Magel Tyala Saur Pump 2025 मागेल त्याला सौर पंप कृषिप्रधान असलेला आपला देश कित्येक क्षेत्रात आज अग्रेसर आहे ,त्याचप्रमाणे आज भारतात पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळतेय.
आज शेतीमध्ये नवनवीन प्रयोग शेतकरी करत असतो .नवनवीन तंत्रज्ञान साध्य करून यशस्वीपणे आज शेतकरी तेच शेतात वापरत आहेत . शेतकऱ्यांना असेच प्रोत्साहन देण्यासाठी ,आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार विविध योजना आणत असते .ग्रामीण भागात विजेबाबत अधिक समस्या शेतकऱ्याला असतात ,विजेमुळे कित्येक पिक सुकून जातात ,नवनवीन शेतीत प्रयोग करता येत नाहीत .याचाच विचार करून भारत सरकार ,राज्य सरकार अनेक प्रयोग करत असते त्यातीलच हि मागेल त्याला सौर पंप योजना आहे . कमी वेळात अधिक लोकप्रिय ठरलेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी मुबलक आहे पण वीज नाही,अश्या शेतकरी बांधवांसाठी सरकारने हि विश्वसनीय आहे,या योजनेमधून शेतकऱ्यांना शेतात सौर पंप बसवता येणार आहेत. याद्वारे शेतकऱ्याला सिंचनासाठी मदत म्हणुन हे पंप बसवता येणार आहेत.या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःचा स्वयंपूर्ण पर्याय उपलब्ध होणार आहे .
आज महाराष्ट्र राज्य देशात सौर पंप बसविण्यात सर्वात अग्रेसर राहिला आहे ,अन याबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्राचा गौरव सुद्धा केला आहे .महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात सर्वाधिक सौर पंप बसविण्यात आलेले आहेत त्यानंतर बीड, परभणी ,अहिल्यानगर ,छत्रपती संभाजीनगर ,हिंगोली असा सौर पंप बसवणाऱ्या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.यासाठी केंद्र सरकार कडून ३०% तर राज्य सरकार ६०% अनुदान देत असते .केवळ १०% रक्कम भरून संपूर्ण संच शेतकऱ्याला मिळत असतो ,अनुसूचित जाती -जमाती साठी केवळ ५% रक्कम भरायची आहे .महावितरण विभागाने मागील वर्षात तब्बल २ लाख सौर पंप बसवलेले आहेत
Magel Tyala Saur Pump मागेल त्याला सौर पंप 2025 वैशिष्टे
- शेतकऱ्याला स्वतच्या शेतात सिंचनासाठी स्वतंत्र तसेच हक्काची असणारी हि मागेल त्याला सौर पंप योजना आहे.
- शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एच पी चे पंप असणार
- जे सर्वसाधारण शेतकरी गट आहेत त्या शेतकरी वर्गासाठी केवळ १०% रक्कम भरून सौर पेनल व संपुर्ण पंप मिळेल .
- अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांसाठी फक्त ५% भरावे लागतील .
- बाकीचा खर्च केंद्र & राज्य सरकार करत असतात.
- यासाठी ५ वर्षाची वारंटी(दुरुस्ती) इन्शूरन्स सह
- विजेचे बिल किंवा किंवा वीज कपातीचे भय आता नसेल .
- याच्या माध्यमातून सिंचनासाठी दिवसा वीज हमी दिली जातेय.
- शेतकऱ्यांचे या योजनेतून उत्त्पन्न वाढावे त्यांचे आर्थिक स्थैर्य वाढावे.
Magel Tyala Sour Pump Information in marathi
योजनेचे नाव | Magel Tyala Sour Pump |
कोणामार्फत सुरु केले | महाराष्ट्र शासन |
पोर्टल | पीएम कुसुम |
लाभार्थी | शेतकरी |
राज्य | महाराष्ट्र |
अर्जप्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | http://mahadiscom.in |
घोषणा | ८ लाख ५० हजार पंप |
योग्यता | महाराष्ट्रातील शेतकरी असावा व त्याच्याकडे शेतजमीन असायला हवीचं |
मागेल त्याला सौर पंप कागदपत्रे
- स्वतःचे जमिनीचा ७/१२ उतारा
- अर्जदार स्वतः शेत जमिनीचा एकटा मालक नसेल तर बाकी हिस्सेदारांचा ना हरकत हे स्टंप पेपर वर द्यावे लागेल.
- आधार कार्ड
- बँकेचे पासबुक
- जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती जमाती साठी )
- शेतकऱ्याच्या जमिनीतील पाण्याचा स्रोत हा डार्क झोन मध्ये असेल तर भूजल सर्वेक्षण विभागाचा ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे .
साधारणपणे शेतकऱ्याला योजनेसाठी भरावी लागणारी रक्कम
3 HP पंप | १७५०० ते १८००० रुपये |
5 HP पंप | २२५०० रुपये |
7 HP पंप | २७००० रुपये |
लाभार्थीची निवड खालीलप्रमाणे होईल
लाभार्थी शेतकऱ्याला जमिनीच्या क्षेत्रानुसार सौर पंप मिळणार आहेत
- ज्या शेतकऱ्याकडे ५ एकर शेतजमीन आहे त्याला ७.५ HP चा सौर पंप मिळेल .
- २.५ ते ५ एकर शेतजमीन असणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्याला ५ HP चा सौर पंप मिळेल.
- २.५ एकर शेतजमीन असणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्याला ३ HP चा सौर पंप मिळेल.
मागेल त्याला सौर पंप
मागेल त्याला सौर पंप पात्रता
- शेतकऱ्यांकडे स्वतःचे पाण्याचे स्रोत आवश्यक आहे
- जय शेतकऱ्यांकडे विहीर बोअरवेल ,सामुहिक शेततळे ,त्यासोबत शेतीच्या बाजूने नदी वाहत असेल तर तो शेतकरी या मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी पात्र असेल.
- जर शेतकऱ्यांना अटल सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतला असेल किंवा मुख्यमंत्री सौर पंप योजनेचा लाभ घेतला असेल तर तो या योजनेस पात्र असेल.
- धडक सिंचन योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी
- दुर्गम भागातील शेतकरी असेल त्यास अधिकचे प्राधान्य .
मागेल त्याला सौर पंप अर्ज प्रक्रिया
- Magel Tyala Saur Pump योजनेसाठी सुरवातीला महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mahadiscom.in/solar/ जावे.
- या अधिकृत संकेतस्थळावर उजव्या बाजूला ‘मागेल त्याला सौर पंप योजना‘ हा पर्याय निवडावा.
- समोर ‘लाभार्थी सुविधा ‘या पर्यायावर क्लिक करून ‘अर्ज करा‘ यावर क्लिक करावे.
- समोर अर्ज दिसल्यानंतर संपूर्ण माहिती अचूकपणे भरायची आहे
- शेतकऱ्याने याआधी कृषी पंप साठी केलेली जोडणी प्रलंबित असेल तर त्याचा संपूर्ण तपशील देणे .
- अर्जदार शेतकऱ्याचा तसेच जमिनीचा संपूर्ण तपशील देणे .
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचा रहिवाशी पत्ता अचूक टाकणे
- जो जलस्रोत शेतजमिनीत असेल त्याची माहिती देणे
- संपूर्ण कृषी तपशील देणे
- सध्याच्या पंपबद्दल माहिती देणे
- आवश्यक असणारा पंप त्याबद्दल माहिती देणे
- बँकेची संपूर्ण माहिती देणे.
- हि सर्व माहिती भरल्यानंतर समोर एक घोषणापत्र येईल त्यावर चौकोनी आकाराचा बॉक्स येईल त्यावर क्लिक करून अर्ज सादर होईल.
मागेल त्याला सौर पंप अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया
- ज्यावेळी अर्ज सादर केला जाईल त्यांनतर अर्जदार शेतकऱ्याच्या मोबाईल क्रमांकावर एक लाभार्थी क्रमांक तसेच अन्य स्वरुपाची माहिती येईल .
- याच लाभार्थी क्रमांकाच्या आधारे लाभार्थी आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकतो याच द्वारे भरायची रक्कम पाहू शकता तसेच तुम्हाला ज्या एजेन्सी आहेत त्यातून तुम्ही एजेन्सी निवडू शकता
- अर्ज सादर केल्यानंतर एजेन्सी आणि महावितरणचे अधिकारी अर्जदाराच्या शेतात संयुक्तपणे भेट देवून सर्व पडताळणी करून जर तुम्ही सर्व गोष्टीत योग्य असताल तर तुम्ही योजनेस पात्र आहेत. मग तुमचे सौर पंप इंस्टाल करण्याची प्रक्रिया सुरु होईल .
Magel Tyala Saur Pump तंत्रज्ञान
१.सौर पेनल –सौर पंप यातील सर्वात मुख्य घटक म्हणजे हा सौर पेनल .याच्या पेनल मध्ये सिलिकॉन वापरले जाते ज्यामुळे यात सूर्य उर्जा साठविली जाते .
२.पंप युनिट – याचा उपयोग पाण्याचा स्रोत उचलण्यासाठी आहे .सौर पेनल कडून येणारी उर्जाचा वापर करून पाणी पुढे पंप करत असते .
