Ajit Portal अजित पोर्टल 2025 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नुकतीच एक चांगली घोषणा केली आहे,सर्व कृषी योजना ,त्या योजनाचा लाभ ,अनुदान सहज शेतकऱ्याला मिळावे यासाठी राज्य सरकार अजित पोर्टलचे संकेतस्थळ तयार करत आहे. ज्याच्या आधारे शेतकऱ्याला कृषिविषयक सर्व काही एकाच ठिकाणी अन सहज मिळू शकेल . नुकतेच शिर्डी येथे पार पडलेले राष्ट्रवादी पक्षाचे अधिवेशन,या अधिवेशनात राज्याचे कृषिमंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी बोलताना या नवीन पोर्टलची घोषणा केली . आतापर्यत राज्यात अनेक कृषी विभागात वेगवेगळे प्रयोग राबवले गेले आहेत , अनेक कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पुढे आणल्या , राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गोष्टी वेळोवेळी कृषी विभागाकडून पार पाडल्या जातात .पूर्वी काही योजनामध्ये भ्रष्टाचार होत असेल तो कमी करण्यासाठी महाडीबीटी सारखी योजना सरकारने यशस्वीपणे राबवली आहे . याच्या माध्यमातून शेतकऱ्याला सहजपणे अर्ज करता येवू शकतात.

Ajit Portal अजित पोर्टल 2025
अजित पोर्टल हा ऑनलाईन पद्धतीने चालणारा योजनांचा प्लटफॉर्म आहे .विविध शासकीय योजना या एकाच ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहेत. यांत शेतकऱ्याला DBT अनुदान,सबसिडी अन इतर योजनांचा थेट फायदा अथवा लाभ बँकेच्या खात्यात मिळणार आहे .यासाठी शेतकऱ्याला कागदपत्रे जमा करण्याची अडचण येणार नाही .योजनांमध्ये होणारा गैरप्रकार ,भ्रष्टाचार यामुळे नाहीसा होणार आहे .
अजित पोर्टल वैशिठ्ये
Ajit Portal अजित पोर्टलची वैशिठ्ये पुढीलप्रमाणे – |
- एक खिडकी प्रणाली –राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता कृषी योजनांचा लाभ हा एकाच ठिकाणी मिळणार आहे.आता शेतकऱ्याला विविध योजनाच्या माहितीसाठी इतरत्र दुसऱ्या ठिकाणी माहिती अथवा घेण्याची गरज नाही ,आता सरकारने एकाच ठिकाणी एकाच पोर्टल वर सर्व योजनांची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे .
- डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर(DBT) –शेतकऱ्याला सर्व योजना थेट DBT या प्रणालीमुळे थेट बँकेच्या खात्यात पोहचवण्यात येणार आहे ,या मिळणाऱ्या सर्व अनुदानाचा फायदा शेतकऱ्याला मिळेल.आधी लागणाऱ्या विलंबाच्या प्रकिर्येपासून मुक्ती मिळणार आहे .
- कृषी क्षेत्रात/योजनात होणाऱ्या गैरप्रकार /भ्रष्टाचार यावर नियंत्रण – नुकतेच कृषिमंत्री झालेले शी माणिकराव कोकाटे यांनी बोलताना सांगितले कि या DBT प्रणालीमुळे कृषी विभागात असणारा गैर्प्रक्र ,भ्रष्टाचार कमी होण्यास नक्की मदत होणार आहे .या पोर्टल मुले योजनेचे व्यवस्थापन योग्य होईल .कारभार पारदर्शक ,कार्यक्षम होण्यास मदत होईल .

महिला शेतकऱ्यांसाठी Ajit Portal अजित पोर्टल
राज्यातील महिला शेतकरी वर्गासाठी नवीन कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली .या अजित पोर्टल मुळे या महिलांच्या कार्यपद्धतीला नवीन स्वरूप प्राप्त होईल.सुलभ ,पारदर्शक पद्धतीने योजनाचा लाभ घेता येईल .
