Mahila Yojna 2025 महिलांसाठी ६ योजना ,सुजलाम सुफलाम असणारा आपला महाराष्ट्र ,देशाला आर्थिक बळकटी देणारा महाराष्ट्र ,गेल्या ७५ वर्षात महाराष्ट्राने अशी प्रगती करून ठेवलेली आहे कि आज महाराष्ट्र देशात आर्थिक सामाजिक ,व्यापारी करणात सर्वात अग्रेसर राहिलेला आहे .राज्यात पुरुषांबरोबर महिलाही सर्व क्षेत्रात पुढे याव्यात ,त्यांचीही आर्थिक , सामाजिक प्रगती व्हावी ,त्याही समाजव्यवस्थेत टिकून राहाव्यात यासाठी केंद्राने अन राज्याने बऱ्याच योजना महिलांसाठी आणलेल्या आपण पाहिलेल्या आहेतच ,त्या प्रचंड प्रमाणात यशस्वी सुद्धा झालेल्या आहेत ,ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांपर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजनांबद्दल माहिती कमी पोहचते ,त्यांना सरकारच्या योजनांची माहिती व्हावी , योजनांमधून महिलांमध्ये बळकटी यावी. हाच यामागचा हेतू ठेवून खालील महिला योजना बद्दल माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहचवत आहोत.
Mahila Yojna In Marathi |महिलांसाठी ६ योजना

महिलांसाठी ६ योजना आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत :-
योजनांचे नाव |
लेक लाडकी योजना |
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना |
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना |
माझी कन्या भाग्यश्री योजना |
महिला समृध्दी कर्ज योजना |
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना |
१) लेक लाडकी योजना
Mahila Yojna 2025 लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलीना समृध्द तसेच सक्षमीकरणासाठी सरकारने एक यशस्वी प्रयत्न केलेला आहे ,या योजनेतून मुलीना १ लाख १ हजार रुपये देण्यात येतात ,या योजनेचा खरा उद्देश मुलींना मुख्य प्रवाहात आणून त्यांना योग्य शिक्षण मिळाव ,कुटुंबावरील आर्थिक भार कमी व्हावा हा या योजनेमागील प्रामाणिक हेतू असल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. महाराष्ट्र राज्याचा सन २०२३ च्या अर्थसंकल्पात मांडताना लेक लाडकी योजनेचा उल्लेख करत हि योजनाही कार्यान्वित करण्यात आली होती .राज्यातील सामान्य कुटुंबातील म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड असेल त्यांना यामध्ये सहभागी होता येईल तसेच या Mahila Yojna माध्यमातून पात्र कुटुंबातील मुलीला तिच्या जन्मापासून ते तिच्या वयाच्या १८ वर्षा पर्यंत तिला रुपये १ लाख १ हजार रुपये मिळतील.
लेक लाडकी योजना पात्रता –
- लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करणारे कुटुंब हे मूळ महाराष्ट्र मधीलच रहिवासी असावे.
- हि योजना फक्त ज्या लाभार्थी कुटुंबाकडे पिवळे ,केशरी रेशनकार्ड असेल त्यांनाच असेल.
- १ एप्रिल २०२३ नंतर जन्माला आलेल्या मुलीलाच या योजनेचा लाभ घेता येईल
लेक लाडकी योजना कागदपत्रे –
- मुलीच्या जन्माचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी असावे )
- लाभार्थी मुलीचे आधार कार्ड
- मुलीच्या पालकाचे आधार कार्ड
- पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड साक्षांकित प्रत
२.महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
Mahila Yojna 2025 महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना हि भारत सरकारच्या अखत्यारीत येते .Mahila Yojna 2024 नुसार या योजनेच्या माध्यमातून महिलांना तसेच मुलींना बचत तसेच गुंतवणुकीची आर्थिक सुरक्षा रहावी या हेतूने ,उद्देशाने हि योजना अंमलात आणली आहे.याच्या माध्यमातून देशातील महिला आत्मनिर्भर ,स्वावलंबी व्हाव्यात ,त्यांना गुंतवणुकीचे महत्व अधिक समजाव हा प्रमुख उद्देश.योजनेच्या माध्यमातून २ वर्षाला रुपये २ लाखाची गुंतवणूक करता येते .यात केलेल्या गुंतवणुकीवर ७.५ % इतका व्याजदर मिळतो.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र पात्रता –
- अर्जदार हा भारतीय नागरिक पाहिजे
- हि Mahila Yojna केवळ महिला व मुलींसाठी लागू करण्यात आलेली आहे.
