Chief Minister Relief Fund 2025 मुख्यमंत्री सहाय्यता निधी हि योजना म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सामान्य गरीब कुटुंबासाठी एकप्रकारे देवदुतासारखी योजना ठरली आहे . या योजनेच्या माध्यमातून सामान्य ,गरीब कुटुंबातील व्यक्तीला दुर्धर आजार असेल तर त्याला या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अर्थसहाय्य करत असते .नैसर्गिक आपत्तीमध्ये जर एखाद्या कुटुंबामध्ये हानी झाली तर लगेच राज्य सरकार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून त्या कुटुंबाला आर्थिक मदत करून आधार देत असते .या योजना सरकारच्या अधिनियम 1950 अंतर्गत येते .गरीब कुटुंबाला आर्थिक सहाय्य करून करून त्यांचे पुनर्वसन करणे हा मागील उद्देश आहे .या योजनेचे संपूर्ण नियंत्रण मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असते .
योजनेचे नाव | मुख्यमंत्री सहाय्यता निधी |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल वंचित घटक |
लाभ कश्याप्रकारे मिळतो | २ लाखापर्यंत अर्थसहाय्य केले जाते |
उद्देश | दुर्बल घटकांना मोफत उपचार मिळवून देणे |
विभाग | आरोग्य विभाग |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
अर्ज कश्याप्रकारे करता येतो | ऑनलाईन व ऑफलाईन |
मुख्यमंत्री सहाय्यता निधी उद्दीष्टे
Chief Minister Relief Fund ची प्रमुख उद्दीष्टे पुढीलप्रमाणे –
- महाराष्ट्र राज्यातील गरीब वंचित रुग्णांना उपचार देणे किंवा शस्र्यक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरुपात मदत करणे
- हल्ल्यात मरण आलेले किंवा गंभीर जखमी झालेले यांच्या वारसदारांना आर्थिक मदत तत्काळ करणे
- नैसर्गिक आपत्तीमध्ये हानी झाल्यास तत्काळ मदत करणे
- दुर्मिळ आजार असलेल्या रुग्णांना त्वरित मदत करणे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कागदपत्रे
- सदरील रुग्णाचे आधारकार्ड
- सदरील रुग्णाचे रेशनकार्ड
- तहसीलदार यांच्या सहीचा उत्पन्नाचा दाखला
- रुग्णाच्या आजाराचे संपूर्ण विश्लेषण असलेले कागदपत्रे
- रुग्णाचा अ[अपघात असल्यास एफआयआर किंवा एमएलसी आवश्यक आहे .
- रुग्णाचे अवयव प्रत्यारोपण असल्यास त्यासाठी सदरील रुग्णालयाचे प्रमाणपत्र आवश्यक .
- सदरील रुग्णालयाची नोंद हि मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडे आहे कि नाही हे पाहणे आवश्यक .
मुख्यमंत्री सहाय्यता निधी महत्वाची सूचना
- दिलेली माहिती खोटी अथवा संशयास्पद असेल तर अर्ज नाकारला जाईल अन याठ्चीत कायदेशीर करविला सामोरे जावे लागेल.
- अर्ज दाखल करताना जोडावयाची असलेली कागदपत्रे हे स्वतः साक्षांकित केलेली असावीत.
- जर सदरील अर्जदार सरकारच्या ज्योतिबा फुले जन आरोग्य योजन ,आयुषमान योजना किंवा धर्मादाय रुग्णालयाशी संबधित असल्यास अर्ज नाकारण्यात येईल
- सदरील रुग्णाने उपचार घेतल्यानंतर अथवा रुग्णालयातून घरी डिस्चार्ज दिल्यानंतर अर्थसहाय्य दिले जाणार नाही .
मुख्यमंत्री सहाय्यता निधी मुखपृष्ठ
Chief Minister Relief Fund
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी संपूर्ण अर्ज फोटोसहित भरणे cmrf.maharashtra.gov.in/pdf/medical%20%E2%80%A6
- रुग्ण जिथे उपचार घेत आहे त्या हॉस्पिटलचे कोटेशन ,सोबत त्या हॉस्पिटलचे प्रमुख सिविल सर्जन यांचा सही व शिक्का आवश्यक .
