Drone Anudan Yojna 2025 नमस्कार शेतकरी बांधवानो ,केंद्र सरकार ,राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना आणत असते .

त्यातीलच एक योजना म्हणजे कृषी ड्रोन अनुदान योजना Drone Anudan Yojna 2025.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून दिली जातात. याच्यामुळे शेतकरी आधुनिकतेकडे वाटचाल करेल हा उद्देश आहे .यामुळे शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी होईल अन पिक फवारणी प्रभावी अन जलद गतीने होईल . कृषिप्रधान असलेला भारत देश ,या देशात प्रामुख्याने शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो.शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा ,शेतातील कामे त्वरित उरकता यावीत यासाठी सरकारने हि कृषी ड्रोन अनुदान योजना Drone Anudan Yojna अंमलात आणली आहे. शेतकरी जेंव्हा शेतात पिकांवरती कीटकनाशके फवारणी करत असतो त्यावेळी त्याचे यापासून संरक्षण होत नसत.अनेक शेतकरी या फवारणीमुळे विविध आजाराला सामोरे जात आहेत ,अनेक त्वचेचे रोगही होत आहेत. याच सर्व गोष्टींचा विचार करूनच सरकारने ड्रोन योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला ड्रोन खरेदीसाठी ५ लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.सध्याच्या काळात ड्रोन खरेदी महाग असल्यामुळे सरकारने ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात मोठा वाटा उचलला आहे.
Drone Anudan Yojna थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | कृषी ड्रोन अनुदान योजना |
कोणामार्फत योजना सुरु झाली | महाराष्ट्र राज्य |
विभाग | कृषी विभाग |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
लाभ | रुपये ५ लाखांचे अनुदान |
उद्देश | ड्रोन खरेदीसाठी अनुदान देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन ,ऑनलाईन |
कृषी ड्रोन अनुदान योजना 2025 उद्धीष्टे
- Drone Anudan Yojna अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रद्यानाचा वापर होऊन शेतकरी समृद्ध होईल हा या मागील खरा उद्देश आहे.
- या नवीन ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांना पारंपारिक पद्धतीने होणार्या फवारणीपासून मुक्तता मिळेल ,आरोग्य चांगले राहील.
- आर्थिक बाबींमुळे शेतकऱ्याला ड्रोन खरेदी करण्यासाठी आता कोणताही आर्थिक सामना करावा लागणार नाही.त्या सर्वाना आता या योजनेमधून अनुदान देण्यात येणार आहे.
- शेतकऱ्याला शेतातील कामे त्वरित उरकता यावीत , त्याला काही गोष्टीमधून आराम मिळावा हा यामागील खरा उद्देश.
कृषी ड्रोन योजना 2025 वैशिष्ट्ये
- कृषी ड्रोन योजना 2025 हि योजना कृषी विभाग यांनी सुरु केलेली आहे.
- या ड्रोन योजनामधुन अनुदानित रक्कम आहे ,हि रक्कम सरळ सरळ शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
- या योजनेमधून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्याला ड्रोन खरेदी करणे सहज परवडणार आहे.
- हि ड्रोन योजना संपूर्ण देशात सुरु करण्यात आलेली आहे ,यामुळे संपूर्ण देशातील शेतकरी आता हे ड्रोन खरेदी करू शकणार आहे.
- या योजनेची अर्ज प्रक्रिया अतिशय सुलभ पद्धतीने करण्यात आलेली आहे ,त्यामुळे शेतकऱ्यांना आता अर्ज करताना कुटलीही अडचण येणार नाही.
कृषी ड्रोन प्रात्यक्षिक चाचणी संस्था
- कृषी विद्यापीठ
- भारतीय कृषी संशोधन केंद्र
- भारतीय परिषद संस्था
- कृषी विद्यान केंद्र
- शेतकरी उत्पादन संस्था
- कृषि यंत्र व अवजारे तपासणी संस्था
कृषी ड्रोन अनुदान योजना लाभार्थी
कृषी ड्रोन अनुदान योजना अनुदान योजना हि भारतातील सर्व शेतकरी बांधवांसाठी असणार आहे ,भारतातील सर्वच शेतकरी या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात
कृषी ड्रोन योजना पात्रता
- Drone Anudan Yojna साठी अर्जदार शेतकरी हा मुळ महाराष्ट्रीय नागरिक असावा.