- या योजनेत कमीत कमी रुपये १००० ठेवणे आवश्यक आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना कागदपत्रे-
- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यासाठी असणारा भरलेला अर्ज
- आधार कार्ड ,मतदान ओळखपत्र
- KYC फॉर्म ( नवीन खातेदार असेल तर )
- जमा केलेल्या रकमेनंतर बँकेकडून मिळालेली स्लीप
३.महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना
Mahila Yojna मध्ये महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ ही महाराष्ट्रातील महिलासाठी आहे,या योजनेच्या माध्यमातून महिलेला आधार देण्याचे कार्य होत असताना यातून महिला सक्षम तसेच सशक्त बनू शकेल हा या योजनेमागील उद्देश . या Mahila Yojna चा लाभ घेण्यासाठी महिलेला जवळच्या सरकारी कार्यालयात जावे लागेल.अर्ज भरताना सांगितलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडून जमा करावीत ,तुम्ही सादर केलेला अर्ज योग्य असेल तसेच तुम्ही या योजनेस पात्र ठरलात तर तुम्हाला या योजनेची पेन्शन चालू होईल. रुपये १००० पेन्शन शासनाकडून लाभार्थी महिलेला देण्यात येते.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना पात्रता –
- विधवा पेन्शन योजनेसाठी महिला हि भारतीय नागरिक असावी.
- महिलेचे वय ४० पेक्षा अधिक असावे
- महिलेचे कुटुंब गरीब दारिद्र्य रेषेखाली असावे .
- महिलेच्या पतीचे निधन झालेले असावे.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना कागदपत्रे –
- विधवा असल्याचे प्रमाणपत्र
- रेशनकार्ड
- विधवेचे वय ४० ते ६५ यामध्ये असावे
- विधवेचे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली असावे
- पतीच्या निधनानंतर महिलेने दुसऱ्या कोणाशीही विवाह केलेला नसावा
४.माझी कन्या भाग्यश्री योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना म्हणजे मुलींसाठी आलेली एक प्रकारची Mahila Yojna मधील क्रांतीच आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही .द्रारिद्र्य रेषेखाली येणारया कुटुंबातील सर्व मुलींसाठी हि योजना आहे . मुलीना शिक्षण ,आरोग्य सुधाराव त्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी हि योजना उदयास आलेली आहे .कित्येक कुटुबांची आर्थिक स्थिती हि चांगली नसल्यामुळे त्यांच्या मुलीना शिक्षण घेता येत नाही ,आरोग्याकडे लक्ष देता येत नाही म्हणुनच त्याच्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा ,आरोग्य उत्तम व्हाव .लहान वयात मुलीचे विवाह कमी करणे , मागील काळात होत असलेल्या मुलींच्या जन्मानंतरच्या हत्या बंद व्हाव्या हा या योजनेमागील खरा उद्देश .
माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता –
- योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब द्रारिद्र्यरेषेखाली असायला हवे
- महाराष्ट्रातील रहिवासी असायला पाहिजे
- मुलीचा जन्म दाखला
- अर्ज करतेवेळी पालकांनी परिवार नियोजनाचे प्रमाणपत्र सदर करणे गरजेचे .
माझी कन्या भाग्यश्री योजना कागदपत्रे –
- अर्ज करणाऱ्या मुलीचे आधार कार्ड
- उत्पन्नचा दाखला
- रहिवाशी दाखला
- जिथे वास्तव्य असेल तेथील पुरावा
५. महिला समृद्धी कर्ज योजना
महिला समृद्धी कर्ज योजना सध्या देशात राज्यात उद्योजक घडण्याचे प्रमाण खूप वाढीस लागले आहे , या उद्योजक मंडळींनी भारताला गेल्या १०/१५ वर्षात एक वेगळी उंची गाठून दिलेली आहे ,भारताला जगात प्रत्येक क्षेत्रात जो मान सन्मान दिला जातो त्यात अनेक नवीन उद्योजक लोकांचा सिंहाचा वाट आहे ,असेच उद्योजक घडावे देशाची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी ,यासाठी सरकार बराच प्रयत्न करत असते .त्यातच सरकारने महिला उद्योजक वाढावेत ,त्यांनीही देशाच्या जडण घडणीत हातभार लावावा म्हणूनच सरकारने बऱ्याच Mahila Yojna आणल्या त्यातीलच एक हि महिला समृद्धी योजना आहे ,हि योजना महिलाच्या स्वयं बचत गटांना बळकटी देणे त्यांना सक्षम करणे ,महिलांना स्वतःचा लघु उद्योग सुरु करण्यसाठी या योजनेतून आर्थिक मदत करणे हा या योजनेमागील प्रमुख उद्देश
महिला समृद्धी कर्ज योजना पात्रता –
- या योजनेसाठी महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ३ लाख पेक्षा कमी असावे .
- केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार महिला मागासवर्गीय असावी ती दारिद्र्य रेषेखाली असावी .
- महिलेचे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न रुपये १.५ लाख पेक्षा कमी असेल तर सदर बँकेला ५०% निधी द्यावा लागतो.
- बचत गटाचा भाग असणाऱ्या महिलांची संख्या २० पेक्षा जास्त असली पाहिजे .
महिला समृद्धी कर्ज योजना कागदपत्रे –
- आधार कार्ड , मतदान ओळखपत्र
- रेशनकार्ड
- राहत्या पत्त्याचा पुरावा
- सेल्फ हेल्प ग्रुप (SHG) सदस्यता असलेला पुरावा
६.प्रधानमंत्री मातृ वंदना योजना PMMVY
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना PMMVY भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १ जानेवारी २०१७ रोजी या योजनेची घोषणा केली होती. ही Mahila Yojna सामाजिक आर्थिक दुर्लभ घटकातील मातांना आधार देण्यासाठी तयार केली गेली होती. गरोदर महिला किंवा स्तनदा असणाऱ्या महिलांना मातृत्वचा लाभ घेता यावा यासाठी हि योजना आहे . ही Mahila Yojna 2025 भारत सरकारच्या महिला व बालविकास या मंत्रालयाच्या अधीन येते. या योजनेतील महिलांना आर्थिक प्रोत्साहन म्हणून रूपये ५००० हजार दोन हप्त्यांत दिले जातात. पहिला हप्ता रूपये ३००० , दुसरा हप्ता रूपये २००० दिला जातो.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना पात्रता –
- अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय वर्ष १९ पेक्षा जास्त असावे व ती गर्भवती असावी.
- हि योजना पहिल्या अपत्यासाठीच असेल
- १ जानेवारी २०१७ नंतर ज्या महिलांना अपत्य झाले असेल त्या सर्व महिला या योजनेस पात्र असतील .
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कागदपत्रे-
- योजनेचा अर्ज
- आधार कार्ड ओळखपत्र
- MCP कार्ड प्रत
- बँकेच्या पासबुकची प्रत
- अर्जदार महिला व तिच्या पतीचे हमीपत्र /समंती पत्र आवश्यक आहे.
महिलांसाठी ६ योजना अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळे –
योजनेचे नाव | अधिकृत सरकारी संकेतस्थळ |
लेक लाडकी योजना | https://lekladkiyojna.online/ |
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना | https://www.myscheme.gov.in/schemes/mssc |
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना | https://sjsa.maharashtra.gov.in/en/scheme-category/special-assistance |
माझी कन्या भाग्यश्री योजना | https://womenchild.maharashtra.gov.in |
महिला समृद्धी कर्ज योजना | https://nsfdc.nic.in/en/mahila-samriddhi-yojana |
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना | https://pmmvy.wcd.gov.in |
इतर सरकारी योजनांच्या माहितीसाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा –
योजनांची नावे | संकेतस्थळ |
सुकन्या समृद्धी योजना | https://goto.now/tv5AE |
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ | https://smartsahyadri.com/mukhyamantri-mazi-ladki-bahin-yojna-2024/ |
PM Kisan Yojna |शेतकरी सन्मान निधी योजना | https://shorturl.at/edLoj |
प्रधानमंत्री आयुषमान भारत योजना | https://shorturl.at/jRPsY |
इतर योजनांच्या अधिक माहितीसाठी आमचे अधिकृत संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQs –
१. महाराष्ट्रात मुलींसाठी कोणत्या योजना लागू केलेल्या आहेत ?
– १.लेक लाडकी योजना २.माझी कन्या भाग्यश्री योजना ३.सुकन्या समृद्धी योजना ४.बेटी बचाव बेटी पढाव योजना महाराष्ट्रात लागू केलेल्या आहेत
२.महिला योजना मधील माझी कन्या भाग्यश्री कधी चालू झाली ?
– १ एप्रिल २०१६ पासून हि योजना राज्यात लागू केली गेली , या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे तसेच त्यांचे आरोग्याचा दर्जा उत्तम करणे हा या योजनेचा उद्देश.
३.महिला समृद्धी योजनेसाठी कोण पात्र आहे ?
– अर्जदार महिलेचे वर १८ ते ५५ या दरम्यान असावे तसेच ती स्वयं मदत गटची सदस्य असायला हवी .
४.PMMVY मधून किती रक्कम मिळते ?
प्म्मव्य मधून रुपये ५००० मिळतात ते दोन टप्यात म्हणजे सुरवातीला रुपये ३००० तसेच दुसरया वेळी रुपये २००० मिळतात .