HSRP आपल्या भारत देशातील सन २०१९ पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत आता या गाड्यासाठी सरकारने नवीन नियम आणला आहे .या सर्व गाड्यांच्या नंबर प्लेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. HSRP म्हणजे हाय सिकुरीटी रजिस्त्रेशन प्लेट.
HSRP Number Plate महाराष्ट्र राज्यातील सर्वच वाहनांना आता HSRP नंबर प्लेट सक्तीची करण्यात आलेली आहे .रस्ते ,वाहतूक ,महामार्ग विभागाच्या वतीने देशातील सर्वच वाहनांना नंबर प्लेट बसविणे सक्तीचे केलेले आहे. हि नवीन नंबर प्लेट अल्युमिनिअम पासून बनवली गेली आहे त्यामुळे भविष्यात या गाडीचा शोध घेणे किंवा अन्य गोष्टी साठी सोप्प होणार आहे.
या नवीन नंबर प्लेटमुळे भविष्यात चोरी होणार्या वाहनाचा शोध घेणे सोप्पे होणार आहे ,या नंबर प्लेट ला छेडछाड करणे सोप्पे नाही ,पण असे काही केल्यास पुन्हा दुरुस्त करता येणार नाही.सर्वच जुन्या गाड्यांना या HSRP नंबर प्लेट नोंदणी करणे गरजेचे आहे .१ एप्रिल २०१९ नंतर घेतलेल्या सर्वच वाहनांना या नंबर प्लेट बसविल्या गेल्या आहेत ..दुचाकी असो किंवा चार चाकी सर्वच गाड्यांना नंबर प्लेट बसवावी लागणारच आहे.
HSRP नंबर प्लेट 2025
नोंदणी प्रक्रिया पुढीलप्रमाणे
HSRP नंबर प्लेट 2025 साठीची नोंदणी हि वाहनधारकांना फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. या नवीन नंबर प्लेट साठी जवळच्या वाहन प्रादेशिक कार्यालयात जावे लागेल .अर्ज सदर करताना वाहनाची कागदपत्रे सुधा जमा करावी लागणार आहेत .अर्जप्रक्रिया झाल्यावरच यासंबधीची रक्कम जमा करावी लागेल , त्यानंतर संबधित अधिकारी अर्जदाराला नंबर प्लेट देवू शकेल.महाराष्ट्र राज्यातील जुन्या गाड्यांच्या वाहनांना नंबर प्लेटसाठी रुपये ४०० मोजावे लागणार आहेत तर दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी रुपये ११०० मोजावे लागणार आहेत .

HSRP Number Plate फायदे
- HSRP नंबर प्लेट असल्यावर कुठल्याही प्रकारची छेडछाडी होणार नाही
- महाराष्ट्र राज्यात होणारी वाहन चोरींचे प्रमाण कमी होणार आहे
- वाहन चोरीतून होणार्या गुन्हांच्या प्रमाणात घट होण्यास मदत होणार.
- यासार्व्च गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यास मदत होईल
- तसेच वाहनधारकांना वाहन चोरी होण्यापासून मोठे समाधान मिळेल
- या नंबर प्लेटचे पालन केल्यास दंड टाळता येणार आहे
HSRP नंबर प्लेट 2025 वैशिठ्ये
- या HSRP नंबर प्लेट या अल्युमिनिअम पासून बनलेल्या असल्यामुळे त्याचा दर्जा उत्तम राहणार आहे
- या नंबर प्लेटमध्ये नंबर असेलच पण यात एक कोड असणार आहे ज्यामुळे वाहनाची संपूर्ण ओळख यात समजणार आहे
- या नंबर प्लेटचे आयुष्य हे किमान ५ वर्ष तरी राहते
- या नवीन प्लेट मध्ये क्रोमिअम धातूपासून बनवलेलं होलोग्राम नक्षीदार आहे
- या नंबर प्लेटची डुप्लिकेट करणे शक्य नाही
- प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला IND लिहिलेले असणार आहे
- प्लेटला एक विशिष्ठ प्रकरचा १० नकी क्रमांक असणार आहे
- नंबर प्लेट जोडताना त्याला स्क्रप लोक असण्याने ते काढता येणे शक्य नाही.
