PM Awas Yojna 2025 प्रधानमंत्री आवास योजना – भारत सरकारची असलेली ही योजना सामान्य गरीब ,मध्यम कुटुंबासाठी तयार करण्यात आलेली आहे. गरीब , मध्यम वर्गातील कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे त्यांचेही जीवन इतरांप्रमाणे सुजलाम सुफलाम व्हावे , यासाठी सरकारची हि महत्वाकांक्षी योजना लोकप्रिय ठरली आहे.ग्रामीण भागातील गरीब १ कोटी कुटुंबांचा या योजनेत समावेश व्हावा या खरा उद्देश सरकारचा आहे . नुकतेच डिसेंबर महिन्यात देशाचे ग्रामविकास ,कृषिमंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या निम्मित्ताने पुणे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना मोठी घोषणा केली होती.त्यांनी बोलताना सांगितले की ,महाराष्ट्र राज्यात येत्या काळात तब्बल २० लाख घरे बांधण्यात येतील .या योजनेची मंजुरी सुद्धा यावेळी मंत्रीमहोदयानी दिलेली आहे .यावेळी राज्याचे मुख्यमंत्री यांनी या मोठ्या घोषणेबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि श्री शिवराजसिंह चौहान यांना धन्यवाद देवून आभार मानले आहेत .
PM Awas Yojna 2025 पात्रता
- ज्या कुटुंबाचे या देशात कुठेच घर नाही ते या PM Awas Yojna योजनेसाठी पात्र आहेत.
- अल्प उत्पन्न गट ,मध्यम उत्पन्न गट, EWS या योजनेस पात्र आहेत.
- EWS मधील लाभार्थी यांचे वार्षिक उत्पन्न हे ३ लाखांपर्यंत असावे
- अल्प उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी यांचे उत्पन्न ३ ते ६ लाखापर्यंत असावे .
- मध्यम उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी यांचे उत्पन्न ६ ते ९ लाखांपर्यंत असावे
प्रधानमंत्री आवास योजना कागदपत्रे
- प्रधानमंत्री आवास योजना अर्ज
- अर्जदार तसेच कुटुंबातील सर्वांचे आधारकार्ड
- अर्जदारांचा उत्पनाचा दाखला
- जात प्रमाणपत्र(आवश्यक असल्यास)
- आधार सोबत जोडलेले अधिकृत बँकेचे खाते
प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्रात २०२४-२०२५ मध्ये किती घरे मंजूर
महाराष्ट्र राज्यात PMAY-G अंतर्गत ६ लाख ३७ हजार ०८७ घरे मानूर झाली होती त्यातील ६ लाख २५ हजार १६७ घराची नोंद यशस्वीपणे झाली आहे .यापैकी केवळ ५ लाख ६९ हजार ०९१ घरांना जिओ टेग मिळालेत त्यामुळे हे सर्व घर आता ऑनलाईन पाहता येतील .महाराष्ट्र राज्यात २०१६ पासून तब्बल २० लाख ४ हजार ३६६ घरे निर्माण झाली आहेत .
प्रधानमंत्री आवास योजना अर्जप्रक्रिया
PM Awas Yojna अंतर्गत नवीन १ कोटी कुटुंबासाठी घरांची ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरु झालेली आहे
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरवातीला सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
- नवीन अर्ज करा ,अर्ज तपशील संपूर्ण भरावा
- जर तुम्ही योजनेस पात्र असताल तर पुढे प्रक्रिया होईल ,अपात्र असल्यास त्वरित तुमची पुढची प्रक्रिया थांबवली जाईल
- लाभार्थी पात्र ठरल्यास आपण आपले नाव तसेच आधार क्रमांक टाकावा
- तशील भरल्यानंतर तुम्हाला मोबाईल वरती ओटीपी प्राप्त होईल .
- ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही पुढील प्रक्रिया पूर्ण शकता .
प्रधानमंत्री आवास योजना उद्देश
- PM Awas Yojna 2025 मध्ये सर्वसामान्य गरीब ,मध्यम वर्गातील कुटुंबाना आपले हक्काचे घर देणे
- बेघर असलेले कुटुंब ,मोडकळीस आलेले घर या सर्वाना मुलभूत सुखसोई देऊन त्यांना पक्के घर देणे.
