Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna 2024 माझी लाडकी बहिण योजना


Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna 2024 लाडकी बहिण योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारने महिलांच्या बाबतीत उचललेले आतापर्यंतचे सर्वात उल्लेखनीय पाऊल.

माझी लाडकी बहिण योजना यामुळे कुटुंबातील कर्त्या पुरुषांबरोबर महिलाही सक्षम ,आत्मनिर्भर व्हाव्यात त्यांचीही आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधारावी.
महिलानी ही या योजनेमधून छोटे-मोठे उद्योग करून कुटुंबाला हातभार लावावा असे सरकारचे उद्धीष्ट , आज ते उद्धीष्ट बऱ्यापैकी साध्य झालेले दिसत आहे.
ज्या परिवारातील महिलांची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे अश्या सर्व मध्यम कुटुंबातील सर्वच महिलांसाठी सरकारने लाडकी बहिण योजना जुलै २०२४ मध्ये लागू केलेली आहे.
ज्या महिला या योजनेत पात्र ठरतील त्या महिलांना महिना रुपये १५०० प्रमाणे खात्यावर पैसे जमा केले जातात .
या लाडकी बहिण योजनेची अधिसूचना राज्य सरकारने १ जुलै २०२४ रोजी लागू केलेली आहे.
या योजनेमुळे महाराष्ट्र राज्य सरकारच्या तिजोरीवर ४६ हजार कोटींचा आर्थिक भार पडणार आहे .

Mazi Ladki Bahin Yojana माझी लाडकी बहिण योजना

Mazi Ladki Bahin Yojna in Marathi |लाडकी बहिण योजना : थोडक्यात माहिती

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
कधीपासून कार्यान्वित झाली जुलै २०२४
लाभार्थी कोण असतील २१ ते ६५ वयोगटातील सर्व महिला
अर्ज करण्याचे प्रकारऑनलाईन / ऑफलाइन 
योजनेमध्ये मिळणारा लाभ रुपये १५०० प्रती महिना
६ व्या हप्त्याचा लाभ कधी मिळणार डिसेंबर २०२४
नवीन घोषणेनंतर मिळणारा लाभ (काही महिन्यांनी)रुपये २१०० प्रती महिना

लाडक्या बहिणींसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात काय घोषणा झाली ?

नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झालेले आहे याच अनुषंगाने हिवाळी अधिवेशन सुद्धा नागपूर येथे चालू झालेले आहे ,यात सरक्ची यशस्वी योजना लाडकी बहिण संदर्भात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले कि आम्ही योजनेत कुठलाही बदल करणार नाही आहोत,उलट फडणवीस यांनी बोलतना सांगितले कि डिसेंबरचा हप्ता हि वेळेत मिळेल ,हिवाळी अधिवेशन संपल्यावर लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्त्याची रक्कम टाकणार आहोत .यासाठी जवळपास १४०० कोटीची नवीन तरतूद या योजनेसाठी महायुती सरकारने करून ठेवली आहे.

लाडकी बहिण योजना सरकारची नवीन घोषणा

जर २०२४ विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आल्यास या योजनेद्वारे महिलांना मिळणाऱ्या रकमेमध्ये भरघोस वाढ करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा २०२४ निवडणुकीमध्ये महायुतीला अर्थात शिंदे-फडणवीस-पवार यांच्या पक्षाला राज्यातील जनतेने (खासकरून लाडक्या बहिणींनी ) मोठा जनाधार देवून पुन्हा एकदा सत्तेत बसवलेले आहे . या योजनेमुळे कमालीची लोकप्रियता ,प्रेम मिळालेल्या शिंदे-फडणवीस -पवार सरकार ने पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील महिलांचे आभार तर मानलेच शिवाय सरकार स्थापन झाल्यावर या नवीन प्रती महिना २१०० रुपये घोषणेची अंमलबजावणी काही महिन्यात करून लाडकी बहिणींना १५०० रुपये ऐवजी आता २१०० रुपये लवकरच दिले जातील असे आश्वासन देऊन घोषणाही राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब तसेच विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे .

उदाहरण- जेंव्हा महिना १५०० ऐवजी २१०० रुपये तेंव्हाची आकडेमोड खालीलप्रमाणे होईल.

महिनेमिळणारी एकूण रक्कम
जानेवारी ते डिसेंबर महिना २१०० याप्रमाणे वर्षाचे २५२०० रुपये

Mazi Ladki Bahin Yojna पात्रता

-Mazi Ladki Bahin Yojna चा लाभ फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे.
-राज्यातील ज्या महिलांचे वय २१ ते ६५ वर्षामध्ये असेल त्या सर्व महिलांना या mukhymantri ladki bahin yojna चा लाभ घेता येणार आहे .
-या योजेनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना स्वतःचे बँकेत खाते असणे बंधनकारक असणार आहे ,तरच या योजनेचा लाभ ते घेवू शकतील.

