MahaDBT Yojna 2025 महाराष्ट्र राज्यातील शेतकरी समृध्द व्हावा ,शेतकऱ्याचे जीवनमान उंचावाव ,शेतकऱ्यांच आर्थिक सामाजिक जीवनमान उत्तम व्हावं.
MahaDBT Yojna 2025 मधून शेतकऱ्याला आर्थिक लाभ तसेच शेतीची अवजार ,आधुनिक साधने /यंत्र घेणे सहज शक्य होणार आहे.या योजनेच्या माध्यामतून सरकारमधील कृषी अधिकारी याबद्दल शेतकऱ्यांना हे नवीन तंत्र्द्यान कसे शेतात वापरावे ,शेतीमध्ये नवनवीन बदल कसे घडवावे याबद्दल वेळोवेळी प्रशिक्षण घेवून शेतीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करत असतात . सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना या माध्यमातून ४०% अनुदान दिले जाते तर अनुसूचित गटातील शेतकऱ्यांना ५०% अनुदान दिले जाते .
MahaDBT Yojna 2025 महाडीबीटी शेतकरी योजना 2025 उद्दिष्ट
MahaDBT 2025 महाडीबीटी योजनेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाचा सामाजिक स्तर वाढवणे ,आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याला सर्वसंपन्न बनविणे हा या योजनेमागील सरकारचा खरा उद्देश आहे .योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणे अनुदानाच्या सहाय्यातून नवीन अवजार घेणे ,शेतीच्या सिंचनासाठी साधने घेणे .या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्याला कुठीही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही घरबसल्या तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो .पारदर्शक व्यवहार तसेच आधी असेल्या यंत्रणेतील त्रुटी बाजूला करून शासकीय प्रणाली सुधारावे हेही एक मुख्य उद्धिष्ट आहे .
योजनेचे नाव | महाडीबीटी शेतकरी योजना |
कोणाद्वारे योजना सुरु करण्यात आली | महाराष्ट्र शासन |
योजनेचा उद्देश | आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या शेतकऱ्यांना शेती अवजार खरेदीवर अनुदान देणे |
अर्ज कश्याप्रकारे करावा | ऑनलाईन |
योजनेचे अधिकृत संकेतस्थळ | https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login |
MahaDBT शेतकरी योजना वैशिष्ट्ये
- शेतकरी आता केंव्हाही ,कधीही २४*७ कुठल्याही योजनेसाठी अर्ज करू शकतो .
- स्वतःचा आयडी पासवर्ड टाकून अर्जाची स्थिती केंव्हाही घरबसल्या पाहू शकतो
- नोंदणी केलेला अर्जदार याच्या आधार सलंग्न खात्यात थेट लाभ दिला जाईल .
- अर्ज मंजुरी प्रक्रिया अतिशय सुलभ करण्यात आलेली आहे .
MahaDBT शेतकरी योजना यादी 2025
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना |
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना |
राष्ट्रीय कृषी विकास योजना |
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना |
शेत तलावाला RKVY प्लास्टिक कवर |
डॉ शामा प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना |
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना |
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान |
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना |
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना |
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान |
कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम |
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना |
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (वयक्तिक शेततळ) |
MahaDBT शेतकरी योजना फायदे
- या सरकारच्या कल्याणकारी योजनेबद्दल माहिती देण्यासाठी सरकारी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नवीन तंत्रज्ञानाचा वापर कश्या पद्धतीने करावा हे प्रात्यक्षिक देवून शिकवतील .
- सामान्य वर्गातील शेतकऱ्यांना ४०% अनुदान सरकारकडून मिळेल तर अनुसूचित जाती-जमाती मधील शेतकऱ्यांना ५०% अनुदान सरकार देईल .
- या MahaDBT शेतकरी योजना मध्ये निवड झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला महाराष्ट्र सरकार अर्थसहाय्य तसेच इतर फायदे देईल
- या MahaDBT शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकरी नवीन तंत्रज्ञान समजावून घेवून ते शेतीमध्ये वापरेल, त्यामुळे शेतीमध्ये असणाऱ्या पिकांमध्ये लक्षणीय वाढ होईल .
MahaDBT शेतकरी योजना कागदपत्रे
महाडीबीटी शेतकरी योजनेसाठी खालील कागदपत्रे लागतील –
- आधार कार्ड
- सातबारा
- जात प्रमाणपत्र (SC /ST )
- विजेचे बिल
- रहिवाशी दाखला
- पेन कार्ड
MahaDBT शेतकरी योजना पात्रता
- MahaDBT शेतकरी योजना मध्ये भाग घ्यायचा असल्यास अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातीलच रहिवाशी असणे आवश्यक आहे
- या MahaDBT योजनेसाठी अर्जदार हा शेतकरी असायला हवा.