HSRP नंबर प्लेट स्टिकर्स
विशिष्ठ प्रकारचे स्टिकर्स हे वाहनांमध्ये भरणाऱ्या इंधनांवर अवलंबवून असणार आहे
- केशरी (भगवा) कलर – डीझेल वाहने
- निळा -पेट्रोल व सीएनजी वाहन
- हिरवा -इलेक्ट्रिक वाहने
HSRP महाराष्ट्र शुल्क
वाहनाचा प्रकार | HSRP शुल्क |
दुचाकी | ८५० रुपये |
तीनचाकी | १२३० रुपये ते १६४० रुपये |
चारचाकी | १९७५ रुपये ते २०५० रुपये |
जड वाहने | १३४५ रुपये ते १९७५ रुपये |
HSRP कागदपत्रे
- आधार कार्ड
- लायसेन्स
- वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC )
- राहत्या पत्त्याचा पुरावा
- नवीन वाहन घेतले असेल तर त्याचे बिल
- वाहनाच्या विम्याचे कागदपत्र
HSRP महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यात HSRP ची अंमलबजावणी जलद अन सुलभ होण्यासाठी संबधित विभागाने ३ विभाग केलेले आहेत. या तिन्हीही विभागांमध्ये महाराष्ट्र राज्यातील RTO कार्यालये विभागली आहेत. अनुक्रमे विभाग १ मध्ये १२ तर दुसऱ्या विभागांमध्ये १८ तर तिसऱ्या विभागांमध्ये २० कार्यालये विभागली आहेत. या सुटसुटीत पणामुळे या HSRP नंबर प्लेटची अंमलबजावणी जलद होणार आहे. २०१९ पूर्वीच्या सर्वच वाहनांना HSRP बसविणे बंधनकारक केलेले आहे ,यासाठी मोटार वाहन विभाग वेगाने पावलं उचलत आहेत.
महाराष्ट्रात HSRP Number Plate यासाठीचे ३ विभाग करण्यात आलेले आहेत
विभाग १ मधील RTO कार्यालये – ठाणे ,बोरीवली ,पुणे ,कोल्हापूर ,पनवेल , अमरावती ,वाशीम ,यवतमाळ ,नागपूर पूर्ण,नागपूर उत्तर ,इचलकरंजी .
विभाग २ मधील RTO कार्यालये -मुंबई पुर्व ,मुंबई सेन्ट्रल ,वसई ,कल्याण ,पेण (रायगड),रत्नागिरी ,मालेगाव ,सातारा ,फलटण ,नंदुरबार ,पिंपरी चिंचवड ,सोलापूर , छत्रपती संभाजीनगर ,वर्धा , नागपूर ग्रामीण ,गोंदिया ,गडचिरोली.
विभाग ३ मधील RTO कार्यालये – मुंबई (पश्चिम ), वाशी (नवी मुंबई ),अहिल्यानगर,सिंधुदुर्ग ,नाशिक ,श्रीरामपूर ,धुळे ,जळगाव ,चाळीसगाव ,भडगाव ,सांगली ,कराड ,अकलूज , बारामती , बीड ,जालना , अंबेजोगाई ,उदगीर, लातूर,धाराशिव,परभणी , अकोला , हिंग्गोली , बुलढाणा ,चंद्रपूर ,खामगाव ,भंडारा .
HSRP Number Plate अर्जप्रक्रिया
या नंबर प्लेट साठी अर्जदार तीन प्रकारे अर्ज करू शकणार आहे.
HSRP पोर्टल द्वारे अर्जप्रक्रिया
- सरकारच्या अधिकृत HSRP पोर्टल /वेबसाईट वरती भेट द्यावी.
- दुचाकी ,तीनचाकी ,चारचाकी यातील आपल्या पसंतीचा प्रकार निवडणे
- चासी क्रमांक ,इंजिन क्रमांक ,नोंदणी क्रमांक सहित सर्व माहिती भरावी
- या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे/ RC सहित अपलोड करावीत
- सर्व प्रक्रिया नंतर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे
- बुकिंग केल्यानंतर स्थापनेची तारीख मिळवा
Book My HSRP पोर्टलद्वारे अर्जप्रक्रिया
- Bookmyhsrp या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी
- रंगीत स्टिकर्ससह उच्च सुरक्षा नोंदणी याप्रकारे नंबर प्लेट निवडावी
- चासी क्रमांक तसेच इंजिन क्रमांक हे सर्व अचूक पद्धतीने भरावे
- खाली येणारा कॅप्चा अचूकपणे भरावा
- फिटमेंट ठिकाण तसेच अपोइंटमेंट स्लॉट अचूकपणे निवडणे
- यानंतर पेमेंट करावे व नंतर पेमेंटची पावती डाऊनलोड करावी
- शेवटी Installation साठी निवडलेल्या ठिकाणी भेट द्यावी
RTO आरटीओ कार्यालयातील अर्जप्रक्रिया
- HSRP नंबर प्लेटसाठी अर्जदाराने जवळच्या RTO कार्यालयात जावे
- ओळखपत्र ,राहत्या घराचा पत्ता असलेल्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सदर करावीत
- आवश्यक तो नोंदणी शुल्क भरणे
- अंतिमतः खात्रीकरून installation ची तारीख मिळवा
HSRP नंबर प्लेट अर्जाची स्थिती कशी पहावी
अर्जदाराने अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहात
- सरकारच्या अधिकृत असलेल्या HSRP वेबसाईटला सर्वप्रथम भेट देणे
- वाहन नोंदणी करताना मिळालेला क्रमांक टाकावा
- यासंबंधीचे सर्वच अपडेट मिळवण्यासाठी TRACK STATUS यावर क्लिक करावे
नागरिकांसाठी संपर्क
- HSRP Booking Portal Links
- विभाग १-Rosmerta safety Systems Ltd –https://mhshrp.com
- विभाग २ -Real Mazon India Ltd –https://mhshrpzone2.com
- विभाग ३ -FTA HSRP Solutions pvt ltd – https://maharashtrahsrp.com
HSRP प्रक्रिया रद्द कशी करावी/रकमेचा परतावा कसा मिळवावा ?
