Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojna 2025 छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना हे राज्य शिवछत्रपतींचे .शिवरायांनी ज्या पद्धतीने आपल्या काळात सामान्य जनतेची काळजी घेतली ,शेतकऱ्यांच्या देठाला सुद्धा धक्का लागला तर खैर नाही.अतिशय सूक्ष्म पद्धतीने महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याचा कारभार पार पडला होता .अगदी त्याच विचारांवर /धोरणावर आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी ही कल्याणकारी योजना आणलेली आहे .या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत .ज्यामुळे शेतकऱ्यांची शेताची उत्पन्नाची क्षमता वाढविण्यासाठी मदत होणार आहे.राज्याच्या कृषी विभागाच्या विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना या एकाच छताखाली आणण्याचा सरकारनं एक मोठा यशस्वी प्रयोग केलेला आहे ,या सर्व नवीन उपक्रमाला “छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना “ असे नाव देण्यात आले आहे .
Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojna 2025 थोडक्यात पार्श्वभूमी
महाराष्ट्र राज्यात कित्येकवेळा दुष्काळाचे सावट ,कित्येकवेळा नैसर्गिक आपत्ती आलेली आपण पाहिली ,अशीच आपत्ती सन २०२० -२०२२ दरम्यान राज्यात आली ,कापुस ,सोयाबीन सारखे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले होते .यादरम्यानच्या काळात विदर्भात या विषयी मोठे आंदोलं उभे राहिले या, मोठ्या आंदोलांची दखल राज्य सरकारने लगेच घेतली होती आणि या नैसर्गिक आपत्ती मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक योजना अंमलात आणण्याचे जाहीर केले . ज्यामुळे शेतकऱ्यांना आदह्र आणि आत्मविश्वास देता येईल.छत्रपती शिवाजी महराज कृषी योजना अंतर्गत राज्य सरकारकडून रुपये १००० कोटी निधीची तरतूद करण्यात आली ,यातून शेतकऱ्याला विविध पायाभूत सिविधा मिळू लागल्या .
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना वैशिष्ठ्ये
- या योजनेचे वैशिट्य म्हणजे यात शेततळे ,शेडनेट ,फळबाग आणि इतर अनेक घटक यात सामील आहेत .
- या नवीन योजनेत १००० कोटींची तरतूद
- महाडीबीटी पोर्टल ला सरकरी कुठल्याही योजनेची माहिती ,अर्ज अगदी सोप्प्या पद्धतीने करता येतो .
- या योजनेंतर्गत आधुनिक उपकरण तसेच नवनवीन पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात .
- ज्या लाभार्थीचा अर्ज सुरवातीला येईल त्यालाच प्रथम प्राधान्य दिले जाते .
Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojna फायदे
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना मधून शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेतच शिवाय फळबाग ,हरितगृह , शेडनेट ,आधुनिक पेरणी यंत्रे यांसारख्या कित्येक घटकांचा यात समावेश केलेला आहे .या घटकांद्वारे उत्पन्नात वाढ होईल ,जल व्यवस्थापन,पिकांच संरक्षण हे सर्व या योजनेत शेतकऱ्यांना मदत म्हणून होणार आहे .महाडीबीटी पोर्टल द्वारे शेतकऱ्यांना कित्येक योजनांचा अर्ज अगदी जलद अन सोयीस्कररित्या भरता येणार आहे.
सरकारकडून १००० कोटींची तरतुद आणि कार्यवाही
Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojna ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १००० कोटींची तरतुद आलेली आहे ,या योजनेतून तात्काळ शेतकऱ्यांना मदत तसेच जे घटक या योजनेत आहेत त्याचाच ताबडतोब पुरवठा केला जाईल . सुरवातीला या योजनेसाठी सरकारकडून ६०० कोटींची तरतूद केलेली आहे ,दुसर्या टप्प्यात या योजनेसाठी ४०० कोटी देण्यात येत आहेत .या योजनेमध्ये असलेली लोटरी पद्धतबंद केलेली आहे .या योजनेत जो शेतकरी सुरवातीला अर्ज करेल ,त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे .
Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojna अर्जप्रक्रिया
- Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojna मध्ये जवळपास एकूण २७ योजना मधून शेतकऱ्यांना ३५ प्रकारच्या घटकांमधून लाभ देण्यात येत आहे .
- या योजनेत शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी सरकारचे महाडीबीटी पोर्टल वर उपलब्ध करण्यात आलेले आहे .जेवढे घटक यात आहे ते सर्व पोर्टल वर उपलब्ध करून दिलेले आहेत
योजनेचा लाभ कसा घ्यावा
- योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांनी अर्ज करावा.
- योजनेसाठी अर्ज करताना नाव ,आधार क्रमांक ,जमिनीची (महसूल) माहिती भरावी लागेल .
- शेतकऱ्यांचा अर्ज वैध ठरला तर शेतकऱ्याला त्याच्या आधार कार्ड सोबत जोडलेल्या बँकेत अनुदान वर्ग केले जाईल .
योजना अंमलबजावणी
- Chatrapati Shivaji maharaj Krushi Yojna ची अंमलबजावणी हि कृषी विभागाकडून करण्यात येईल .
- या सूचनेसाठी सरकारने काही सूचना ,निर्देशक ,अटी घातलेलेया आहेत ,या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यावरच लाभार्थीला विविध योजनांचा लाभ घेता येईल .
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना अधिकृत संकेतस्थळ /टोल फ्री क्रमांक
महाडीबीटी पोर्टल | https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login |
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना GR | https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202310181214035701.pdf |
इतर सरकारी योजना जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळ पाहावे
तुकडा बंदी कायदा 2025 | https://shorturl.at/9btGw |
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2025 | https://shorturl.at/1kGlw |
महाडीबीटी शेतकरी योजना २०२५ | https://shorturl.at/tio4g |
पीएम किसान योजना | https://shorturl.at/edLoj |
शेतकरी फार्महाऊस योजना | https://shorturl.at/gu9oD |
मागेल त्याला सौर पंप योजना २०२५ | https://shorturl.at/uiZYe |
महिलांसाठी ६ सरकारी योजना | https://shorturl.at/sYbKR |
आमचे अधिकृत संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |
सतत विचारले जाणारे प्रश्न
१.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात शेतीसाठी एकूण किती धोरणे तयार केली होती
-त्याकाळी स्वराज्यात महाराजांनी काही अधिकारी यासाठी निवडले होते ,काही म्हसुल्त्यावेली गोळा केला जायचा ,जो निश्चित केलेला असायचा , कोणताही इतरत्र कर त्यावेळी शेतकऱ्यांवर लादला जात नव्हता .त्याकाळी जर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले , आपत्ती आली तर त्यांना या महसूल ,करातून सूट दिली जात होती .
२.छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना कधी पासून शासन निर्णय अंमलात आणला गेला ?
–१८ ऑक्टोबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच शासन निर्णय झालेला आहे .
३.छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेचे पूर्वीचे नाव काय होते ?
– छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेचे पुर्वीचे नाव ‘मागेल त्याला शेततळे’ होते .
४.Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojna एकूण किती प्रमुख घटकांना एकत्र करून बनवण्यात आली आहे ?
-एकूण ९ प्रमुख घटकांना म्हणजेच मागेल त्याला शेततळे ,मागेल त्याला शेततळे ,मागेल त्याला ठिबक सिंचन ,मागेल त्याला तुषार सिंचन ,मागेल त्याला शेततळे अस्तरीकरण ,शेडनेट , हरितगृह ,बिबिएफ व कॉटन श्रेडर देणे .