महाडीबीटी शेतकरी योजना नोंदणी
- महाडीबीटी नोंदणी साठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी .
- अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर अर्जदार शेतकऱ्याने नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करावे
- नवीन नोंदणी अर्ज समोर आल्यानंतर अर्जदाराने स्वतःची सर्व्म्हिती अचूकपणे भरणे.
- माहिती भरल्यानंतर सर्व कागदपत्रे त्याठिकाणी जोडावीत .
- सर्व माहिती माहिती कागदपत्रे एकदा पडताळून पहावे ,आणि मगच सबमिट करावे .
महाडीबीटी पोर्टल
- आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल द्वारे सर्व कृषी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्याला शेती संबंधी कुठल्याही योजनेबद्दल माहिती जाणून घ्यायची असल्यास आता या एकाच पोर्टल वर सर्व योजनेची माहिती मिळणार आहे त्यामुळे इतरत्र कुठेही योजनांबद्दल माहिती घेण्याची गरज नाही .
- योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने असल्या कारणाने लाभार्थी मंडळीना ऑनलाईन अर्ज करून सर्व स्थिती आयडी पासवर्ड टाकल्यावर संबंधित योजनेचा तपशील/लाभ मिळू शकतो .
- लाभार्थी शेतकऱ्यांना पोर्टल बाबत काही अडचणी , तक्रारी असल्यास शासनाने जारी केलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकतात .
- एखाद्या आपत्तीने शेतकऱ्याचे नुकसानच झाल्यास ताबडतोब आर्थिक भरपाई देणे खूप सोप्पे होणार आहे .
- शेतकऱ्याला आता वाट्टेल त्या योजनाची माहिती पोर्टल वर मिळणारच शिवाय कोणत्याही योजनांचा अर्ज ताबडतोब करू शकेल ,महत्वाचे म्हणजे आता लाभार्थी शेतकऱ्याला कोणत्याही कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत .
- शेतकऱ्याला कृषी योजनांना मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेणे सुद्धा या पोर्टलमुळे सोप्पे होणार आहे .
महाडीबीटी शेतकरी योजना 2025 स्थिती कश्याप्रकारे पहावी
- महाडीबीटी योजना मध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे .
- संकेतस्थळावरील मुखपृष्ठावर ट्रॅक एप्लीकेशन स्टेटस वरती क्लिक करावे.
- समोर आलेल्या पृष्ठभागावर अर्जदाराने स्वतःचा आयडी तसेच समोर आलेला कॅप्चा कोड टाकणे.
१.राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना कागदपत्रे
- सातबारा उतारा
- ८ अ
- अवजाराचे एकून कोटेशन
- अवजाराची RC (TRACTOR)
- जात प्रमाणपत्र
- सामाईक क्षेत्र असल्यास सर्वांचे संमतीपत्र
- मान्यता प्राप्त संस्थेचा संपूर्ण रिपोर्ट
राज्य कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत खालील शेती अवजारांवर अनुदान अर्थसहाय्य दिले जाते
- पावर टिलर
- ट्रक्टर
- ट्रक्टर अवजार
- प्रक्रिया संच
- पिक काढणी अवजार
- फलोत्पादन अवजार
- स्वयंचलित अवजार
२.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी योजना)
- या योजनेंतर्गत नवीन विहिरीसाठी २.५० लाख रुपये ,जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये ,बोरिग २० हजार ,पंप संचसाठी २० हजार रुपये ,वीज जोडणी साठी २० हजर दिले जातात .
- शेततळ्याच्या प्लास्टिक कव्हर साठी १ लाख रुपये ,तीबक सिचन अथवा तुषार सिचन साठी ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत असते.
३. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
-या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना / लाभार्थ्यांना ठिबक सिंचन साठी १००% अनुदान देण्यात येते
४.मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (वयक्तिक शेततळे ) कागदपत्रे
- सातबारा
- ८ अ
- हमीपत्र
- जात प्रमाणपत्र
- सामाईक क्षेत्र असल्यास संमतीपत्र
- स्थळ दर्शक नकाशा
- चातुर्सिमा
- शेतकऱ्याच्या नावावर ०.६० जमीन आवश्यक आहे .
५.कृषी अवजारे
योजनेत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्याने खालील कागदपत्रे जोडावीत .
- सातबारा
- ८ अ
- सामाईक क्षेत्र असेल तर संमतीपत्र आवश्यक
- जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती /जमाती)
- अवजाराचे कोटेशन
- मान्यता असलेल्या संस्थेचा तपासणी अहवाल
पूर्वसंमती मिळाल्या नंतर ३० दिवसाच्या आत खालील कागदपत्रे सादर/अपलोड करणे
- डीलरकडे जमा केलेल्या रकमेच्या RTGS केलेली पावती .
- मूळ देयक
६.ठिबक सिंचन /तुषार सिंचन
या योजनेत लाभार्थी शेतकऱ्याची निवड झाल्यानंतर खालील कागदपत्रे सदर करावीत .
- सातबारा
- ८ अ
- सामाईक शेती असल्यास संमतीपत्र
- जात प्रमाणपत्र (अनुसूचित जातीजमाती)
पूर्वसंमती मिळाल्यानंतर ३० दिवसाच्या आत खालील कागदपत्रे सादर/अपलोड करावीत
- मूळ देयक
- परिशिष्ट ६ (प्रमाणपत्र ,आराखडा )
- परिशिष्ट ६ (हमीपत्र)
महाडीबीटी शेतकरी योजना अधिकृत संकेतस्थळ आणि क्रमांक
महाडीबीटी शेतकरी योजना 2025 | https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login |
अधिकृत क्रमांक | ०२२-४९१५०८०० |
इतर सरकारी योजना असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा
आमचे अधिकृत संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१.महाडीबीटी शेतकरी योजना कोणत्या राज्याने सुरु केलेली आहे ?
–महाडीबीटी शेतकरी योजना सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्याने सुरु केलेली आहे .
२.महाडीबीटी योजना उद्देश नक्की काय आहे ?
-महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक, सामाजिक स्तर सुधारावा ,त्याचं जीवनमान अधिक चांगल /उत्तम व्हावं ,हाच खरा उद्देश या महाडीबीटी चा आहे .
३.महाडीबीटी शेतकरी योजनेची स्थिती कशी पहावी ?
–MahaDBT पोर्टल लोगिन करून करून आपण आपल्या स्थिती पाहू शकता.
४. महाडीबीटी मध्ये DDO म्हणजे नक्की काय ?
-DDO म्हणजे पोर्ट्रेलवरची ट्रेझरी बिले तयार करण्याची काम विभागीय आहरण सवितरण अधिकारी करत असतात .हे सर्व महाराष्ट्र कोषागार नियम च्या विहित असलेल्या नियमात केले जाते .
५.महाडीबीटी वरती कागदपत्रे कश्याप्रकारे अपलोड करावीत ?
-आपले सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरुपात सुरवातीला करणे मगच पोर्टल वर अपलोड करणे .
६.२०२४ मध्ये आलेलेली नवीन कृषी योजना काय आहे ?
–NMNF नेशनल मिशन ऑन नेचरल फार्मिंग ,केंद्र सरकारने २५ नोव्हेंबरला या योजनेला मंजुरी दिलेली आहे .हि स्वतंत्र योजना आहे .
७.कृषी उपकरणावर अनुदान कश्याप्रकारे मिळवावे ?
-शासनाकडून शेतकऱ्यांना ५०% अनुदान दिले जाते . संपूर्ण यंत्राची पडताळणी हि कृषी पर्यवेक्षक करत असतात .ज्यावेळी हि पडताळणी अधिकारी करत असतात त्यावेळी या कृषी उपकारांचे बिल सदर करणे गरजचे आहे त्याचीही पडताळणी अधिकारी करत असतात . याबद्दलचे अनुदान शेतकऱ्याला ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल .
८.शासनाकडून ट्रक्टर अनुदान किती असते .
-राज्यातील शेतकऱ्याला शेती कार्यासाठी ट्रक्टर खरेदी करण्यसाठी सरकारकडून १.२५ लाख रुपये अनुदान उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे .
९.शासनाकडे कृषी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
-कृषी योजनेसाठी https://www.maharashtra.gov.in/Site/1604/scheme या संकेतस्थळावर अर्ज करता येईल .
१०.प्रधानमंत्री ट्रक्टर योजना काय आहे ?
-ट्रक्टर योजनेतून शेतकऱ्याला सबसिडी मिळत असते .हा केंद्राचा उपक्रम आहे .ट्रक्टरच्या एकूण किमतीवर ५०% अनुदान देण्यात येते ,याच्याच माध्यामतून शेतकऱ्याला समृद्ध बनवायचे उद्देश ठेवून हि योजना अंमलात आणली गेली आहे .