कृषी क्षेत्रातील सुधारणा
कृषिमंत्री श्री माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजनामध्ये बदल तसेच पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न चालू आहे .अजित पोर्टलमुळे शेतकऱ्यांना अधिक सुविधेचा लाभ मिळणार आहे ,पोर्टलमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही .
शेतकऱ्यांच्या अपेक्षा
शेतकऱ्यांना या नवीन पोर्टल बद्दल खूप उत्सुकता आहे ,सरकारने या पोर्टल बद्द्द्ल पारदर्शकता आणि सुलभतेने शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे फार आवश्यक आहे .पूर्वी योजनांची अपुती माहिती ,अनुदान येण्यास विलभ ,या सर्व गोष्टीपासून आता आशेत्कारी मुक्त होईल ,सर्व सुविधा आता सुलभतेने मिळताना दिसतील .
Ajit Portal निष्कर्ष
नुकतीच कृषी विभागता घोषणा झालेले Ajit Portal हे सरकारचे एक मोठे पूल असणार आहे .शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे अमुलाग्र बदल तसेच सुदाह्र्ण यावेळी होताना नक्कीच दिसतील .यातून शेतकऱ्यांना थेट पद्धतीने योजना ,अनुदान मिळणार आहेच शिवाय पारदर्शक सेवा यावेळी मिळतील .यामुळे कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल .सर्व योजन अधिक प्रभावी ठरतील .
NMNF 2025 एनएमएनएफ योजना
NMNF 2025 केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच कृषी मंत्रालयामार्फत नेशनल मिशन ऑन नेचुरल फार्मिंग एनएमएनएफ हि वेगळी योजना जाहीर केली आहे .देशात होणाऱ्या नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार कडून अनेक योजना आणल्या जातात .याच बाबींचा विचार करून केंद्र शासनाने हि स्वतंत्र योजना सुरु करण्यास मंजुरी दिलेली आहे.या योजेनेचे खरे वैशिठ्य म्हणजे याच्या माध्यामातून नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणे .

NMNF नैसर्गिक शेती म्हणजे काय ?
देशाच्या कृषी विभागाने नैसर्गिक शेतीची व्याख्या हि संपूर्ण शेती रसायनमुक्त शेती अश्याप्रकारे केलेली आहे.शेतीमध्ये रासायनिक खत अर्थात युरिया ,फोस्फेट यांसारख्या खताऐवजी शेणखत , गांडूळ खत या खतांचा वापर लागवडीसाठी वापर केला जातो ,शेतीमध्ये खतांचा वापर ज्या भागात जास्त आहे त्याठिकाणी या योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी करण्यात आली आहे.

एनएमएनएफ योजना जुनी कि नवी?
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात सुरु केलेल्या भारतीय प्राकृतिक कृषी पद्धत या उपक्रमाचा हा खरा भाग आहे.देशाच्या कृषी विकास योजनेंतर्गत हा उपक्रम चालू होत आहे .केंद्र सरकारने २०२२ -२०२३ या काळात नमामि गंगे या मोहिमेंतर्गत पवित्र गंगा नदीच्या काठावर ५ किलोमीटर च्या अंतरात या नैसर्गिक शेती योजनेची अंमलबजावणी चालू केली आहे.मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यावर पहिल्या १०० दिवसात NMNF लागू केली त्यामुळे नैसर्गिक शेतीला चालना देण्यास भर मिळाला पूर्वी बिकेपी मधून आलेलं अनुभव पाहता तोच अनुभव एनएमएनएफ योजनेच्या विस्तारात वापरला आहे. २३ जुलै रोजी अर्थमंत्री यांनी सांगितले कि पुढील २ वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसगिक शेती करण्यसाठी चालना देणार आहोत .जाहिराती , प्रमाणीकरण या वर भर देवून नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन दिले जाईल .
