PM Kisan Yojna प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना 2024

PM Kisan Yojna प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना 2024 कृषिप्रधान असलेला आपला भारत देश ,या देशात शेतकऱ्याला अन्नदाता अर्थात देवाचीच उपमा मिळालेली आहे. राज्यकर्त्यांपासून आजपर्यंत शेतकऱ्याचा सन्मान म्हणावा तेवढा झालेलाच नव्हता अस म्हंटल तर वावग ठरणार नाही , देशात एका ध्येयाने स्थापन झालेले श्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांना समृध्द तसेच त्यांना काळी मातीची सेवा करत असल्याबद्दल त्यांचा सन्मान करावा असा विचार केला अन त्यातूनच केंद्र सरकारने विशिष्ठ ध्येय-धोरणे ठरवून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना हि १ डिसेंबर २०१८ रोजी लागू करण्यात आली होती पण देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी या योजेनेची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने २४ फेब्रुवारी २०१९ या दिवसांपासून करण्यास परवानगी दिली. देशातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी ६००० रुपये या प्रमाणे PM Kisan Yojna खात्यावर पैसे जमा केले जातात.


प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना माहिती

योजनेचे नाव प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना / PM Kisan
कधी पासून योजना लागु झालीदिनांक १ डिसेंबर २०१८
कधी पासून योजना अंमलात आणली दिनांक २४ फेब्रुवारी २०१९
योजनेचे लाभार्थी कोण असतील २ हेक्टर जमीन (अट रद्द करण्यात आली आहे )
PM Kisan मधुन किती लाभ मिळणार दरवर्षी रुपये ६०००
योजनेचा लाभ कसा मिळतो वर्षाचे ३ हप्ते याप्रमाणे प्रत्येक ४ महिन्यांना २००० रुपये
लाभार्थी संख्या जवळपास १५ कोटी

पीएम किसान योजना उद्देश

पीएम किसान योजना हि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आंधार देणारी ठरलेली आहे ,प्रचंड मानसिकतेतून जाणारा भारतीय शेतकरी आज समाधानाने चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून नवीन उभारी घेताना आपण पाहतोय ,शेतकऱ्यांना वरदायिनी ठरलेली PM Kisan योजना आज यशस्वी झालेली आपण पाहतोय , सरकारच्या या निर्णयामुळे कित्येक गरीब शेतकरी कुटुंब शेतात वेगवेगळी प्रयोग करायला लागली आहेत,त्यातून ती कुटुंब यशस्वी पण झालेली आहेत.सुरवातीला असणारी २ हेक्टर पर्यंतची असणारी अट केंद्र सरकारने अट शिथिल केलेली असल्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबाना या योजनेचा फायदा घेता येतोय. ‘कितीही संकटे आली तरी पहाडासारखा उभा राहणारा शेतकरी‘ आज देशाला , जगाला जगवतोय त्याचेच काही अंशी ऋण कमी करावे म्हणून देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी या योजनेत कित्येकदा शिथिलता आणली जेणेकरून सामान्यत सामान्य शेतकऱ्याला सरळ लाभ/ फायदा झाला पाहिजे अशी यामागची शेतकऱ्याप्रती भावना अथवा उद्देश सरकारचा होता .


पीएम किसान योजना : पात्रता

  • पीएम किसान योजनेत प्रथमतः लाभार्थी हा भारतीय नागरिकत्व असणारा पाहिजे.
  • ज्या लाभार्थीकडे शेतीयोग्य जमीन असेल ते योजनेस पात्र असतील.
  • १ जानेवारी २०१९ पूर्वी घेतलेली जमीन असेल तरीही ते या योजनेस पात्र असतील.
  • लाभार्थी कडे आधार कार्ड असणे आवश्यक.
  • आधार कार्ड बँकेशी सलंग्न असणे आवश्यक.

पीएम किसान योजना : अपात्रता

  • पीएम किसान योजना हि फक्त ज्या शेतकऱ्यांकडे जमीन त्यांच्यासाठीच असेल
  • जे शेतकरी आयकर भरत असतील ते या योजनेसाठी अपात्र असतील.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना लाभ

पीएम किसान योजने अंतर्गत ज्यांनी अर्ज करून पात्र ठरलेले असतील त्यांना प्रतिवर्षी रुपये ६००० याप्रमाणे रक्कम खात्यावर जमा होईल .वर्षाचे ३ भाग याप्रमाणे प्रत्येक ४ महिन्यांनी रुपये २००० चा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत राहील. या योजनेचा चुकीच्या पद्धतीने अथवा खोटी कागदपत्रे सादर करून गैर फायदा घेतल्यास भारतीय दंड संहिता नुसार कायदेशीर कारवाईला अथवा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल .पीएम किसान योजनेत आपण पात्र ठरल्यास आपण आपोआप नमो शेतकरी योजनेस सुद्धा पात्र होता.नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला कुठलीही प्रक्रिया करण्याची गरज नसते. महाराष्ट्रात पीएम किसान योजना लाभ तब्बल १ कोटी २० लाख शेतकऱ्यांना मिळाला आहे . ३२००० करोड रुपये शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेतून देण्यात आले आहेत ,हा लाभ घेण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे . नुकतचं ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी योजनेचा १८ वा हप्ता महाराष्ट्र मधील वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेवून जाहीर केला होता .हा लाभ तब्बल ९.४ करोड शेतकऱ्यांना देण्यात आला होता , प्रत्येकाच्या खात्यावर त्यावेळी रुपये २००० जमा करण्यात आले होते.


PM Kisan Yojna कागदपत्रे

PM Kisan Yojna अर्ज करण्याच्या वेळी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :-

  • आधार कार्ड
  • भारतीय नागरिकत्व असलेले प्रमाणपत्र
  • स्वतःच्या जमिनीचे कागदपत्रे
  • बँकेचे पासबुक

PM Kisan Yojna मधुन कोणाला वगळले आहे ?

  • आजी-माजी लोकसभा राज्यसभा सदस्य
  • आजी-माजी विधानसभा विधानपरिषद सदस्य
  • जिल्हा-परिषद अध्यक्ष
  • ज्यांच्याकडे संवैधानिक पद आहे असे सदस्य
  • महानगरपालिकेचे आजी -माजी महापौर
  • स्थानिक संस्थेमध्ये असलेले कर्मचारी
  • केंद्र व राज्य संस्थामध्ये काम करत असलेले अधिकारी , कर्मचारी
  • राज्यातील आजी माजी मंत्री महोदय
  • आयकर भरणारे कुटुंब या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना साठी पात्र ठरणार नाही.
  • वकील ,डॉक्टर , सीए या व्यवसाय संबधी असणारे कुटुंब अपात्र असतील.
  • सेवेतून निवृत्त झालेले , तसेच निवृत्ती नंतर पेंशन म्हणून जर रुपये १०००० पेक्षा जास्त असेल तर ते कुटुंब या PM Kisan योजनेस पात्र नसतील .

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना अर्ज कसा करावा

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया करावी :-

  • प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी सरकारच्या अधिकृत संकेत स्थळाला https://pmkisan.gov.in/ भेट द्या
  • संकेतस्थळावर उजव्या बाजुला ‘नवीन शेतकरी नोंदणी ‘ असेल त्यावर क्लिक करावे.
  • समोर फॉर्म उघडल्यानंतर आपले नाव, मोबाईल क्रमांक , आधार कार्ड क्रमांक टाकावा.
  • त्यानंतर आपल्या बँक खात्याशी संबधीत सर्व गोष्टी भराव्यात .
  • सर्व गोष्टी अचूक भरल्या कि नाही ते एकदा पहावे.
  • सर्व अचूक असेल तर आपला फॉर्म सबमिट करावा .
  • अश्या प्रकारे आपण आपली संपूर्ण नोंदणी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पुर्ण केलेली आहे

पीएम किसान योजना खात्याची स्थिती कशी पहावी

  • पीएम किसान योजनेची स्थिती पाहण्यासाठी सुरवातीला शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/ यावर जावे .
  • उजव्या बाजूला आपल्याला ‘Know Your Status ‘असे दिसेल त्यावर क्लिक करावे .
  • त्यानंतर सुरवातीला अर्ज करतेवेळी नोंदवलेला मोबाईल क्रमांक , तसेच कॅप्चा आपल्याला टाकावा लागेल
  • अश्याप्रकारे आपल्याला PM Kisan या योजनेची आपली सध्याची स्थिती काय आहे हे पाहता येईल.

PM Kisan E-KYC प्रक्रिया

  • PM Kisan E -KYC प्रक्रिया साठी प्रथमतः आपल्याला अधिकृत संकेतस्थळ यावर जावे लागेल.
  • समोर दिसत असलेल्या Former Section वरती दिसत असलेल्या E-KYC यावर क्लिक करावे लागेल
  • E-KYC वरती क्लिक करून आल्यानंतर खालील रकान्यात आधार कार्ड क्रमांक टाकावा आणि search वरती क्लिक करावे

पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता कधी मिळणार ?