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला १६०००० पर्यंतच आवश्यक
- अपघात झाला असल्यास FIR रिपोर्ट
- सिटीस्कॅन ,MRI रिपोर्ट
- रुग्णाचे अवयव प्रत्यारोपण असेल तर त्यासंबंधी रिपोर्ट
- aao.cmrf-mh@gov.in यावर आपला अर्ज करून यासंबंधीमूळ प्रत पोस्टाद्वारे पाठवावी.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नावे पुढीलप्रमाणे
मुख्यमंत्री सहायता निधी मिळणाऱ्या आजारांचे नावे |
कर्करोग शस्रक्रिया |
हृदयरोग |
डायलिसीस |
लहान मुलांवरील शस्र्यक्रिया |
गुडघ्याचे प्रत्यारोपण |
अपघात |
मेंदूवरील उपचार |
नवजात मुलांवरील शस्र्यक्रिया |
फुप्सुस प्रत्यारोपण |
किडनी प्रत्यारोपण |
बोन मारो प्रत्यारोपण |
यकृत प्रत्यारोपण |
कोकलीयार इम्प्लांट (वयवर्ष २ ते ६ ) |
हिप रेप्लसमेंट |
हाताचे प्रत्यारोपण |
हृदयरोग |
आगीत होरपळलेले रुग्ण |
विद्युत अपघात झालेले रुग्ण |
अपघात शस्र्यक्रिया |
फडणवीस सरकारची नवीन घोषणा
नुकतच विधानसभेचा निकला लागला , जनेतेने भरभरून प्रेम हे महायुतीच्या पारड्यात टाकलेले आपल्यला दिसले ,महायुतीचे सरकार स्थापन होऊन जेमतेम १०/१२ दिवस झालेत पण राज्यातील जनतेला सर्वात मोठी या नवीन घोषणेतून देण्यात आली आहे ,लाडकी बहन योजना प्रचंड गाजली ,गाजत आहे .त्याच धर्तीवर पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना देशाचे कृषिमंत्री/ग्रामविकासमंत्री असलेले श्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले कि प्रधानमंत्री आवाज योजन अंतर्गत महाराष्ट्र राज्यात तब्बल २० लाख घरे बांधण्यात येणार असून त्याचा लाभ बऱ्याच लोकांना घेता येणार आहे लाडके भाऊ ,लाडकी बहिण लाडके शेतकरी सर्वच या योजनेमध्ये भाग घेवू शकतील!
Chief Minister Relief Fund 2025 मधून प्रत्येक रुग्णांना मदत मिळायलाच हवी
Chief Minister Relief Fund 2025 नोव्हेंबर २०२४ पर्यंत या मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा कारभार ज्यांनी उत्तमरित्या पाहिला असे कक्षप्रमुख श्री मंगेश चिवटे यांनी माहिती देताना सांगितले कि मागील अडीच वर्षात जवळपास ३७ हजारापेक्षा जास्त रुग्णांना प्रत्यक्ष लाभ या मधून मिळाला आहे .जवळपास आतापर्यंत २९० कोटी रुपये वंचित ,गरीब गह्ताकातील रुग्णांना देण्यात आला आहे .या कक्षाला मिळणारा प्रतिसाद हा खूप जास्त आहे ,सर्व सकारात्मक आहेत या योजनेबद्दल .हि सरकारची गेल्या २०/२५ वर्षातील सर्वात महत्वकांक्षी योजना ठरलेली आहे .माही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आधीच याबद्दल बोलताना सांगितले आहे .ज्याला मदत लागेल त्याला तत्काळ मदत झालीच पाहिजे .एकही घटक यापासून वंचित राहायला नको .
Chief Minister Relief Fund मधून मदत कशी मिळवता येईल
Chief Minister Relief Fund 2025 मधुन रुग्णांना अर्थसहाय्य / मदत मिळवणे निशुल्क स्वरूपाचे आहे .मदत मिळवण्यासाठी कोणतीही संस्था अथवा कार्यालयात कुठलाही मोबदला घेतला जात नाही .हे कक्ष मंत्रालयात असून तेथेही तुम्हाला जाण्याची गरज नाही .या अर्थसहाय्य साठी संपूर्ण प्रक्रिया ओनलाईन आहे किंवा ८६५०५६७५६७ यावर संपर्क केल्यास तुम्हाला अर्ज प्राप्त होईल .
मुख्यमंत्री सहाय्यता निधी पात्रता
या योजनेत नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर,वादळ ,भूकंप असे अपघात तसेच दंग्यात बाधित झालेले लोक ,कुटुंबीय या सर्वाना तत्काळ मदत यामधून दिली जाते .तसेच जे आजार असतील त्या सर्वाना त्वरित मदत या योजनेतून दिली जाते .