NMNF नैसर्गिक शेती आकडेवारी
भारतात आतापर्यंत तब्बल २२ लाख हेक्टर क्षेत्र हे नैसर्गिक शेतीखाली आले आहे.जवळपास ३५ लाख शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले आहे .सरकारच्या बिकेपी मुले ४ लाख हेक्टर क्षेत्र तर ‘नमामि गंगे योजनेंतर्गत ८८००० हेक्टरचा समावेश आहे .नैसर्गिक शेतीला चालना देण्यसाठी राज्य सरकार यांच्याकडून १७ लाख हेक्टर क्षेत्र यात समाविष्ठ करण्यात आले आहे .NMNFयोजना येणाऱ्या २ वर्षात १५ हजार ग्रामपंचायती मध्ये लागू केली जाईल अन हि योजना १ कोटी लोकांपर्यंत/शेतकऱ्यांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवली जाईलच.७.५ लाख हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक शेती सुरु करतील त्या शेतकऱ्यांना १० हजार बायो इनपुट रिसर्च सेंटर तयार करण्यात येतील असे संबंधित विभागाने सांगितले आहे .
एनएमएनएफ अधिवेशन घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण या चालू वारःतील म्हणजेच फेब्रुवारी २०२५-२६ चा अर्थसंकल्प सदर करणार आहेत .या NMNF संदर्भात नवीन घोषणा करण्याच्या विचारात आहेत.विशेष सवलती काय मिळणार आहेत ?याकडे देशातील शेतकरी वर्ग लक्ष ठेवून आहे .
जिओ टेगिंग होणार !
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती द्वारे घेतलेल्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी सोप्पी प्रणाली , ब्रान्डडिंग,जाहिराती केले जाईल तसेच एनएमएनएफ नुसार जिओ टेग मोनिटरिंग पोर्टलद्वारे योग्य पद्धतीने केले जाईल.
या योजनांचा लाभ मिळणार
देशातील पशुधन संख्या वाढवणे ,नैसर्गिक शेती याद्वारे पशुपालनसाठी निवारा ,या मोडेल द्वारे फार्मचा विकास करणे,स्थानिक शेतकऱ्यांना जिल्हा , राज्य स्तरावर बाजाराशी जोडणारी व्यवस्था करणे .बाजार समित्या ,मंडई याठिकाणी केंद्र / राज्य सरकार राष्ट्रीय / आंतराष्ट्रीय संस्थाच्या योजना लागू करणे ,त्यांना प्रोत्साहन देणे यापद्धतीने लाभही दिला जाणार आहे.

NMNF फायदे
नैसर्गिक शेतीमुळे शेतीचे मातीचे आयुष्य वाढेल ,निरोगी परिसंस्था वाढेल ,स्थानिक कृषी शास्राला अनुकूल असे नवनवीन पिक पद्धतीना यानिमित्ताने प्रोत्साहन मिळेल .नवनवीन पिकांच्या पद्धतीने शेतात शेतकऱ्यांच्या बैठकी वाढतील जेणे करून येणाया शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळेल. अश्याप्रकारे नैसर्गिक शेतीचे विविध फायदे होऊन शेतकरी समृद्धीकडे वाटचाल जलदगतीने करेल .
विध्यार्थी सहभाग
ग्रामीण कृषी कार्य अनुभव (RAWE) अंतर्गत पार पडणाऱ्या कार्यक्रमामधून नैसर्गिक शेतीबद्दल जागरूकता आणण्यासाठी पदवी,पदव्युतर ,पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या शासनाच्या अभियानाशी जोडले आहे .तरुण पिढी जेवढी याबद्दल जागरूक होईल तेवढे ग्रामीण भागात किंवा इतरत्र याबद्दलची जागरूकता लवकर पोहचेल .यात शेतकरी सहभागही वाढेल.