- सर्वात प्रथम अर्जदाराने HSRP महाराष्ट्र पोर्टल यावर लोगिन करणे आवश्यक आहे
- समोर असलेला पर्याय “अर्ज रद्द करा ” यावर क्लिक करावे
- संपूर्ण स्वतःचा तपशील देणे आवश्यक तसेच रद्द का करत आहात याचे कारणही द्यावे लागेल.
- हे संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर पृष्टीकरणासाठी थोडी वाट पहावी लागेल
- परतावा प्रक्रीयेसाठी अर्जदाराला ७ ते १० दिवसांचा कालावधी लागेल
HSRP व कार विमा
जेंव्हापासून महाराष्ट्र राज्यात HSRP चा नियम लागू झालाय त्याच नंतर विमा वरती सुधा परिणाम जाणवू लागला आहे ,जर वाहनमालकाकडे HSRP नंबर प्लेट नसेल तर गाडीच्या चोरीच्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते .आता काहि कंपन्यांनी विम्यासाठी HSRP नंबर प्लेट आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
HSRP नंबर प्लेट निष्कर्ष
महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाड्या चोरी होत आहेत ,त्यांचे तपास लागण्यास सुद्धा विलंब लागतो. राज्याने HSRP सक्तीची केल्याने आता गाड्या चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या प्लेट अतिशय सुरक्षित आहेत ,वाहनाची सर्व माहिती या नंबर प्लेट मध्ये असणार आहे. वाहन चोरींचे गुन्हेही कमी होतील.रस्त्यावरील सुरक्षेत अधिक प्रमाणात वाढ होईल. अजूनही आपण या सुरक्षित नंबर प्लेटसाठी अर्ज केला नसेल तर आजच अर्ज करा आणि आपल्या गाड्यांची सुरक्षा वाढवा.
HSRP Number Plate हेल्पलाईन क्रमांक आणि अधिकृत संकेतस्थळ
HSRP अधिकृत संकेतस्थळ | https://www.hsrpmh.com/ |
HSRP अधिकृत हेल्पलाईन क्रमांक | 8929722201 |
HSRP ऑनलाईन अर्ज | http://bookmyhsrp.com |
इमेल आयडी | online@bookmyhsrp.com |
महत्वाची सूचना
- नंबर प्लेट साठीची मिळालेली पावती हि ९० दिवसांसाठी वैध धरली जाईल.
- वाहनचालकाने ९० दिवसाच्या आत नंबर प्लेट बसविण्यासाठी उपस्थित राहिला नाही तर सदरची नंबर प्लेट हि रद्द केली जाईल .तसेच या प्रक्रियेसाठी भरलेले पैसे माघारी मिळणार नाहीत.
- HSRP नंबर प्लेट 2025 च्या प्रत्येक प्रक्रियेवेळी अर्जदाराला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज केले जातील.
- याचमुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असल्याचे निष्पन्न होते.
HSRP नियम व अटी
- केंद्राच्या मोटर वाहन कायदा १९८९ नुसार वाहनास HSRP प्रकरची नंबर प्लेट बसविणे अनिवार्य आहे.तसेच रस्ते वाहतूक मंत्रालय दिल्ली यांच्या GSR 1962(E) दिनांक ०४/१२/२०१८ व S O ६०५२(E ) ता . ०६/१२/२०१८ नुसार ता .०१/०४/२०१९ नुसार नवीन उत्पादन झालेल्या सर्व वाहनांना HSRP Number Plate बसविण्याची तरतूद करण्यात आलेली आहे
- महाराष्ट्र राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी घेतलेल्या गाड्यांना HSRP ची नंबर प्लेट असणे आवश्यक आहे ,जर वाहनांना नंबर प्लेट नसेल तर त्या वाहन धारकावरती सुरवातीला रुपये ५००० तर दुसऱ्या वेळी रुपये १०००० पर्यंत दंड लागू शकतो.
इतर सरकारी योजनाच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळे पहावीत
योजनेचे नाव | संकेतस्थळ |
पोस्ट ऑफिस भरती २०२५ | https://shorturl.at/s380v |
कृषी ड्रोन अनुदान योजना | https://shorturl.at/v5BN7 |
शेतकरी ओळखपत्र २०२५ | https://shorturl.at/iXYFS |
कुसुम सोलर पंप योजना | https://shorturl.at/w1you |
शेतकरी फार्महाऊस योजना | https://shorturl.at/gu9oD |
महाडीबीटी | https://shorturl.at/tio4g |
आमचे अधिकृत संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |