Shetkari Farmhouse Yojna शेतकरी फार्महाऊस योजना राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणारी आहे,शेतकऱ्यांना शेतातील उपकरण ठेवण्यासाठी सुरक्षित जागा नसते.
अनेकदा शेतकऱ्यांचे शेतीचे अवजार / उपकरण चोरी जाणे ,पिकांचे नुकसान होणे या गोष्टी सर्रास घडत असतात.याचाच विचार करून ने हि दिलासादायक योजना अंमलात आणली आहे .या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला आपल्या शेतात स्वतचे फार्महाऊस बांधू शकतो ,या बांधकामासाठी बँक शेतकऱ्याला कर्जस्वरूपात मदत करणार आहे .

Shetkari Farmhouse Yojna Information
शेतकरी फार्महाऊस योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीला व्यवसायिक रित्या समृद्ध बनवायचे याच मोठ्या दृष्टीकोनातून Shetkari Famrhouse Yojna 2025 अंमलात आणली आहे . याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य कर्ज पुरवठा करून शेतात फार्महाऊस बांधता येणार आहे . या योजनेमधून शेतकरी वर्गाला अनेक सुख सुविधा उपलब्ध होणार आहेत . कृषी टर्न लोन (ATL) याच्या माध्यामतून हे प्रमुख कर्ज उपलब्ध होईल.
योजनेचे प्रकार | थोडक्यात तपशील |
योजनेचे नाव | शेतकरी फार्महाऊस योजना (ATL ) |
पात्रता | -कमीतकमी २.५० एकर जमीन असावी -कर्ज हप्ते थकलेले नसावेत |
वयाची अट | किमान १८ वर्ष ते कमाल ६५ वर्ष |
कर्ज रक्कम | जमिनीनुसार -२ लाख ते ५० लाख पर्यंत |
व्याज दर | रुपये २ लाख ते १० लाख -१ वर्ष MCLR +०.०५ % रुपये १० लाख पेक्षा जास्त -१ वर्ष MCLR +०.०५%+२% -३ % |
शेतकऱ्याला भरावयाची रक्कम | बांधकामाच्या एकूण खर्चाच्या २५% रक्कम शेतकऱ्याला भरावी लागेल |
विम्याची आवश्यकता | ज्या लाभार्थीने कर्ज घेतले आहे त्याचे संपूर्ण मालमत्तेवर विम्याचे कवच आवश्यक |
कागदपत्रे | सातबारा ,८ अ ,पेन कार्ड ,आधार कार्ड ,सर्च रिपोर्ट ,बांधकामाचे बजेट ,आयकर भरलेला आवश्यक |
कर्जाची परतफेड | तिमाही ,सहामाही किंवा वार्षिक यापद्धतीने तुम्ही हप्ते करून रक्कम भरू शकता |
कर्जाची मंजुरी कश्याप्रकारे होते | शेतीच्या उत्पन्नावर तसेच शेतीच्या आकारावर कर्ज प्रक्रिया /मंजुरी मिळते |
ATL कृषी मुदत कर्ज
- कृषी मुदत कर्ज म्हणजे शेतकऱ्यांना ज्या जमिनीवर घर बांधायचे आहे त्यसाठी जे कर्ज उपलब्ध होते त्याला ATL अर्थात कृषी मुदत कर्ज म्हंटल जात .
- याच्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगल पक्क ,आरामदायी घर उपलब्ध होणार आहे .
- शेतीमध्ये पिकलेले धान्य ,उपकरण ,शेळी मेंढ्या ठेवण्य्साठी जागा,धान्य सुकवण्यासाठी जागा या फार्महाऊस योजनेंतर्गत उपलब्ध होणार आहे.
Shetkari Farmhouse Yojna 2025 वैशिष्ट्ये
- बँक ऑफ महाराष्ट्र यांनी सुरु केलेली हि योजना शेतकऱ्यांना वरदान ठरणारी असणार आहे .
- या योजनेसाठी शेतकऱ्याला कर्जफेड करण्यासाठी दिर्घकालीन मुदत दिलेली आहे .
- कर्जफेडीची मुदत मोठी असल्याने शेतकऱ्याच्या आर्थिक सामाजिक जिवनावर कुठलाच परिणाम होणार नाही .
- विशिष्ठ अटी पूर्ण केल्यानंतरच या योजनेची उपलब्धता शेतकऱ्याला होणार आहे .
- शेतकरी वर्गाला त्यांची शेती व्यावसायिक पद्धतीने करणे आवश्यक आहे .
- जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात भरमसाठ वाढ होईल आणि गावपातळीवर विकासाला चालना मिळण्यास मदत होईल .
शेतकरी फार्महाऊस योजना पात्रता
Shetkari Farmhouse Yojna यासाठी खालील गोष्टी असतील तर लाभार्थी योजनेस पात्र असेल .
- अर्ज करणारा शेतकरी हा स्वतंत्र शेती म्हणजेच स्वतःची शेती असणारा असावा.
- Shetkari Farmhouse योजनेसाठी शेतकऱ्याकडे किमान २.५ एकर शेती असायला हवी .
- स्वतःच्या शेतीतून किंवा शेतीमध्ये मध्ये असलेल्या व्यवसायातून योग्य पद्धतीने आर्थिक उत्पन्न येत असावे .
- अर्जदार शेतकऱ्याने मागील किमान ३ हप्ते थकविलेले नसावेत .
- अर्जदार शेतकऱ्याचे एकाच बँकेत खाते असावे व एकाच बँकेचे कर्ज असावे .
- अर्जदार हा किमान १८ वर्ष वय पूर्ण केलेला असावा .
- अर्जदाराचे वय ६५ वयापेक्षा जास्त नसावे ,किंवा वय वर्ष ६५ पेक्षा जास्त असल्यास उत्पन्न स्र्तोत जो असेल त्याचे प्रमाणपत्र आवश्यक .
Shetkari Farmhouse Yojna 2025 कागदपत्रे
Shetkari Farmhouse Yojna साठी खालील कागदपत्रे आवश्यक असतील .
- अर्जदार व्यक्तीच्या जमिनीचा सातबारा
- ८ अ
- जर लाभार्थी शेतकरी नोकरी किंवा शेती व्यवसाय करत असेल तर आयकर भरलेला असावा
- आधार कार्ड
- पेन कार्ड
- रहिवाशी दाखला
- सर्च रिपोर्ट
- बांधकामाचे एकूण बजेट
- लोन अर्ज -१३८
Shetkari Farmhouse Yojna 2025 बँक ऑफ महाराष्ट्र
- शेतकऱ्याचा आर्थिक सामाजिक विकास वाढवा यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ने हि योजना अंमलात आणली आहे .
- या योजनेतून शेतकऱ्याला शेतीच्या जवळ स्वतच farmhouse बांधण्यासाठी चांगल्या व्याजदरावर कर्ज पुरविले जाते .
- शेतीचे संरक्षण तसेच शेतकऱ्याला शेताच्या जवळ राहता यावे हा या योजनेमागील उद्देश .

शेतकऱ्यांना लाभ काय ?
- या योजनेमधील शेतकऱ्यांना जर शेतातच राहायला घर मिळाले तर शेतकरी वर्गाला आपल्या सर्व शेतीच्या गरजा पूर्ण करू शकेल .
- कमीतकमी वेळात अधिक काम शेतातील होऊ शकतात
- शेतीमधील उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल
- या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य सुधारण्यास मदत होणार आहे .
Shetkari Famhouse Yojna फायदे
- शेतकऱ्याचे शेतीचे उपकरण /अवजार सुरक्षित राहण्यासाठी शेतकरी फार्महाऊस गरजेचे आहे
- शेतकऱ्याला शेतात पिकलेल्या धान्याचे साठवण करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो .
- ऊन ,वारा ,पाऊस यांच्यापासून संरक्षण होईल .
- पावसाळ्यात अचानक येणाऱ्या पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी हे फायद्याचे ठरणार आहे .
Shetkari Farmhouse Yojna कायदेशीर बाबी
- महाराष्ट्र राज्याने बनवलेल्या नियमानुसार शेतकरी फार्महाऊसच्या बांधकामासाठी रीतसर परवानगी घेणे आवश्यक .
- फार्महाऊस बांधण्या अगोदर वकिलांकडून सर्च रिपोर्ट घेणे आवश्यक आहे.

Shetkari Farmhouse Yojna 2025
Shetkari Farmhouse Yojna नियम व अटी
- सदरचे shetkari farmhouse बांधकामासाठी शेतकऱ्याला जमीन NA (एन ए )करण्याची गरज नसते .
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे या योजनेसाठी केवायसी करणे गरजेचे आहे
- सदरील शेतकऱ्याच्या शेतीचे रजिस्टर ,उप रजिस्टर करणे तसेच त्या जमिनीचे मुल्यांकन करणे गरजेचे आहे तसेच त्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- सदरच्या शेतकरी फार्महाऊस साठी शेतकऱ्याचे कर्जाचे हप्ते ,तसेच त्या कर्जाची परतफेड करण्याची आर्थिक स्थिती असणे आवश्यक आहे .
- सदरील शेतकऱ्याने सरकारचा आयकर भरला नसेल तर त्याला तहसीलदार यांच्याकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही .
फार्महाऊस विमा आवश्यक
अर्जदार शेतकऱ्याला या योजनेसाठी संपूर्ण मालमत्तेचा विमा उतरावा लागेल, ज्या जमिनीवर शेतकरी बांधकाम करणार आहे त्या जमिनीवर काही अपरिहार्य घडल्यास त्या सर्व घेतलेल्या कर्जाला सुरक्षा कवच प्राप्त होत असते
कर्ज परतफेड कधी करावी ?
-कर्जाची परतफेड हि कर्जाची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर पुढील १८ महिन्याच्या आतच कर्जाची रक्कम परतफेडीची सुरवात करावी लागते .
-शेतकऱ्याला कर्जाची परतफेड करण्यासाठी तिमाही,सहामाही ,वार्षिक किंवा मासिक स्वरुपात करता येईल.
-शेतकरी फार्महाऊस योजनेच्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी १५ वर्षांपर्यंत असू शकतो .
कर्जाचे तारण
शेतकरी फार्महाऊस योजना अंतर्गत कर्ज घ्यावयाचे असल्यास तारण ठेवणी आवश्यक –
- कर्जाच्या तारणसाठी दोन जामीनदार आवश्यक ,त्यांचे कागदपत्रे सुद्धा आवश्यक आहे .
- शेतकऱ्याला फार्महाऊस ज्या जमिनीवर बांधायचे आहे त्या जमिनीला कर्जासाठी तारण म्हणून ठेवावे लागेल .
बँकेच्या व्याजदराची माहिती
फार्महाऊस योजनेसाठी शेतकऱ्याला स्वतःच्या जवळील २५% खर्च करावा लागतो तसेच बँकेचे कर्ज जेंव्हा मिळते तेंव्हा बँकाही काही स्वतःचे मार्जिन घेत असते.
व्याजदर माहिती
- २ लाख ते १० लाख -१ वर्षाचा MCLR +BSS @ ०.५० %+२.०० %
- १० पेक्षा अधिक -१ वर्षाचा MCLR +BSS @ ०.५० %+३.००%
शेतकरी फार्महाऊस योजना निष्कर्ष
शेतकरी फार्महाऊस योजना शेतकऱ्याच्या शेताची राखण करण्यासाठी , पिकाच्या संरक्षणासाठी ,अवजारांच्या /उपकरणाच्या संरक्षणासाठी ,शेतकऱ्याच्या कुटुंबाला राहण्यासाठी या योजनेतून एक चांगले ,पक्के घराचे स्वप्न आता पाहता येवू शकते .या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय कागदपत्रे लागतील ,बाकीच्या आवश्य बाबी काय लागतील हे सर्व वरील मुद्द्यांमध्ये संक्षिप्त दिलेले आहे .
शेतकरी फार्महाऊस योजना अधिकृत संकेतस्थळ तसेच टोल-फ्री क्रमांक
शेतकरी फार्महाऊस योजना ( बँक ऑफ महाराष्ट्र ) | https://bankofmaharashtra.in/mar/farmhouse-agriculturists-scheme |
इतर सरकारी योजना वाचाण्य्साठी खालील संकेतस्थळ पाहावे
सरकारी योजनेचे नाव | संकेतस्थळ |
तुकडा बंदी कायदा 2025 | https://shorturl.at/9btGw |
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2025 | https://shorturl.at/1kGlw |
महाडीबीटी शेतकरी योजना 2025 | https://shorturl.at/tio4g |
मागेल् त्याला सौर पंप 2025 | https://shorturl.at/uiZYe |
पीएम किसान योजना | https://shorturl.at/edLoj |
प्रधानमंत्री किसान योजना 2025 | https://shorturl.at/Tu2Yt |
मुख्यमंत्री सहाय्यता निधी 2025 | https://shorturl.at/EqFBH |
आमचे अधिकृत संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |
सतत विचारले जाणारे प्रश्न
१.शेतकरी फार्महाऊस बांधकामासाठी कर्जाची जास्तीत जास्त रक्कम किती आहे ?
– कर्जाची जास्तीत जास्त रक्कम हि ५० लाख आहे ,हे जमीनधारकेनुसार ठरवली जाते .
२.कर्जाची परतफेड कधीपर्यंत करता येवू शकते ?
-कर्जाची परतफेड हि १५ वर्षापर्यंत ठरवली गेलेली आहे ,ज्यामध्ये सुरवातीला १८ महिने मुदत ठरवून दिलेली आहे .
३.फार्म हाऊस कर्जासाठी व्याजदर काय ठरवला गेलेला आहे ?
-१० लाखापर्यंत १ वर्ष MCLR +०.०५% व्याजदर +२ % ,तर १० पेक्षा अधिक असेल तर १ वर्ष MCLR + ०.०५%+३% व्याजदर .
४.या योजनेतून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची वयोमर्यादा काय आहे ?
-या योजनेत कमीत कमी वय वर्ष १८ ते जास्तीत जास्त ६५ वय वर्ष मर्यादा सरकारने ठरवून दिलेल्या आहेत .
५. योजनेच्या कर्जाची परतफेड कश्याप्रकारे होऊ शकते ?
-कर्जाची परतफेड हि मासिक ,तिमाही,सहामाही,वार्षिक पद्धतीने १५ वर्षापर्यंत केली जाऊ शकते.
६. शेतकरी फार्महाऊस योजनेची कर्ज मंजुरी कश्या पद्धतीने होते ?
-शेतीमधील एकूण उत्पन्न तसेच शेतीच्या आकारानुसार कर्ज मंजुरी केली जाते .
७.शेतकरी फार्महाऊस साठी शेतकऱ्याला कोणत्या अटींची पूर्तता करावी लागेल ?
– शेतकऱ्याला स्वतची अडीच एकर शेती असावी तसेच त्याच्या शेतीमधून काहीतरी व्यवसायिक आर्थिक स्थिरता असणे आवश्यक आहे ,आधीचे कर्ज हप्ते थकलेले नसावेत .
८.या कर्जासाठी शेतकऱ्याकडे किती % रक्कम ( मार्जीन )आवश्यक आहे ?
-कर्जासाठी शेतकऱ्याकडे २५% रक्कम असणे आवश्यक आहे .
९.शेतकरी फार्महाऊस साठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत ?
-सातबारा ,८ अ , आयकर भरलेले पत्र ,आधार कार्ड ,पेन कार्ड ,सर्च रिपोर्ट , बांधकामाचे एकूण बजेट हे सर्व आवश्यक आहे .
१०.कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला कोणती गोष्ट सुरक्षा म्हणून ठेवावी लागते ?
-कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला शेतीमध्ये बांधकाम करण्यासाठी मोर्गेज ठेवावे लागेल , तसेच २ जामीनदार व्यक्ती यावेळी लागतील .