष्टता ठेवलेल्या भुसे यांना कायमच मनाचे स्थान शिवसेनेत देण्यात आलेले आहे . २०१४ मध्ये भुसे हे ग्रामविकास राज्यमंत्री होते ,नंतर २०१९ ला Shivsena कडून निवडून येऊन नंतर ते कॅबिनेट दर्ज्याचे मंत्री राहिले होते अडीच वर्षांनी Shivsena Eknath shinde यांना उठावात साथ दिली नात्र एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले .आधीच्या कामामुळे आताही चांगल्या मताधिक्याने निवडुन आलेले दादा भुसे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी पुन्हा विराजमान झालेले आहेत.नव्याने पुन्हा मंत्री झालेले भुसे यांचा विधानसभा २०२४ मधील मतांचा थोडक्यात आढावा खालीलप्रमाणे-
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री दादा भुसे | १५८२८४ |
श्री प्रमोद बच्छाव | ५१६७८ |
विजयी उमेदवार श्री दादा भुसे यांचे मताधिक्य -१०६६०६ |
२.श्री उदय सामंत
उदय रवींद्र सामंत म्हणजे कोंकणातील एक प्रस्थापित राजकारणी,अतिशय अभ्यासू असलेले सामंत शिंदे यांच्या मंत्री मंडळात उद्योगमंत्री होते .२००४,२००९,२०१४,२०१९,२०२४ सलग पाचव्यांदा निवडून आलेले उदय सामंत हे शिंदे यांचे खास मर्जीतले नेते मानले जातात ,अनेकदा शिवसेनेची महत्वाची भूमिका मांडताना ते दिसत असतात. राजकारणांची सुरवात राष्ट्रवादी कडून केलेले सामंत मागील दीड दशक शिव्सेनेंची धुरा कोंकणात सक्षमपणे सांभाळत असतात .त्यामुळे Shivsena कडून या नवीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये ते कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेताना आपल्याला दिसले आहेत.त्यांच्या मताची आकडेवारी खालीलप्रमाणे –
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री उदय सामंत | १११३३५ |
श्री बाळ माने | ६९७४५ |
विजयी उमेदवार श्री उदय सामंत यांचे मताधिक्य -४१५९० |
३.श्री शंभूराज देसाई
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे फायर ब्रांड नेते म्हणून ओळख ,पक्षाकडून मिळालेले काम तडीस कोण ह्वेऊन जाईल तर ते आहेत एकंठ शिंदे यांचे खास शंभूराज देसाई , आतापर्यंत त्यांनी गृह,वित्त ,नियोजन ,राज्य उत्पादन शुल्क या विभागाची यशस्वी जबाबदारी पेलली आहे.शंभूराज देसाई यांना राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री बाळासाहेब देसाई यांचा राजकीय वारसा मिळालेला आहे .शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातून २००४ ,२०१४,२०१९ ,२०२४ ला निवडून आलेले आहेत .अद्धीच्या मंत्रीपदाचा यशस्वी अनुभव पाठीशी असल्याने त्यांना यावेळी Shivsena पक्षाकडून मंत्रिपद मिळालेले आहे
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री शंभूराज देसाई | १२५७५९ |
श्री सत्यजित पाटणकर | ९०९३५ |
विजयी उमेदवार श्री शंभूराज देसाई यांचे मताधिक्य – ३४८२४ |
४.श्री प्रताप सरनाईक
