Rashtrawadi Minister 2024 नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष हा सर्वांच्या तुलनेत तिसऱ्या स्थानी राहिला. लोकसभेला प्रचंड अपयश असताना पक्षाने ३/४ महिन्यात जी भरारी घेतली ती वाखण्याजोगी आहे . पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने तळागाळात जावून लोकांचा संपर्क वाढवला त्याचाच फायदा त्यांना निवडणुकीत झाला.लाडकी बहिण योजनेमुळे खऱ्या अर्थाने या पक्षाला मोठा आधार मिळाला आहे असे अजित पवार यांनी निकाल लागल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. महायुती मध्ये असलेले अजित पवार यांनी एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगला सुसंवाद राहिल्यामुळे सर्वांनाच याचा फायदा झालेला आपल्याला दिसला . शपथविधी सोहळ्यात एकुण ३९ मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली होती. यात ३४ कॅबिनेट तर ५ राज्यमंत्री म्हणून शपथ घेण्यात आली. यात भाजपचे १९ मंत्री शिवसेनेचे ११ मंत्री तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कडून ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
श्री छगन भुजबळांना मंत्री पद नाहीच !
Rashtrawadi जेष्ट नेते नेते श्री छगन भुजबळ म्हणजे सर्वात वयस्कर आमदारांपैकी एक असलेले आमदार, वयाची ८० ओलांडलेल्या भुजबळ यांनी आतापर्यंत मुंबई मधुन दोनदा आणि येवला नाशिक मधुन सलग चौथ्यावेळी ते विधानसभेवर निवडून आलेले आहेत शिवाय २ वेळा ते विधानपरिषदेवर सुद्धा निवडून गेले आहेत. शिवसेनेतून आपली कारकीर्द सुरू करणारे भुजबळ यांनी आतापर्यंत बरीच पद उपभोगली आहेत नगरसेवक पासुन ते थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल त्यांनी मारलेली आहे , शिवसेनेतील संबंध ताणल्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला पूढे जावून ते शरद यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये आले . अनेक पद पवारांनी त्यांना दिली , वर्षापूर्वी जेव्हा पक्षात फुट पडली तेंव्हां भुजबळ श्री अजित पवार यांच्यासोबत गेले. पक्षाने त्यांना शिंदे सरकार मध्ये मंत्रीही केले .नुकत्याच झालेल्या विधानसभेत पुन्हा निवडून आलेल्या भुजबळांना मात्र यावेळी मंत्रीपदापासुन दुर ठेवण्यात आले. पक्षाने वयाचा विचार करता नवीन उमद्या तरुणांना संधी दिली जाईल अन् ज्येष्ठ वयस्कर आमदारांना पक्ष संघटनेत काम करण्याची संधी देण्यात येईल असे सांगितलेले असताना सुद्धा भुजबळ नाराज अश्या चर्चांना पेव फुटलेले आपण पाहिले आहे. मंत्रीपदाची संधी हुकलेल्या भुजबळांना आगामी काळात Ajit Pawar पक्ष म्हणुन काय जबाबदारी देतात हे पाहण्यासारखे असेल. असो तूर्तास आपणं राष्ट्रवादीकडून मंत्री झालेल्या आमदारांबद्दल जाणुन घेवुयात.