- या योजनेसाठी कृषी विज्ञान केंद्र ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,शेतकरी उत्पादन संस्था ,कृषी विद्यापीठ हे सर्व पात्र असतील.

कृषी ड्रोन योजना लाभ
- कृषी ड्रोन योजनेचा महत्वाचा लाभ म्हणजे शेतीची काम लवकरात लवकर होतील
- कृषी ड्रोन अनुदानमुळे शेती विषयक विविध काम जलद गतीने होतील
- ड्रोन योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्याला रुपये ५ लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे
- ग्रामीण भागात तरुअनने दहावी शिक्षा करून या संबंधीचे तंत्र शिक्षण घेतल्यास सरकारकडून रुपये ४ लाखांपर्यंत अनुदान दिले जाते
- ड्रोन विकत घेवून ते जर भाडे तत्वावर दिल्यास नवीन व्यासाय चलू होईल आर्थिक बाबी सुधारतील ,या निमित्ताने रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल
- राज्यातील शेतकरी बांधवाना ड्रोन खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैश्यासाठी कोणावरही अवलंबवुन राहावे लागणार नाही
Drone Anudan Yojna अंतर्गत मिळणारे अनुदान
- कृषी विद्यापीठ व सरकारी संस्था १००% अनुदान ( १० लाखांपर्यंत अनुदान ) मिळणार
- शेतकरी उत्पादक संस्थांनी हे ड्रोन भाड्याने घेतल्यास प्रती हेक्टर रुपये ६ हजार रुपये अनुदान मिळणार
- कृषी पदवीधारकांनी अवजारे सेवा केंद्र टाकल्यास त्यांना 5 लाखांपर्यंत अनुदान मिळणार
- अवजारे सेवा सुविधा केंद्र यांना द्रोने खरेदी करताना रुपये ५ लाखांपर्यंत अनुदान मिळणार (म्हणजेच ५०% अनुदान )
- शेतकरी उत्पादक संस्था ७५% अनुदान मिळणार (७ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळणार )
- संस्थांनी कृषी ड्रोन राबविल्यास रुपये ३ हजार अनुदान मिळणार
कृषी ड्रोन योजना नियम व अटी
- महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही
- कृषी ड्रोन योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे
- अर्जदार जर कृषी पदवीधर असेल तर त्यांच्याकडे कृषी पदवी असावी
- एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्यालाच या कृषी ड्रोन अनुदान योजनेचा लाभ मिळेल
- अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे
- अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँकेशी संलग्न असायलाच हवे.
- अर्जदार शेतकरी सरकारी सेवेत नोकरी करणारा नसावा.
- जर शेतकऱ्याने यापुर्वी केंद्र अथवा राज्य सरकारच्या दुसऱ्या योजनेतून ड्रोन अनुदानाचा लाभ घेतल्यास ते या कृषी ड्रोन अनुदान योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही
कृषी ड्रोन अनुदान योजना कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक खाते पासबुक
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल क्रमांक
- इमेल आयडी
- पासपोर्ट फोटो
- ड्रोन कोटेशन बिल
- संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
- कृषी पदवी प्रमाणपत्र
- स्वयं घोषणापत्र
- संमती पत्र
Drone Anudan Yojna 2025 अर्ज प्रक्रिया
- या कृषी ड्रोन अनुदान योजना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे
- या प्रक्रियेसाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जवळील जिल्हा कार्यालयात जावे लागणार आहे
- त्यानंतर अर्जदाराला जवळील कृषी कार्यालयात जावे लागेल
- कृषी विभागातून अर्जदाराला ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
- अर्जदाराने संपूर्ण अर्ज अचूकपणे भरणे महत्वाचे आहे
- अर्ज भरल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणर आहेत
- शेवटी सदरील अर्ज हा कार्यालयात जमा करावी लागेल
- अश्या पद्धतीने तुम्ही रीतसर अर्ज करून या ड्रोन योजनेचा लाभ घेवू शकाल.
ऑनलाईन अर्जप्रक्रिया
महाडीबीटी पोर्टल वर अर्जदार आता अर्ज करू शकतील
कृषी यांत्रिकीकरण या विभागात आता ड्रोन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे ,सन २०२४ -२०२५ यामध्ये ड्रोन योजनेची प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.शेतकरी , शेतकरी उत्पादक ,शेतकरी सहकरी संस्था यासार्वनी आता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत .
अधिकृत संकेतस्थळ |

ड्रोन योजना फायदा
ड्रोन चा वापर केल्याने शेतकऱ्याला पिकांवर लक्ष देता येईल ,पिकांवर औषध फवारणी सोप्पे होईल .कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त क्षेत्रावर ड्रोनच्या मदतीने फवारणी करणे शक्य होणार आहे .ड्रोन मुळे पिक तसेच त्यावर पडणाऱ्या रोगांची माहिती ठेवणे सोप्पे होणार आहे.
ड्रोनसाठी शासनाकडून ट्रेनिंग
शेतकऱ्यांना ड्रोनबद्दल संपूर्ण माहिती तसेच ड्रोन कसे चालवावे त्याचे नियंत्रण कसे करावे हे सर्वच शासन माहितीद्वारे शेतकऱ्याला देणार आहे .ड्रोन द्वारे औषध फवारणी कश्याप्रकारे करावी त्याचेही प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे.
ड्रोन अनुदान योजना प्रमुख महत्वाच्या गोष्टी
- ड्रोन उडण्यासाठी उंची किती असावी –हे ड्रोन ५० ते १०० मीटर या दरम्यानच चालतात ,शेतीमध्ये पहावारणी वेळी आपण ते ड्रोन पिकांच्या वर २ ते ३ मीटर या उंचीवर ठेवावेत ,५० मीटर च्या पुढे आपल्याला परवानगीची आवश्यकता असेल .
- परवाना आवश्यक आहे का ?-नियम नियमांनुसार गैर वापरासाठी तसेच मायक्रो ड्रोन साठी कुठ्ल्याही पायलट परवानगीची आवश्यकता नाही
- हवामान परिस्थिती –हे ड्रोन कुठल्याही वातावरणात चालू शकतात ,फक्त पावसाळ्यात अधिक पावसामुळे थोडीशी अडचण येवू शकते.
- ड्रोनची किंमत – सार्वजनिक वापर करण्यासाठी ड्रोनची किंमत हि ३.५ लाख रुपये आहे तर कृषी ड्रोनची मॉडेलनुसार किंमत हि ७.५ लाख ते १२ लाख रुपये या दरम्यान आहे . उच्च तंत्रद्यान असलेल्या ड्रोन साठी रुपये १५ लाख रुपये पासून पुढे किंमत असू शकते.
योजनेसाठी संपर्क कोणाला करावा
संबधित कृषी सहाय्यक अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून योग्य ती माहिती आपल्याला मिळणार आहे
तुम्हीही खालील योजनेचा लाभ घेवू शकता
योजनेचे नाव | संकेतस्थळ |
तुकडा बंदी कायदा २०२५ | https://shorturl.at/9btGw |
मागेल त्याला सौर पंप २०२५ | https://shorturl.at/uiZYe |
शेतकरी ओळखपत्र २०२५ | https://shorturl.at/iXYFS |
कुसुम सोलर पंप योजना २०२५ | https://shorturl.at/w1you |
शेतकरी फार्महाऊस योजना २०२५ | https://shorturl.at/gu9oD |
महाडीबीटी शेतकरी योजना २०२५ | https://shorturl.at/tio4g |
पीएम किसान सन्मान निधी २०२५ | https://shorturl.at/edLoj |
आमचे अधिकृत संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |
सतत विचारले जाणारे काही प्रश्न FAQs
१.शेतीसाठी कोणते ड्रोन आवश्यक /वापरले जाते ?
-शेतीमध्ये वापरल्या जाणारया ड्रोनला हे UAV (मानवरहीत हवाई ड्रोन ) म्हंटले जाते,ज्यामध्ये कॅमेरे , सेन्सर ,डेटा रिकवरची साधने असतात.
२. शेतीमध्ये ड्रोन चा वापर नक्की कश्यासाठी केला जातो ?
-शेतांमध्ये पिकांवर खते ,किटकनाशके फवारणीसाठी या ड्रोनचा वापर केला जातो.
३. ड्रोन योजनेचा उद्देश काय आहे ?
-शेतकऱ्याला ड्रोन साठी अनुदान देणे ,रोजगार निर्मिती करणे ,शेतकऱ्याला समृद्ध ,प्रगतशील बनवणे .