- गहर नसलेल्या कुटुंबाना त्यना हक्काचे मालकीचे घर मिळावे
PM Awas Yojna 2025 अपात्रता
- तीन चार चाकी वाहन असणारे
- आयकर भरणारे
- अडीच एकर सिंचनाची शेती असलेला
- ५ एकर असिंचन शेती असणारे
- कुटुंबातील कोणताही सदस्य महिना रुपये १५००० कमावत असेल तो अपात्र असेल
- सरकारी कर्मचारी किंवा कुटुंबात कोणी सरकारी नोकरी करत असेल तर ते योजनेस अपात्र
- व्यवसायिक कर भरणारे
PMAY Rural | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
PMAY योजने अंतर्गत ग्रामीण भागातील मध्यम वर्गातील कुटुंबाच्या घरांची मोठी अडचण दुर करण्यासाठी केंद्र सरकारने इंदिरा आवास योजना मध्ये काही बदल करून या योजनेची पुनर्रचना केली आहे आता हि योजना प्रधानमंत्री आवास योजना १ एप्रिल २०१६ पासून कार्यरत आहे ,ग्रामीण भागात असणारी साधी कच्या स्वरुपाची घर चांगल्या ,पक्की स्वरुपाची व्हावीत हा खरा उद्देश .प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागात १.२० लाख रुपये हे सपाट भूभाग असणाऱ्या भागातील लाभार्थी कुटुंबाला मिळतात .तर डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना १.३० लाख रुपये दिले जातात .या योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचा आकार हा 25 चौरस मीटर एवढा केलेला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण | http://pmayg.nic.in |
PMAY Urban | प्रधानमंत्री आवास योजना शहरी
PM Awas योजना २०१५ साली लागू करण्यात आली.शहरी भागात पक्क्या घरांचे जाळे वाढवून शहरांचे रूप पालटण्याचे खरे उदीष्ट असलेल्या या PM Awas Yojna मध्ये २० दशलक्ष बांधण्याचे नियोजन होते आणि योजनाही २०२२ पर्यंत होती पण संपूर्ण घरांचे लक्ष पूर्ण न झाल्याने हि योजना पुढे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे .
प्रधानमंत्री आवास योजना शहरी | https://pmaymis.gov.in/ |
प्रधानमंत्री आवास योजना आतापर्यंत गरीब कुटुंबाना आतापर्यंत जवळपास ४/४.५ कोटी कुटुंबाना या योजनेमार्फत घरे मिळाली आहेत.या एवढ्या मोठ्या संखेते महिलांच्या नावे तब्बल ७०% घरे आहेत.
पीएम आवास योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचा सर्वाधिक आकडा हा उत्तर प्रदेशात आहे .
PM Awas Yojna घरांच्या आकाराचे प्रमाण पुढीलप्रमाणे
श्रेणी | वार्षिक उत्पन्न | घराचे क्षेत्र (मीटर ) | घराचे क्षेत्र (फुट) |
EWS | ३ लाख | ६० | ६४५.८३ |
LIG | ६ लाख | ६० | ६४५.८३ |
MIG -1 | ६ लाख ते १२ लाख | १६० | १७२२.३३ |
MIG -2 | १२ लाख ते १८ लाख | २०० | २१५२.७८ |
प्रधानमंत्री आवास योजना गृहकर्ज
- प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सर्व गृहकर्जाची खाती आपल्या आधार कार्ड सोबत जोडली जातात.
- हे अनुदान केवळ जास्तीत जास्त २० वर्ष कालावधी साठीच असेल.
- ज्या बँकेतून तुम्ही गृहकर्ज घेतले असेल ती बँक चालू असलेला व्याजदर आकारत असते.
PMAY 2 .0 प्रधानमंत्री आवास योजना शहरी
PMAY 2 .0 प्रधानमंत्री आवास योजना शहरी या योजनेचा दुसरा टप्पा नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे .येत्या ५ वर्षात एक कोटी पेक्षा अधिक घरे बांधण्यासाठी या योजनेतून निधी देण्यात येणार आहे . या योजने अंतर्गत रुपये २.३० लाख रुपयांची मदत करणार आहे .पहिल्या टप्प्यात १.१८ कोटी घरांचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे.
PMAY 2.0 अर्ज कसा करावा
- सुरवातीला pmay-urban.gov.in वरती जावे
- ‘Apply for PMAY -U 2.0 क्लिक करणे
- सर्व माहिती भरणे (पत्ता , उत्पन्नसहित भरावे )
- आधार कार्ड संबधित माहिती भरावी
- सर्व माहिती पडताळून घेवून अर्ज सबमिट करावा.