३.सौर पंप कंट्रोलर –याचा उपयोग सौर पेनल कडून येणाऱ्या विद्युत उर्जेचे नियमन योग्यप्रकारे करत असतो .आवश्यकतेनुसार योग्य प्रकारे विद्युत प्रहावाचे वाटप करण्यात येत असते
४.विद्युत ट्रान्सफोर्मेर –याचा उपयोग विद्युत प्रवाहाचा भर नियमित व सुस्थितीत ठेवणे आहे .त्यामुळे पंपाची क्षमता व्यवस्थित राहत असते.
५.पाईपलाईन तसेच डीस्ट्रीब्यूशन –पाईपाद्वारे संपूर्ण शेती मध्ये पाणी पोहचविले जाते ,त्याच योग्य नियोजन करायला हवे .ज्यामुळे व्यवस्थापन सुरळीत व सुलभ राहील.
६.कार्यप्रणाली -सूर्यप्रकाश जर जास्त असेल तर सौर पंपाची ताकद जास्त राहून तो जास्त वेळ कार्यरत राहू शकतो .कमी सूर्यप्रकाशात सौर पंपाची ताकद कमी राहू शकते.
Magel Tyala Sour Pump निष्कर्ष
Magel Tyala Sour Pump हा राज्यातील शेतकऱ्यांना वरदानच ठरलेला आहे ,या योजनेच्या माध्यमातून शेतात होनरा विजेचा लपंडाव यापासून शेतकरी तणावमुक्त होणार आहे .याच्यामुळे शेतीचे व्यवस्थापन चांगले होऊन शेतीत चांगली गुणवत्ता राहील .तसेच शेतकरी सुद्धा यातून समृद्ध ,आत्मनिर्भर होईल .
महत्वाची टीप
- लाभार्थीचा अर्ज अप्रून असेल तर कुठलेही पेमेंट करू नये .
- पेमेंट केल्यानंतर अर्जाची संपूर्ण छाननी होईल
- अर्जात काही त्रुटी आढळल्यास पेमेंट केलेला परतावा मिळण्यास बराच कालावधी लागू शकतो.
Magel Tyala Saur Pump 2025 संबंधी काही अडचणी आल्यास महावितरणचे अधिकृत टोल फ्री क्रमांक
१९१२/१९१२० |
१८०० -२१२-३४३५ |
१८००-२३३-३४३५ |
मागेल त्याला सौर पंप 2025 बद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ
सरकारच्या इतर योजनांच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळ पहावे .
योजना | संकेतस्थळ |
लाडकी बहिण योजना | https://shorturl.at/1kGlw |
महिलांसाठी ६ सरकारी योजना | https://shorturl.at/sYbKR |
संपूर्ण महाराष्ट्र मंत्रिमंडळ २०२४ | https://shorturl.at/jPiEx |
मुख्यमंत्री सहाय्यता निधी | https://shorturl.at/EqFBH |
पीएम किसान | https://shorturl.at/edLoj |
पीएम आवास योजना | https://shorturl.at/EqFBH |
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |
सतत विचारले जाणारे प्रश्न
१.Magel Tyala Sour Pump या योजनेच्या अर्ज प्रकियेचा कालावधी किती दिवसाचा आहे .
-या योजनेच्या संपुर्ण प्रक्रियेसाठी २ ते ३ आठवड्याचा कालावधी लागतो .यानंतरच पंप बसविण्याची प्रक्रिया चालू होईल.
२.सौर पंप बसवण्याची किंमत किती आहे ?
-या योजनेसाठी शेतकऱ्याला ठराविक रक्कम भरावी लागते ,उर्वरित रक्कम शासन भरत असते .शिवाय पंपाच्या क्षमतेनुसार किमत कमी जास्त होऊ शकते .
३.सौर पंपाची वारंटी किती आहे ?
-सदरच्या सौर पंपाची वारंटी हि ५ वर्षाची असेल ,पंपाच्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास संबधित पंप पुरवठा करणारे जबाबदारी घेत असतात.
४.मुख्यमंत्री सौर पंप योजना कधी अस्तित्वात आली ?
-मुख्यमंत्री सौर पंप योजना जुने २०१७ मध्ये अस्तित्वात आली .
५.Magel Tyala Saur Pump मध्ये शेतकऱ्याला किती रक्कम भरावी लागते
-या योजनेसाठी केवळ १०% रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणर आहे
६.Magel Tyala Saur Pump मध्ये शेतकऱ्याला किती HP चे पंप मिळणार आहेत ?
-शेतकऱ्याला या योजनेतून ३ ,५ आणि ७.५ HP चे पंप दिले जातात
७.पूर्वी सौर पंप न वापरलेले शेतकरी Magel Tyala Saur Pump योजनेचा लाभ घेवू शकतात का ?
-होय ,या योजनेचा ते लाभ घेवू शकतात ,सुरवातीला आलेली अटल सौर पंप तसेच मुख्यमंत्री सौर पंप योजनेच लाभ घेतला नसेल तर या योजनेस शेतकरी पात्र असेल .