Mazi Ladki Bahin Yojna अपात्रता

-ज्या महिला कुटुंबातील कोणी सदस्य आयकर भरत असतील तर ते अपात्र असतील
-ज्या महिला कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे २५०००० पेक्षा जास्त असेल ते अपात्र
-ज्या कुटुंबात चाकी चाकी वाहन असेल ( ट्रॅक्टर वाहन वगळून ) ते अपात्र .
-ज्या कुटुंबातील सदस्य आजी/माजी आमदार खासदार असतील ते अपात्र .
-कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही .

लाडकी बहिण योजना कागदपत्रे

पासपोर्ट फोटो
आधार सोबत लिंक केलेला मोबाईल क्रमांक
महाराष्ट्रात राहत असल्याचा पुरावा किंवा खाली दिलेल्या कोणत्याही एका गोष्टीची पूर्तता करावी
रेशनकार्ड
मतदार ओळखपत्र
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

माझी लाडकी बहीण योजना उद्देश

– ही योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांचे आर्थिक , सामाजिक स्थैर्य सुधारण्यास मदत करेल .
– Mazi Ladki Bahin Yojna च्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलाना रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते.
-महिलांचे तसेच त्यांच्या मुलांचे आरोग्य सुद्दृढ रहावे.
-या योजनेतून राज्यातील महिला आत्मनिर्भर ,समृद्ध बनतील.

लाडकी बहिण योजनेचे फायदे

-महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु केलेली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील ज्या महिला पात्र ठरतील त्यांना महिन्याला रुपये १५०० मिळणार आहेत.
-सरकारने केलेल्या या योजेनेतून नवीन घोषणेनुसार आता महिलांना महिना २१०० याप्रमाणे वर्षाला २५२०० रुपये महिलाना मिळणार आहेत .
-मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत दिली जाणारी हि रक्कम सरळ महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे .

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज कुठे करावा

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना यासाठी ज्या महिलांना अर्ज करण्यास अडचणी येत असतील त्या महिलांनी आपल्या गावातील/भागातील अंगणवाडी सेविका ,ग्रामसेवक, सेतू केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र याठिकाणी संपर्क केल्यास आपल्याला दोन्ही प्रकारचे ऑनलाईन /ऑफलाईन अर्ज करण्याची व्यवस्था करून दिली जाते.

-या योजनेत आतापर्यत राज्यातील जवळपास २ कोटी ३५ लाख महिलांनी अर्ज केलेले आहेत.


लाडकी बहिण योजनेचा लाभ व योजनेची अंतिम तारीख

लाडकी बहिण योजना हि महाराष्ट्रात सत्तेत असलेले शिंदे-फडणवीस-पवार सरकार यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये योजना अंमलात आणली.हि योजना अंमलात आणताना सरकारने एक मोठा आश्चर्यचा सुखद धक्का दिला ,सरकारने महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै ऑगस्ट या महिन्याचे सुद्धा पैसे देण्याचे ठरवले अन ते महिलांच्या खात्यावर जमाही केले .तीन महिन्याचे ७५०० रुपये मिळाल्यामुळे महिलांमध्ये चैतन्याचे वातावरण सध्या पहावयास मिळतेय.

सध्या राजकीय वातावरण तसेच आचारसहिंता असल्यामुळे लाडक्या बहिणींना या योजनेतील सहावा हप्ताचे पैसे आचारसहिंता संपल्यावर म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या मध्य मध्ये पात्र असणाऱ्या महिलांच्याच खात्यावर जमा होतील अशी तरतूद राज्य सरकारने आधीच करून ठेवलेली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana 2024 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी करावी

१.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाणे.

२.अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावरती अर्ज प्रक्रिया या लिंक वरती क्लिक करावे.

३. समोर फॉर्म उघडल्यानंतर सर्व माहिती अचूक भरावी .

४.अर्ज भरताना आधार कार्ड , बँक अकौन्ट क्रमांक ,पुर्ण पत्ता अश्याप्रकारची माहिती अचूक भरणे .

५.माहिती भरल्यानंतर आपल्याकडून सर्व कागदपत्रे अपलोड करणे

६. अर्ज तसेच कागदपत्रे अपलोड करायच्या अगोदर पुन्हा एकदा सर्व पाहून घेणे मगच सर्व संकेतस्थळावर सबमिट करावे .

६.अर्जाची स्थिती पहावयाची असेल तर त्याच संकेत स्थळावरच Click Here पाहू शकता .