खालील बँका गृहकर्ज उपलब्ध करून देतात
एक्सिस बँक |
एचडीएफसी बँक |
आयसीआयसीआय बँक |
बंधन बँक |
बँक ऑफ इंडिया |
एसबीआय बँक |
पंजाब नेशनल बँक |
कॅनरा बँक |
आयडीबीआय बँक |
बँक ऑफ बडोदा |
आयडीएफसी बँक |
सार्जजनिक बँका -जिथून सबसिडी मिळवता येईल
बँक | वेबसाईट | केंद्रीय नोडल एजन्सी |
बँक ऑफ इंडिया | http://www.bankofindia.com | NHB |
स्टेट बँक ऑफ इंडिया | http://www.sbi.co.in | NHB |
कॅनरा बँक | http://www.canarabank.in | NHB |
बँक ऑफ बडोदा | http://www.bankofbaroda.co.in | NHB |
इंडियन बँक | http://www.indian-bank.com | NHB |
खासगी बँका -जिथून सबसिडी मिळवता येईल
बँक | वेबसाईट | नोडल |
एक्सिस बँक | http://www.axisbank.com | NHB |
कोटक महिंद्र बँक | http://www.kotak.com | NHB |
एचडीएफसी बँक | http://www.HDFC.com | NHB |
आयसीआयसीआय बँक | http://www.icicibank.com | NHB |
आयडीएफसी | http://www.idfcbank.com | NHB |
महाराष्ट्र राज्य नोडल एजन्सी यादी
राज्याचे नाव | संस्थेचे नाव | संपूर्ण पत्ता | ईमेल आयडी |
महाराष्ट्र | महाराष्ट्र सरकार | गृहनिर्माण भवन चौथा माळा ,कलानगर ,वांद्रे पुर्व मुंबई ४००५१ | mhdirhfa@gmail.com cemhadapmay@gmail.com |
प्रधानमंत्री आवास योजना अधिक माहितीसाठी संकेतस्थळ / क्रमांक
PM आवास शहर | https://pmaymis.gov.in/ |
PM आवास ग्रामीण | http://pmayg.nic.in |
PM आवास योजना टोल फ्री क्रमांक | १८००-११-६४४६ |
PFMS | १८००-११-८१११ |
इतर सरकारी योजनांची माहिती अन राजकीय घडामोडी पाहण्यासाठी संकेतस्थळ
योजनेचे नाव | संकेतस्थळ |
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२५ | https://shorturl.at/1kGlw |
महिलांसाठी ६ सरकारी योजना | https://shorturl.at/sYbKR |
पीएम किसान योजना | https://shorturl.at/edLoj |
महाराष्ट्रातील सर्वात ८ तरुण आमदार | https://shorturl.at/nEkVL |
महाराष्ट्रातील १० महिला आमदार | https://shorturl.at/gfbHc |
मुख्यमंत्री सहाय्यता निधी २०२५ | https://shorturl.at/EqFBH |
महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप २०२४ | https://shorturl.at/jPiEx |
आमचे अधिकृत संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |
सतत विचारले जाणारे प्रश्न
१.PM Awas Yojna मधून लाभार्थीला जास्तीत जास्त किती रक्कम दिली जाते ?
-PM आवास योजना अंतर्गत लाभार्थीला जास्तीत जास्त रुपये २.६७ लाख एवढी रक्कम दिली जाते
२.स्वतःच्या मालकीचे घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसे कसे मिळवायचे ?
-PM आवास योजना हि सरकारची योजना पात्र असलेल्या लाभार्थी कुटुंबाना घराच्या बांधकामासाठी अथवा घराच्या दुरुस्तीसाठी आर्थिक स्वरुपात मदत करत असते.
३.सरकारकडून मोफत घर कसे मिळवावे ?
-PM आवास योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत ,मध्यम वर्ग कुटुंब तसेच निम्न उत्पन्न असलेले कटुंब या योजनेतून मोफत घरे मिळवू शकतात.
४.प्रधानमंत्री आवास 2.0 शहरी काय आहे ?
-या योजनेतून लाभार्थी कुटुंबाला शहरी भागात स्वतःचे बांधण्यासाठी तसेच घरे बांधून भाड्याने देण्सासाठी केंद्र या माध्यमातून अर्थसहाय्य करते.
५.या योजनेची सबसिडी मिळण्याची शेवटची तारीख कोणती आहे ?
-प्रधानमंत्री आवास मधून पात्र कुटुंबाला सबसिडी मिळण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे .
६.पीएम आवास योजना २०२४ ची लिस्ट कुठे पहावी ?
-पीएम आवास योजना मध्ये ज्यांना घरे मिळाली आहेत त्यांची नावे सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळतील .
७.PM आवास योजना अंतर्गत घराचा आकार किती असावा ?
-PM आवास योजना अंतर्गत घराचा आकार हा ३० चौरस मीटर ते २०० चौरस मीटर एवढा कार्पेट असणारे घर मिळते
८.आधार कार्ड माहितीद्वारे PM आवास योजना स्थिती कश्याप्रकारे पहावी.
– PM आवास योजना अधिकृत संकेतस्थळावर जावे,त्यानंतर समोर शोध लाभार्थी वर क्लिक करा ,आधार क्रमांक टाका ,नावानुसार पर्याय घ्या , समोर आपल्याला संपुर्ण स्थिती पाहायला मिळेल.
९.पीएम आवास योजना ऑफलाईन अर्ज कसा सादर करायचा ?
– राज्य सरकारचे CSC कार्यालय कुठे आहे ते पाहून तेत्थून अर्ज घ्यावा नाव पत्ता वय , वार्षिक उत्पन्न यासारखी सर्व माहिती भरून अर्ज दाखल करा .