पुराची परीस्थिती |
भूकंप |
तीव्र दुष्काळ |
ढगफुटी भुस्कलन |
अतिवृष्टी |
वित्त प्रकारचे नुकसान झाल्यास अर्थसहाय्य खालीलप्रकारे देता येईल
पंचनामा केल्यावर नुकसान प्रमाण | मंजूर झालेले अर्थसहाय्य |
२५००० पर्यंत | ३००० रुपये |
२५ ते ५० हजार पर्यंत | ५००० रुपये |
५०००० ते १०००० पर्यंत | १०००० रुपये |
१ लाख ते १.५ लाख पर्यंत | १५००० रुपये |
१५०००० ते त्यापेक्षा अधिक पर्यंत | २०००० रुपये |
योजनेचा लाभ कोणाला घेता येणार नाही
- रेल्वे ,विमान ,मोटार ,जहाज अपघात मध्ये हानी झाल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून लाभ दिला जाणार नाही
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची योजना म्हणजे एकप्रकारे वरदानचं
राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री,विद्यमान सरकार मधील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरु झालेली हि योजना आज स्गरीब , वंचित घटकांना वरदानच ठरत आहे ,शिंदे यांचेहि याकडे सर्वात जास्त लक्ष असते त्यांची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना हि सर्वात लोकप्रिय ठरलेली आहे .अतिशय उत्तम कार्य करणाऱ्या शिंदे यांना या माध्यमातून गरिबांचे कित्येक आशिर्वाद मिळत आहेत .
पुण्यातील काही रुग्णालयांची यादी
- डॉ .नायडू रुग्णालय ,पुणे स्टेशन ,पुणे
- कमला नेहरू रुग्णालय मंगळवार पेठ पुणे
- अमृत हॉस्पिटल आळंदी देवाची पुणे
- आनंद हॉस्पिटल पुणे
- शारदा क्लिनिक शंकरशेठ रोड घोरपडी पेठ पुणे
- आनंद हॉस्पिटल भोसरी पुणे
मुख्यमंत्री सहाय्यता निधी – संस्थेसाठी अर्थसहाय्यता
मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून विविध शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था तसेच ज्या सांस्कृतिक संस्था सेवाभावी म्हणून कार्य करतात त्या अर्थसहाय्य करणे .यांना मिळणारा निधी हा ‘मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधी’ म्हणून देण्यात येत असतो . हा सर्व विभाग मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत येत आहे . अर्थसंकल्पात यासाठी तरतूद म्हणून दरवर्षी रुपये १ कोटी इतका निधी दिला जातो .राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर तत्काळ निधी त्यांना हस्तांतरित हा सामान्य प्रशासन विभाग मार्फत केला जातो.
महत्वाच्या बाबी
- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांच्या आजारांवर मोफत इलाज करण्यात येतो
- रुग्णांची तसेच जिल्ह्यातील समन्वयक यांची यादी पाहण्यासाठी www.jeevandayee.gov.in
- मुख्यमंत्री यांच्या वैद्यकीय समिती रुपये २५ हजार ते २ लाख पर्यंत रुग्णांना उपचारासाठी मदत करत असते.
- राज्यातील तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांची यादी पाहण्यासाठी http://cmrf.maharashtra.gov.in
मुख्यमंत्री सहाय्यता निधी बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
http://cmrf.maharashtra.gov.in |
022-22026948 |
8650567567 |
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज
रुग्णालयांची यादी
इतर सरकारी योजना जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळ पहावे
योजनांचे नाव | संकेतस्थळ |
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२५ | https://shorturl.at/1kGlw |
सुकन्या समृद्धी योजना | https://goto.now/tv5AE |
प्रधानमंत्री आयुषमान योजना | https://shorturl.at/jRPsY |
महिलांसाठी ६ योजना | https://shorturl.at/sYbKR |
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | https://shorturl.at/niZP9 |
अधिक माहितीसाठी आमचे संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
१.मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधुन अतिशय दुर्मिळ असलेल्या आजारी रुग्णांना किती निधी दिला जातो .
-या योजनेद्वारे दुर्मिळ आजर असलेल्या रुग्णांना रुपये २५ लक्ष पर्यंत निधी दिला जातो .
२.मुख्यमंत्री सहाय्यता निधी खरा उद्देश काय आहे ?
-राज्यातील नागरिकाचे आरोग्य उत्तम रहावे तसेच त्यांचा आजारांवर होणारा खर्च वाचविण्यासाठी हि योजना सरकारने अंमलात आणली आहे.
३.मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे पहिले प्रमुख कोण होते
–श्री मंगेश चिवटे हे या कक्षाचे पहिले प्रमुख होते .
४.सध्याचे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख कोण आहेत .
-डिसेंबर २०२४ मध्ये श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कक्षाचे प्रमुख म्हणून डॉ श्री रामेश्वर नाईक यांची नेमणूक केलेली आहे.
५.मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष खरा उद्देश काय ?
-गरीब ,वंचित घटकांचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे ,संकटात मदत करणे ,गंभीर आजारपण असलेया रुग्णांना त्वरित मदत करणे या खरा उद्देश आहे