  • PM Kisan योजनेचा १९ वा हप्ता लाभार्थ्याला फेब्रुवारी २०२५ मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे ,शासनाकडून याबद्दलची तारीख लवकरच कळवली जाईल.

पीएम किसान योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळाचा वापर करावा

PM Kisan अधिकृत संकेतस्थळhttps://pmkisan.gov.in/
PM Kisan अधिकृत एप्लीकेशनhttps://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.pmkisan
PM Kisan योजना मार्गदर्शिका https://pmkisan.gov.in/Documents/RevisedPM-KISANOperationalGuidelines(English).pdf

पीएम किसान योजनेबद्दल काही प्रश्न /तक्रार निवारणी साठी क्रमांक

  • पीएम किसान योजनेबद्दल काही प्रश्न शंका /तक्रार निवारणी साठी खालील क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे .
PM-Kisan Helpline No155261/011-24300606

सरकारने जाहीर केलेल्या काही योजनांच्या अधिक माहिती साठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा

सुकन्या समृद्धी योजना https://goto.now/tv5AE
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ https://smartsahyadri.com/mukhyamantri-mazi-ladki-bahin-yojna-2024/
आमचे अधिकृत संकेतस्थळ https://smartsahyadri.com/

सतत विचारले जाणारे प्रश्न :

१.प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ कश्याप्रकारे होत असतो ?

– शेतकरी असलेल्या कुटुंबाला प्रत्येक वर्षी रुपये ६००० देण्यात येतात ते तीन हप्त्यात म्हणजे प्रत्येक हप्ता रुपये २००० याप्रमाणे देण्यात येतो.

२.PM Kisan योजनेचा रुपये २००० ऑनलाईन कसे पहावे.

PM Kisan योजनेचे पैसे अधिकृत संकेत स्थळावर शेतकरी कॉर्नर यावर जावून आधार कार्ड क्रमांक ,मोबाईल क्रमांक टाकावा , समोर सर्व माहिती उपलब्ध होईल.

३.पीएम किसान सन्मान योजना खऱ्या अर्थाने कोणासाठी आहे .

-देशातील अत्यल्प /अल्प भुधारक शेतकरी वर्गासाठी आहे ,या योजनेतून शेतकऱ्याला रुपये ६००० रुपये प्रतिवर्षी तीन हप्त्यांमध्ये देण्यात येतात.

४.पीएम किसान योजनेसाठी कोण अपात्र आहेत.

वकील , डॉक्टर ,सीए यासारखे जे व्यवसायिक कुटुंब असतील ते या योजनेस अपात्र असतील .

५.पी एम किसान योजनेसाठी लाभार्थ्याकडे किती जमीन आवश्यक पाहिजे ?

-लाभार्थी हा अल्पभुधारक /अत्यल्पभुधारक असावा सरकारच्या नवीन घोषणेनुसार शेतकऱ्यांकडे/लाभार्थ्याकडे २ हेक्टर पर्यंत जमीन आवश्यक आहे ,हि अट शिथिल करण्यात आली आहे.

६.पी एम किसानाचा १८ वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर कधी जमा झाला.

५ ऑक्टोबर २०२४ रोजी १८ वा हप्ता म्हणजेच रुपये २००० शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत.

७.पीएम किसान सन्मान निधी चे पैसे कुठे चेक करायचे?

-अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वरती आल्यानंतर तिथे ‘Farmers section’ असेल त्यावर क्लिक करून समोर ‘Beneficiary Corner’ दिसेल त्यावर क्लिक करा आपल्याला खात्याची सर्व माहिती रकमेच्या स्थितीसह मिळेल.

८.पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता कधी मिळू शकतो ?

-लाभार्थी शेतकऱ्याला PM Kisan योजनेचा पुढील म्हणजेच १९ वा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये मिळू शकतो.

९. सरकारच्या नमो शेतकरी योजनेसाठी कोण पात्र असेल ?

-जे शेतकरी PM Kisan योजनेमध्ये लाभार्थी म्हणून असतील ते सर्व नमो शेतकरी योजनेस पात्र आहेत .

१०.आम्ही पीएम किसान योजनेमधील यादीत नाव कसे पाहू शकतो?

pmkisan.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर आधार क्रमांक , लिंक केलेला मोबाईल क्रमांक टाकावा ,तुम्हाला तुमचे नाव यादीत दिसेल.