नगरसेवक ते आमदार असा प्रवास करणाऱ्या प्रताप सरनाईक यांना मंत्रीपदाने २०१९ ला हुलकावणी दिली होती पण यावेळी एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून निवडून आलेल्या सरनाईक यांना यावेळी शिवसेना पक्षाकडून मंत्रिपद मिळालेलं आहे ,प्रताप सरनाईक हे अनुक्रमे २००९ ,२०१४ , २०१९, २०२४ म्हणजेच चौध्यांदा विधानसभेवर निवडून आलेले आहेत.त्यामुळेच यावेळी मंत्रीपदावर शिक्कमोर्तब केलेले आहे .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री प्रताप सरनाईक | १८४१७८ |
श्री नरेश मणेरा | ७६०२० |
विजयी उमेदवार श्री प्रताप सरनाईक यांचे मताधिक्य -१०८१५८ |
५. श्री भरत गोगावले
Shivsena Eknath Shinde पक्षाचे फायर ब्रांड नेते म्हणून ओळख असलेले भरत गोगावले २०१९ पासून मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत , यांना कित्येकवेळा मंत्रिपदाने हुलकावणी दिलेली आहे .मागील २०१९ ला हुलकावणी मिळालेल्या गोगावले यांना मात्र २०२२ मधील उठवावेळी प्रमुख भूमिका पार पडल्याने त्यांना शिवसेना एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद देण्याचे ठरवले होते पण पक्षातील रस्सीखेच यामुळे मंत्रीपदापासून लांब राहावे लागलेल्या गोगावले यांना नंतर २०२४ मध्ये महामंडळ देण्यात आले होते .सलग चौध्यांदा निवडून आलेले गोगावले यावेळी मंत्रिपदाच्या रेस मध्ये सर्वात पुढे होते अन त्यानुसार त्यांना आज शिवसेना पक्षाकडून मंत्रिपद मिळाले आहे .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री भरत गोगावले | ११७४४२ |
सौ स्नेहल जगताप | ९१२३२ |
विजयी उमेदवार श्री भारत गोगावले यांचे मताधिक्य -२६२१० |
६.प्रकाश अबिटकर
कोल्हापूर म्हणजे शिवसेनेचा गडच ,इथे शिवसेना पक्षाचे प्रत्येकवेळी जिल्ह्यात ३/४ आमदार निवडून येतातच .कोल्हापूरच्या राधानगरी या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून येणारे प्रकश अबिटकर. अतिशय दुर्गम भाग असलेला हा मतदारसंघ .मतदारसंघात केलेल्या प्रभावी कामामुळे तसेच रस्ते , वीज ,पाणी हे सर्व स्रोत वाड्या वस्त्यांवर पोहचवणारे आमदार म्हणून त्यांची ख्याती राज्यात झालेली होती ,याच बळावर ते पुन्हा आमदार झालेले आहेत यावेळी ते प्रंचड मताधिक्याने निवडून येवून आता राज्याचा कारभार पाहणार आहेत ,Shivsena Minister List मध्ये त्यांचे नाव अग्रणी होते ,मंत्रीपदाची माळ त्यांना पहिल्यांदाच पडलेली आहे
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री प्रकाश अबिटकर | १४४३५९ |
श्री कृष्णराव पाटील | १०६१०० |
विजयी उमेदवार श्री प्रकाश अबिटकर यांचे मताधिक्य – ३८२५९ |
७. श्री योगेश कदम
शिवसेनेचे नेते राज्यांचे माजी मंत्री श्री रामदास कदम यांचे चिरंजीव असलेले योगेश कदम हे तिसऱ्यांदा दापोली मधून विधानसभेवर निवडून आलेले आहेत .कोंकणातील अधिक चर्चेत असलेला हा मतदारसंघ ,यावेळची लढाई कदम कुटुंबासाठी अस्तित्वाची होती.यावेळी त्यांना बऱ्याच विरोधकांचा सामना करावा लागला होता पण उत्कृष्ट काम , जनसंपर्क यामुळे त्यांचा विजय अगदी सोप्या पद्धतीने साकार झाला .त्यात रामदास कदम यांचे Eknath Shinde यांच्या सोबत योग्य संवाद आहे . तरुण , अभ्यासू असलेले योगेश याआधी विविध समित्यांवर काम करत होते त्याच अनुभवामुळे त्यांना यावेळी Shivsena कडून राज्य मंत्रिपद मिळाले आहे.
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री योगेश कदम | १०५००७ |
श्री संजय कदम | ८०९१४ |
विजयी उमेदवार श्री योगेश कदम यांचे मताधिक्य -२४०९३ |
८. श्री आशिष जयस्वाल
Shivsena Minister List मधील दुसरे राज्यमंत्री म्हणुन ज्यांनी शपथ घेतली आहे असे आशिष जयस्वाल हे विदर्भातून येतात .जयस्वाल हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले आहेत .पेशाने वकील असलेले जयस्वाल यांनी कामांच्या जोरावर तसेच अभ्यासपूर्ण भाषणांमुळे विधानसभेत कायम चर्चिले गेले होते याच दृष्टीकोनातून आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून राज्य मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री आशिष जयस्वाल | १०७९६७ |
श्री राजेद्र मुळक | ८१४१२ |
विजयी उमेदवार श्री आशिष जयस्वाल यांचे मताधिक्य -२६५५५ |
९.गुलाबराव पाटील
Shivsena पक्षाचा आवाज कित्येक दशक भाषणामधून बुलंद करणारा नेता म्हणजे गुलाबराव पाटील अशी ओळख असलेले पाटील आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेवून राज्याचा कारभार पुन्हा एकदा पाहणार आहेत .खानदेशातील shivsena पक्षाचा हक्काचा आवाज असलेले पाटील याधी दोनदा पाणीपुरवठा मंत्री म्हणून राहिलेले आहेत .आता यावेळी त्यांना कोणत्या खात्याचे मंत्रिपद मिळते हे पाहण्यासारखे आहे .Shivsena Minister List मधील पाटील यांच्या माताधीक्याव्र थोडी नजर टाकूयात .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री गुलाबराव पाटील | १४३४४०८ |
श्री गुलाबराव देवकर | ८४१७६ |
विजयी उमेदवार श्री गुलाबराव पाटील यांचे मताधिक्य – ५९२३२ |
१०.संजय राठोड
Shivsena Minister List मधील पुढील नाव म्हणजे संजय राठोड ,विदर्भातील शिवसेनेच एक मोठा चेहरा .राठोड हे बंजारा समाजातून येतात .shivsena पक्षाकडून राठोड हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत .मागील सरकार मध्ये त्यांचे कॅबिनेट दर्जाचे पद होते .विधानसभा २००४ पासून ते विजयी होत आलेले आहेत ,त्यांच्या वर्षाच्या अनुभवावरून त्यांना पुन्हा एकदा आज मंत्रीपदाची संधी शिवसेना पक्षाकडून देण्यात आली आहे .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री संजय राठोड | १४३११५ |
श्री माणिकराव ठाकरे | ११४३४० |
विजयी उमेदवार श्री संजय राठोड यांचे मताधिक्य -२८७७५ |
११.संजय शिरसाट
Shivsena Minister List मधील पुढील आमदार छत्रपती संभाजीनगर सतत निवडून येत असलेले फायर ब्रांड आमदार २०१९ पासून मंत्रिपदासाठी इच्छुक होते , प्रत्येक वेळी काही तडजोडी मुळे त्यांची संधी जात होती .यावेळी मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांनी शब्द त्यांना दिला होता तो शिंदे यांनी पूर्ण करून दाखवला असे मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर संजय शिरसाट यांनी सांगितले .शिरसाट यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळाले आहे .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री संजय शिरसाट | १२२४९८ |
श्री राजू शिंदे | १०६१४७ |
विजयी उमेदवार श्री संजय शिरसाट यांचे मताधिक्य -१६३५१ |
विधानसभा २०२४ मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचे निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा
इतर विषयाबद्दल जाणून घेण्यसाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा
महिलांसाठी ६ सरकारी योजना २०२५ | https://shorturl.at/sYbKR |
नवनिर्वाचित १० महिला आमदार | https://shorturl.at/gfbHc |
निवडून आलेले सार्वात तरुण ८ आमदार | https://shorturl.at/nEkVL |
लाडकी बहिण योजना २०२५ | https://smartsahyadri.com/mukhyamantri-mazi-ladki-bahin-yojna-2024/ |
आमचे अधिकृत संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |