Agri Product Export Subsidy|कृषी उत्पादने निर्यात अनुदान योजना 2025

Agri Product Export Subsidy |कृषी उत्पादने निर्यात अनुदान योजना 2025 शासनाकडून शेतकरी तसेच नव उद्योजक यांच्यासाठी अनेक योजना आणल्या जात आहेत.

त्यातीलच नवीन योजना म्हणजे २०२४ मध्ये आलेली सागरी मार्गाने कृषी उत्पादन निर्यात अनुदान योजना.हि योजना विशेषकरून शेतकरी वर्गासाठी आणलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याने स्वतच्या शेतात पिकवलेल्या उत्पादनाला जागतिक स्तरावर घेवून जाता यावे.या योजनेमध्ये सागरी मार्गाद्वारे नवीन देशात कृषी माल निर्यात करण्यासाठी सहाय्य अर्थात अनुदान देण्यात आहे .समुद्रामार्गे आपल्याकडील कृषी माल दुसरया देशात पाठवल्यानंतर शेतकरी , शेतकरी गट ,कंपन्या ,शेतकरी उत्पादन कंपनी ,सहकारी संस्था ,निर्यातदार या सर्वाना प्रत्येक कंटेनर मागे रुपये ५०००० (२०*४०फुट ) अनुदान देण्यात येणार आहे .लाभार्थीला प्रत्येक वर्षी हे रुपये १ लाख अनुदान देण्यात येणार आहे.

सागरी मार्गाने कृषी उत्पादन निर्यात अनुदान योजना उद्देश

  • शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य अन चांगला भाव मिळवून देणे
  • शेतकरी कृषी मालाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढवणे
  • शेतकऱ्याला निर्यातीत मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणे

सागरी मार्गाने कृषी उत्पादन निर्यात अनुदान योजना -नियम व अटी

  • सागरी मार्गाने कृषी उत्पादन निर्यात अनुदान योजनेसाठी शेतकरी नोंदणीकृत असायला हवा,सहकारी संस्था ,कंपन्या ,शेती महामंडळ , तसेच निर्यातदार या योजनेस पूर्णपणे पात्र असणार आहेत.
  • महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मंडळींनी तसेच ,सहकरी संस्था .कंपन्या .शेती महामंडळ ,निर्यातदार यांना आपल्याकडील कृषी उत्प्दाने सागरी मार्गाने अर्थात कंटेनर द्वारे दुसर्या देशात पाठवू शकणार आहेत.
  • या योजनेच्या परवानगीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन महामंडळाकडे अर्ज करावा लागेल त्यांच्या सर्व परवानग्या आवश्यक आहेत
  • निर्यात करण्यासाठी लागणारा कृषी माल हा गुणवत्तापूर्ण असावा .माल जर गुणवत्ता पूर्ण नसेल तर निर्यातदार अपात्र ठरला जाईल
  • अर्जदार जेंव्हा परवानगी साठी अर्ज करेल तेंव्हा अर्ज हा विहित नमुन्यामध्ये करावा ,कंटेनर पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या पावत्या तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे यावेळी अर्जासोबत जोडावीत
  • या योजनेचा लाभ हा फक्त कृषी मालाचा नमुना पाठविण्यासाठी घेता येणार नाही
  • सदरील योजनेत पात्र झाल्यानंतर कृषी मालाची निर्यात समृद्र मार्गे ते करू शकतील ,शेतकरी , शेतकरी गट ,शेतकरी उत्पादन कंपनी ,सहकरी संस्था ,निर्यातदार यांना प्रत्येक कंटेनर रुपये ५० हजार इतक्या अनुदानास पात्र ठरेल .तसेच प्रत्येक लाभार्थीला वार्षिक रुपये एक लाख इतके असणार आहे.

कृषी उत्पादने निर्यात अनुदान योजना 2025

निर्यातीसाठी देश व कृषी उत्पादने प्रकार (मालाचा प्रकार )

देश मालाचा प्रकार (कृषी उत्पादन )
दक्षिण कोरिया आंबा ,केळी
ऑस्ट्रेलिया आंबा ,डाळिंब
अमेरिका आंबा, डाळिंब
अफगाणिस्तान केळी ,कांदा
कझाकिस्तान आंबा
इराण केळी ,आंबा
रशिया आंबा ,कांदा
मोरीशस आंबा , कांदा
युरोपियन संघ आंबा ,डाळिंब
कनाडा आंबा ,डाळिंब
इतर बाकी देश संत्रा
लाटविया कांदा ,इतर भाज्या

सागरी मार्गाने कृषी उत्पादने अनुदान योजना कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज अचूक भरलेला असावा
  • INVOICE (इनव्हाइस) कॉपी
  • कंटेनरची कृषी माल निर्यात भाडे पावती
  • संपूर्ण शिपिंग बिल
  • परकीय चलन घेणाऱ्या बँकेचे प्रमाणपत्र
  • बँकेमध्ये केलेल्या देवाण घेवाणचा पुरावा
  • वरील प्रकरचे सर्व कागदपत्रे हे निर्यात करणाऱ्यांनी त्यांचे संबधित प्रस्ताव MSAMB च्या विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे

Agri Products Export Subsidy वैशिष्टये

  • या योजेनेचे खरे वैशिठ्य म्हणजे शेतकरी ,शेतकरी गट ,निर्यातदार ,कंपन्या ,सहकारी संस्था यांचा समावेश या योजनेत होतो
  • या योजनेच्या माध्यमातून प्रती कंटेनर रुपये ५०००० अनुदान मिळणार आहे
  • या योजनेद्वारे प्रती लाभार्थी प्रती वर्षी रुपये १ लाख अनुदान मिळणार आहे
  • समुद्राच्या मार्गे कंटेनरद्वारे उत्पादने निर्यात करणे बंधनकारक आहे

Agri Product Export Subsidy फायदे

  • शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या फळ भाज्या या ह्या योजनेद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवू शकणार आहेत त्यामुळे भारतीय शेतकरी हे आपला माल जगभरातील लोकांना सहज विकू शकणार आहेत .
  • या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे ,मालाची पेकिंग तसेच कमी रुपयांमध्ये जास्तीत जास्त माल इतरत्र हलवणे या अनेक गोष्टीमुळे रोजगार निर्मिती होऊ शकणार आहे.
  • या Agri Product Export Subsidy मुळे नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होणार आहेत ,यातून अनेक नवीन मार्ग उपलब्ध होणार आहेत .
  • या सागरी मार्गाने कृषी उत्पादन निर्यात अनुदान योजना मुळे शेतकऱ्यांना आपला माल इतर देशात विकण्यासाठी मोठी मदत होणार आहे
  • या निर्यात प्रकीर्येसाठी सरकार मोठ्या प्रमाणावर अनुदान देणार असल्याने शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणावर धान्य पिकवता येणार आहे अन विकतही येणार आहे
  • याच्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनात मोठा बदल यामुळे होणार आहे

निष्कर्ष

  • देशातील ,राज्यातील शेतकऱ्यांना आता आपल्या शेतात दर्जदार माल पिकवून तो माल पर्देसःत पाठवता यावा यासाठी सरकारने या योजनेत अनेक गोष्टी केलेल्या आहेत ,शेतकऱ्यांना परदेशात माल विकून मोठ्या प्रमाणावर पैसे कमविण्याची संधी यामुळे प्राप्त झालेली आहे.यामुळे शेतकरीच नाहीतर शेतात राबणारे प्रत्येक हात यामुळे समृध्द होणार आहेत. शेतात सुद्धा अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत .

Agri Product Export Subsidy अधिकृत संकेतस्थळे

विभाग अधिकृत संकेतस्थळ
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ https://www.msamb.com/Documents/export_scheme_application.pdf
सागरी मार्गे कृषी माल निर्यात अनुदान योजना-हमी पत्र https://www.msamb.com/Documents/guarantee_letter.pdf
परिपत्रक https://www.msamb.com/Documents/Circular.pdf

इतर सरकारी योजना पाहण्यासाठी खालील संकेतस्थळ पहावे

योजनेचे नाव संकेतस्थळ
शेतकरी फार्महाऊस योजना https://shorturl.at/gu9oD
HSRP नंबर प्लेट https://shorturl.at/AJHgq
कृषी ड्रोन अनुदान योजना https://shorturl.at/v5BN7
शेतकरी ओळखपत्र 2025 https://shorturl.at/iXYFS
पीएम कुसुम सोलर पंप योजना 2025 https://shorturl.at/w1you
महाडीबीटी शेतकरी योजना https://shorturl.at/tio4g
मागेल त्याला सौर पंप योजना https://shorturl.at/uiZYe
आमचे अधिकृत संकेतस्थळ https://smartsahyadri.com/

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न

१.सागरी मार्गाने कृषी उत्पादन निर्यात अनुदान योजनेचा खरा उद्देश काय ?

-शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे ,निर्यातीला चालना देणे ,शेतमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे या योजनेमागील खरा उद्देश आहे.

२. सागरी मार्गे कृषी उत्पादक निर्यात अनुदान योजनेसाठी कोण पात्र असेल ?

-शेतकरी ,शेतकरी गट ,सहकरी संस्था ,निर्यात करणारे गट ,निर्यातदार ,उत्पादक कंपन्या इ .या योजनेसाठी पात्र असतील.

३. सागरी मार्गाने कृषी उत्पादन निर्यात अनुदान योजनेमध्ये किती लाभ / अनुदान मिळणार आहे ?

-या सागरी मार्गाने होणाऱ्या कृषी उत्पादने निर्यातीसाठी अनुदान हे रुपये ५०००० देण्यात येणार आहे .प्रत्येक लाभार्थी निर्यातदाराला वार्षिक अनुदान हे रुपये १ लाख देण्यात येणार आहे.