Rashtrawadi Minister List राष्ट्रवादीचे ११ मंत्री यादी
Rashtrawadi Minister List ९ मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे –
मंत्री महोदयांचे नाव | मतदारसंघ |
श्री नरहरी झिरवळ | दिंडोरी |
श्री माणिकराव कोकाटे | सिन्नर |
श्री दत्तात्रय भरणे | इंदापूर |
श्री मकरंद जाधव-पाटील | वाई -खंडाळा |
श्री बाबासाहेब पाटील | अहमदपुर |
श्री हसन मुश्रीफ | कागल |
अदिती तटकरे | श्रीवर्धन |
श्री धनंजय मुंडे | परळी |
श्री इंद्रनील नाईक | पुसद |
१.श्री नरहरी झिरवळ
Rashtrawadi Minister List 2024 मधील सर्वात पाहिलं नाव आहे नरहरी झिरवळ ,नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी दिंडोरी मतदारसंघातून पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्याने बाजी मारत विधानसभेत पोह्चले आहेत.यापूर्वी २०१९ ला निवडून आल्यानंतर त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष करण्यात आले होते ,त्यावेळी त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पेलली होती .राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तब्बल ४१ उमेदवार निवडून आलेले होते . दिंडोरी मतदारसंघातून सलग ४ वेळा निवडून येण्याचा पराक्रम करणारे झिरवाळ यांना यावेळी Ajit Pawar यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देत Rashtrawadi Minister मध्ये सर्वात वरिष्ट म्हणून मोठी जबाबदारी दिली . नरहरी झिरवाळ यांच्या विधानसभा २०२४ मध्ये पडलेल्या मतांवर एक नजर टाकूया .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री नरहरी झिरवाळ | १३८६२२ |
सौ चारोस्कर सुनिता | ९४२१९ |
विजयी उमेदवार श्री नरहरी झिरवाळ यांचे मताधिक्य -४४४०३ |
२. माणिकराव कोकाटे
Vidhansabha 2024 मध्ये सिन्नर मतदारसंघातून निवडून आलेले माणिकराव कोकाटे सुरवातीपासून पवार घराण्याशी एकनिष्ठ आहेत .सिन्नर विधानसभा मधून तब्बल ५ वेळा कोकाटे निवडून आलेले आहेत .तरुण वयात कॉंग्रेस मधून सुरवात केलेले कोकाटे पुढे जावून शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले , नंतर ते उमेदवारी न मिळाल्या मुले काही काळ शिवसेनेत गेले नंतर पुन्हा ते स्वगृही राष्ट्रवादीत परतले. अन २०१९ ला पुन्हा राष्ट्रवादी मधून आमदार झाले .अजित दादा वर असलेला विश्वास यामुळेच त्यांना यावेळी कॅबिनेट मंत्रीपदाची संधी Rashtrawadi Minister कडून मिळाली .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री माणिकराव कोकाटे | १३८५६५ |
श्री उदय सांगळे | ९७६८१ |
विजयी उमेदवार श्री माणिकराव कोकाटे यांचे मताधिक्य -४०८८४ |
३.श्री दत्तात्रय भरणे
Rashtrawadi Minister 2024 मधील पुढील आमदार म्हणजे दत्तात्रय भरणे ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासु असलेले सहकरी आहेत .इंदापूर मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेले भरणे तीन वेळा श्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करत विधानसभेत पोहचले आहेत.यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत प्रवीण माने यांनीही जवळपास ३३ हजार एवढी मत घेतली.बारामती आणि इंदापूर मतदारसंघ शेजारी शेजारी असल्याने Ajit Pawar यांचे खास लक्ष होते.पुणे जिल्ह्यात आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे याकरिता त्यांनी कायमच दत्ता मामा भरणे यांना मंत्रिपद देवून ताकद दिलेली आहे .मागील काळात चांगल्या कामामुळे दत्ता मामा यांना यावेळी सुधा मंत्रीपदाची लॉटरी Ajit Pawar दिली
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री दत्तात्रेय भरणे | ११७२३६ |
श्री हर्षवर्धन पाटील | ९७८२६ |
विजयी उमेदवार श्री दत्तात्रेय भरणे यांचे मताधिक्य -१९४१० |
४.मकरंद जाधव-पाटील
vidhansabha २०२४ मध्ये सातारा जिल्ह्यात महायुतीला जनेतेने मोठ्या प्रमाणावर डोक्यावर घेतलेले आपण पाहिले .महायुतीने सातारा जिल्ह्याला ४ मंत्रिपद देवून एकप्रकारे सन्मानच केला आहे .पाटण मधून शंभूराज देसाई, माण मधून जयकुमार गोरे, सातारा मधून छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे मंत्री झालेले आहेत अन राष्ट्रवादी कडून वाई तालुक्याला अर्थात श्री मकरंद पाटील यांना Ajit Pawar यांनी मंत्रीपदाची संधी यावेळी दिलेली आहे.वाई मात्दार्संघ्तून सलग चौध्यांदा ते विधासाभेव्र निवडून गेलेलं आहेत .त्यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हे सुधा खासदार राहिलेले आहेत .पाटील हे २००९ ला प्रथम Vidhansabha वर निवडून गेलेले होते .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री मकरंद पाटील | १४०९७१ |
सौ अरुणादेवी पिसाळ | ७९५७९ |
विजयी उमेदवार श्री मकरंद पाटील यांचे मताधिक्य -६१३९२ |
५.बाबासाहेब पाटील
Vidhansabha 2024 मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून मंत्रीपदाची शपथ घेताना सर्वाना धक्कादायक वाटणार नाव म्हणजे बाबासाहेब पाटील ,पाटील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत .विधानसभा २०१९ सुधा त्यांनी राष्ट्रवादी कडून लढवली अन जिंकलीही होती. तिसऱ्यांदा आमदार झालेले पाटील यांना यावेळी मंत्रिपद देऊन मराठवाड्याचा सन्मान केलेला आहे यांच्यारूपाने मराठवाड्यात प्रलंबित काम मार्गी लागतील अन पक्षही वाढेल याच अनुषंगाने त्यांना पक्षाचे नेते ajit pawar यांनी मंत्रिपद दिले आहे अशी सामान्य जनतेमध्ये भावना आहेत .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री बाबासाहेब पाटील | ९६९०५ |
श्री विनायक जाधव पाटील | ६५२३६ |
विजयी उमेदवारा श्री बाबासाहेब पाटील यांचे मताधिक्य -३१६६९ |
६.हसन मुश्रीफ
Rashtrawadi साठी पश्चिम महाराष्ट्र मधील मोठ नाव म्हणजे कागलचे आमदार हसन मुश्रीफ ,सलग सहाव्यांदा राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आलेले हसन मुश्रीफ राष्ट्रवादी सत्तेत आल्यावर मंत्रिपदावर असतात हे जणू समीकरणच झालेले आहे.यावेळी झालेलेया अटी-तटीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारत शरद पवार पक्षाचे श्री समरजितसिंह घाटगे यांना पराभवाची धूळ चारली.विधानसभा २०१९ मध्ये अल्पशा मताने पराभव झालेले घाटगे यावेळी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले खाते पण त्यांना विजय खेचून आंत आला नाही अन पुन्हा आमदारकी मुश्रीफ यांच्याकडेच राहिली .पक्षाची प्रामाणिक असलेले मुश्रीफ यावेळी मंत्रिपदाचे दावेदर सुरवातीपासूनच होते .Rashtrwadi Ministers List अग्रणी असलेले मुश्रीफ शपथ घेताना सुद्धा पहिल्या ५ जणांमध्ये होते . .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री हसन मुश्रीफ | १४५२६९ |
श्री समरजितसिंह घाटगे | १३३६८८ |
विजयी उमेदवार श्री हसन मुश्रीफ यांचे मताधिक्य -११५८१ |
७.अदिती तटकरे
Rashtrawadi Minister मधील मोठे नाव तटकरे ,राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष असलेले खासदार श्री सुनील तटकरे यांच्या कन्या असलेल्या अदिती तटकरे दुसऱ्यांदा श्रीवर्धन येथून आमदार म्हणून विधानसभेत पोहचल्या आहेत .त्या अवघ्या ३६ वर्षाच्या आहेत . मागील पंचवार्षिक मध्ये म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा त्या मंत्रीपदी विराजमान होत्या. त्यांच्याकडे महिला बालकल्याण खाते होते . उच्चशिक्षित असलेल्या अदिती यांनी मागील काळात उत्तम केल्याने त्यांना याही वेळी Rashtrawadi Ministers List मध्ये घेण्यात आले आहे .श्रीवर्धन मतदारसंघ २००९ पासून हा मतदारसंघ तटकरे कुटुंबाकडेच आहे .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
अदिती तटकरे | ११६०५० |
अनिल नवघणे | ३३२५२ |
विजयी उमेदवार अदिती तटकरे यांचे मताधिक्य -८२७९८ |
८.श्री धनंजय मुंडे
VIdhansabha २०२४ मध्ये सर्वाधिक मतांनी जिंकणाऱ्या पहिल्या ५ आमदारांमध्ये मुंडे यांचे नाव आहे .मुंडे घराण्याचा परंपरागत मतदारसंघ आहे .या मतदारसंघाला मोठी परंपरा आहे.येथून कित्येकवेळा श्री गोपीनाथ मुंडे यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे .बीड लोकसभेत येणारा हा परळी मतदारसंघ .येथून २००९ ,२०१४ मध्ये पंकजा मुंडे निवडून आल्या होत्या नंतर २०१९ मध्ये पंकज मुंडेंचा पराभव करत धनजंय मुंडे पहिल्यांदा विधानसभा आमदार झाले होते .यावेळी त्यांच्यासमोर शरद पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख उभे होते ,अतिशय संवेदशील झालेला हा मतदारसंघ प्रशासनाचा घाम फोडत होता .अतिशय संवेदनशील स्थिती मध्ये पार पडलेल्या vidhansabha निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी तब्बल लाखभर मतांनी बाजी मारली आहे .Ajit Pawar यांचे पहिल्यापासून खास असलेले मुंडे याही वेळी मंत्रिमंडळात कॅबिनेट पदी दिसले आहेत ,येत्या काळात त्यांचाकडे कोणत्या खात्याची जबाबदारी जाईल हे पाहण्यासारखे असेल .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री धनंजय मुंडे | १९३३५५ |
श्री राजेसाहेब देशमुख | ५४१४६ |
विजयी उमेदवार श्री धनंजय मुंडे यांचे मताधिक्य -१३९२०९ |
९.इंद्रनील नाईक
Rashtrawadi Minister List मधील पुढील नाव आहे इंद्रनील नाईक यांचे .पुसद मातासंघातून निवडून आलेले नाईक यावेळी मंत्रिमंडळात ajit pawar यांच्या मान्यतेने राज्यमंत्री म्हणुन दिसतील .तरुण असलेले नाईक बंजारा समाजातून येतात .राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे ते नातू आहेत त्यांचे वडील मनोहर नाईक हे सहा वेळेस विधानसभेवर निवडून आलेले होते.अतिशय तरुण असलेले नाईक हे उच्चशिक्षित आहेत .विधानसभेत यावेळी यंग ब्रिगेड जास्त प्रमाणात घेण्यात आली आहेत, ३ राज्यमंत्री असलेल्या या मंत्रिमंडळात भाजपने ३ तर शिवसेना व Rashtrawadi ने १-१ असे सर्व मिळून ५ राज्यमंत्री म्हणून घेतले आहेत.
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री इंद्रनील नाईक | १२७९६४ |
श्री शरद मैंद | ३७१९५ |
विजयी उमेदवार श्री इंद्रनील नाईक यांचे मताधिक्य -९०७६९ |
इतर मंत्र्यांचे निवडणुकीतील मताधिक्य जाणून घेण्यसाठी खालील संकेतस्थळास भेट द्यावी
सरकारी योजनांची माहिती व इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळ पहावे
शिवसेना एकनाथ शिंदे यांचे मंत्री | https://shorturl.at/4ewzM |
महाराष्ट्र विधानसभा नवनिर्वाचित १० महिला आमदार | https://shorturl.at/gfbHc |
महाराष्ट्र विधानसभा सर्वात तरुण ८ आमदार | https://shorturl.at/nEkVL |
लाडकी बहिण योजना २०२५ | https://smartsahyadri.com/mukhyamantri-mazi-ladki-bahin-yojna-2024/ |
महिलांसाठी ६ योजना | https://shorturl.at/sYbKR |