इतर कृषी विषयक योजनांच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळ पहावे
योजनेचे नाव | संकेतस्थळ |
तुकडा बंदी कायदा 2025 | https://shorturl.at/9btGw |
गाय गोठा अनुदान योजना | https://shorturl.at/0aBw4 |
मागेल त्याला सौर पंप योजना | https://shorturl.at/uiZYe |
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | https://shorturl.at/9btGw |
कुसुम सोलर पंप योजना | https://shorturl.at/w1you |
छत्रपती शिवाजी महराज कृषी योजना | https://shorturl.at/M7zBo |
शेतकरी फार्महाऊस योजना | https://shorturl.at/gu9oD |
महाडीबीटी योजना | https://shorturl.at/tio4g |
महिलांसाठी ६ सरकारी योजना | https://shorturl.at/sYbKR |
आमचे अधिकृत संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |
कुठल्याही सरकारी योजनेचा अर्ज भरण्यासाठी संपर्क | ९८९००९८९६२ |
सतत विचारले जाणारे प्रश्न FAQs
१.देशात नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यासाठी शासनाचे नवीन ध्येय काय आहे ?
-या मध्ये देशातील ७५०,००० हेक्टर वरील नैसर्गिक शेतीची ओळख करून देणे म्हणजेच ज्याचा फायदा ग्रामपंचायती मधील १५००० क्लस्टर मधील १० लाख शेतकऱ्यांना होतो .सुरवातीला हे प्रायोगिक क्षेत्र म्हणून काम करेल ,शेतकरी वर्गाला नफ पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाईल.जमिनीवर प्रत्यक्ष अनुभव दिले जातील .
२.नैसर्गिक शेतीचे जनक कोण आहेत ?
-नैसर्गिक शेतीचे जनक म्हणून मासानोबू फुकूओका यांना मानले जाते ,मासानोबू फुकुओका यांनी पर्यावरणीय शेतीचा दुष्टीकोन समजून त्यावर बरेच काम केले होते (१९१३-२००८ )
३.नैसर्गिक शेतीचे खरी अर्थाने आधारस्तंब कोणते आहेत ?
-बिजामृत ,जीवामृत ,आच्छादन ,अन मातीमधील ओलावा हे खरे चार आधारस्तंब आहेत.
४.नैसर्गिक शेतीमध्ये गांडूळ खताला परवानगी आहे कि नाही ?
–नाही ,गांडूळ खात हे सेंद्रिय खत वाढविण्याचे मुख्य साधन आहे ,झेरो बजेट नैसर्गिक शेती मध्ये हे येत नाही .
५.भारतातील नैसर्गिक शेतीचे जनक कोण आहेत ?
–श्री सुभाष पालेकर हे भारतीय नैसर्गिक शेतीचे जनक आहेत ,त्यांनी यावर अनेक पुस्तके आणि प्रात्याक्षिके सुधा केली आहेत.
६. नैसर्गिक शेती किती फायदेशीर आहे ?
-शेतकऱ्याचे होणारे उत्पन्न , कमी उत्पादन खर्च ,आणि चांगल्या गुणवत्तेच्या उत्पादनासाठी चांगले बाजारभाव यामुळे नैसर्गिक शेती येत्या काळात मोठी फायदेशीर ठरू शकते.
७. नैसर्गिक शेती आणि सेंद्रीय शेती यामधील फरक काय आहे ?
-सेंद्रिय शेती मध्ये अनुक्रमे सेंद्रिय खते ,शेणखत ज्यामध्ये गांडूळ खात , कंपोस्ट ,शेणखत इ वापर करून सेंद्रिय खत होते आणि नैसर्गिक शेती मध्ये न रासायनिक खते वापरली जातात ना सेंद्रिय खते वापरली जातात .
८.नैसर्गिक शेतीचे किती प्रकार आहेत ?
-प्रजनन क्षमता शेती ,सेंद्रिय शेती ,शाश्वत शेती ,कृषी वनीकरण ,पर्यावरण-शेती