७. जर महिलांना नलाईन अर्ज करण्यास अडचणी येत असतील तर त्यांनी जवळच्या अंगणवाडी सेविका कडे जावून अर्ज अचूक माहिती कागदपत्रासह दाखल करावा.

लाडकी बहिण योजनेची यादी नारी शक्ती एप्लीकेशन

-लाडकी बहिण योजने मधील यादी आपल्याला पहायची असल्यास शासनाचे नारी शक्ती एप्लीकेशन उघडा . एप्लीकेशन उघडल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकावा नंतर आपल्या मोबाईल वरती येणारा ओटीपी येईल. एप्लीकेशन उघडल्यानंतर ‘या पूर्वी केलेले अर्ज’ यावर क्लिक करायचे आहे . -यानंतर आपल्याला अर्ज दिसेल आणि तिथेच आपल्या अर्जाची स्थिती सुधा पहायला मिळेल , अश्याप्रकारे आपण सोप्प्या पद्धतीने केंव्हाही /कधीही अर्जाची स्थिती पाहू शकता .

लाडकी बहिण योजनेतील तक्रार निवारण अथवा मदतीसाठी क्रमांक/Links

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या यामध्ये महिलांना Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna मध्ये काही मदत किंवा अडचणी ,तक्रारी असल्यास सरकारने एक क्रमांक जाहीर केला आहे,ज्यावरती आपल्या तक्रारीचे निवारण होणार आहे

तक्रार निवारण क्रमांक१८१
लाडकी बहिण योजनेचा GRClick Here
नारी शक्ती एप्लिकेशन Click Here

लाडकी बहिण योजने बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा

लाडकी बहिण योजनेचे अधिकृत संकेतस्थळ https://ladakibahin.maharashtra.gov.in/
सुकन्या समृद्धी योजनाबद्दल जाणून घेण्यासाठी क्लिक करा https://smartsahyadri.com/
आमचे अधिकृत संकेतस्थळ / Visit My Homepage https://smartsahyadri.com/

लाडकी बहिण योजना संदर्भात सतत विचारले जाणारे प्रश्न :

. लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात कधी पासून सुरु झाली ?

-लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात जुलै २०२४ पासून सुरु अथवा लागु झाली .

.लाडकी बहिण योजनेचा अर्ज कुठे करायचा ?

-लाडकी बहिण योजनेसाठी फलाईन अर्ज जवळच्या अंगणवाडी सेविका ,ग्रामसेवक, सरकारी सेवा केंद्र इथे अर्ज करण्यास मदत घ्यावी तसेच नलाईन अर्ज सरकारने जारी केलेल्या अधिकृत संकेत स्थळावर करावा.

.लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी यादी कुठे पहावयास मिळेल ?

-गुगल प्ले स्टोअर वरती नारी शक्ती दुत एप्लिकेशन घेतल्यास त्यात यादी सहित सर्व माहिती मिळेल.

.लाडकी बहिण योजनेचा अर्ज स्विकारला आहे कि नाही हे कसे समजते ?

-राज्य शासनाने जरी केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर तिथे आपला मोबाईल क्रमांक ,कॅप्चा पुढे आपल्याला अर्जाची पूर्ण स्थिती समजेल .

.लाडकी बहिण योजनेमध्ये कोण पात्र असतील ?

-लाडकी बहिणेचे वय वर्ष २१ ते ६५ या वयोगटातील असावे, ज्यामध्ये सर्व महिला अर्थात विवाहित ,अविवाहित ,निराधार ,घटस्फोटीत हे सर्व योजनेस पात्र असतील.

६.लाडकी बहिण योजनेचे अधिकृत संकेतस्थळ .

-महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या लाडकी बहिण योजनेची अधिकृत वेब साईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/

७ .लाडकी बहीण सरकारने महिलांसाठी कोणते नवीन आश्वासन दिले आहे.

-पुन्हा नव्याने महायुती सरकार आल्यास महिलांना मिळणाऱ्या १५०० रुपयामध्ये वाढ करून २१०० रुपये करणार

८.लाडकी बहिण योजनेचे सहाव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत कि नाही ?

होय, सहाव्या हप्त्याचे पैसे डिसेंबर महिन्यात खात्यावर जमा केले जातील अशी तरतूद केलेली आहे

९.लाडकी बहिण योजनेचा खरा उद्देश काय ?

– महिलांना स्व.कर्तृत्वावर उभं करणे , स्वावलंबी बनवणे ,त्यांना उद्योग व्यवसायासाठी चालना देणे, महिलांचे आरोग्य सुदृढ करणे.

१०. लाडकी बहिण योजनेसाठी केवायसी करणे गरजेचे आहे का ?

होय , या योजनेमध्ये केवायसी करावी लागेलच.