Post Office Recruitment|पोस्ट ऑफिस भरती 2025

Post Office Recruitment भारतीय डाक विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” या पदांसाठी २१४१३ नवीन रिक्त जागा जाहीर केलेल्या आहेत.

या पदांच्या जागासाठी ३ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात .इंडिया पोस्टने नुकतीच GDS पदासाठी जी घोषणा केली त्यामध्ये ब्रांच पोस्टमास्टर तसेच सहाय्यक ब्रांच पोस्टमास्टर यासाठी भरती होणार आहे. जे तरुण दहावी उत्तीर्ण झालेले असतील ते सर्व तरुण उमेदवार या पोस्त ऑफिस GDS साठी पात्र असतील सदरील अर्ज हा मुदतीपूर्वी अर्थात ३ मार्च २०२५ च्या पूर्वीच भरणे आवश्यक आहे ,पात्र झालेल्या उमेदवारांची निवड हि जवळपास २३ मंडळातील गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार आहे .नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबद्दलची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल .


इंडिया पोस्ट द्वारे जानेवारी २०२५ मध्ये GDS साठी अधिकृत अधिसुचना हि सर्व माध्यमामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे .सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर https://indiapostgdsonline.gov.in/ सुधा प्रकाशित केलेले आहे.ज्या इच्छुक उमेदवारांना या GDS २०२५ भरतीसाठी भाग घ्यायचा असेल किंवा माहिती जाणून घ्यायची असेल त्यांनी या संकेस्थळावर उपलब्ध असलेली PDF पहावी. यामध्ये सरकारची अधिसुचना ,अर्ज कसा करावा,तो कुठे करावा,उमेदवारांची निवड कशी होईल अश्या अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी ही PDF पहावी.


GDS भरती -थोडक्यात माहिती

GDS भरती आयोजक(विभागाचे नाव)इंडिया पोस्ट ऑफिस
एकूण पदे २१४१३
पदांचा प्रकार ग्रामीण डाक सेवक ,शाखा पोस्टमास्टर,सहाय्यक शाखा पोस्टमास्टर
अर्ज कसा करावा ऑनलाईन
अर्ज करण्याची तारीख १० फेब्रुवारी २०२५ ते ३ मार्च २०२५
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ३ मार्च २०२५
शिक्षण दहावी उत्तीर्ण
वयोमर्यादा १८ ते ४० वर्ष
एकूण मंडळ २३
GDS पदांसाठी वेतन ABPM/GDS -रुपये १०,००० ते रुपये २४, ४७०
BPM – रुपये १२००० ते रुपये २९३८०
अधिकृत संकेतस्थळ https://indiapostgdsonline.gov.in/

GDS पदांसाठी असलेल्या या भरतीसाठी सरकारने अधिसूचना काढली ,अर्ज कधी करावा ,अर्ज करण्याची शेवटची तारीख हे सर्व प्रसिद्ध करण्यात आलेले आहे

पोस्ट ऑफिस अधिसुचना १० फेब्रुवारी २०२५
ऑनलाईन अर्ज कधी पासून सुरु करण्यात येणार १० फेब्रुवारी २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५

इंडिया पोस्ट ने देशभरात २३ मंडळाच्या अंतर्गत तब्बल २१४१ ३ पदांच्या भरतीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ,प्रत्येक राज्यांमध्ये एकूण किती रिक्त पदे भरणार आहेत त्याची यादी खालीलप्रमाणे –

राज्यांचे नाव रिक्त पदे
महाराष्ट्र ३१५४
उत्तर प्रदेश ३००४
बिहार ७८३
उत्तराखंड ५६८
दिल्ली ३०
छत्तीसगड ६३८
हरियाणा ८२
झारखंड ८२२
हिमाचल प्रदेश ३३१
जम्मू व काश्मीर २५५
मध्य प्रदेश १३१४
केरळ १३८५
पंजाब ४००
ईशान्य भारत १२६०
ओडीसा ११०१
कर्नाटका ११३५
तेलंगाना ५१९
आसाम १८७०
गुजरात १२०३
पश्चिम बंगाल ९२३
आंध्र प्रदेश १२१५
तमिळनाडू २२९२
एकूण रिक्त पदांची संख्या २१४१३

  • या पोस्ट ऑफिस पदांच्या भरतीसाठी उमेदवाराने भारत सरकार मान्यताप्राप्त शाळेमधून गणित व इंग्लिश विषयात उत्तीर्ण होऊन दहावी पूर्ण केलेली असावी
  • दहावी उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्थानिक भाषेचा अभ्यास करूनच दहावी उत्तीर्ण केलेली असावी .
  • उमेदवाराला संगणकीय द्यान असणे आवश्यक आहे
  • उमेदवाराला सायकलिंग करता येणे आवश्यक
  • उपजिवीकेसाठी पुरेसे साधन असावे

पोस्ट ऑफिस भारती साठी उमेदवारांचे वय किमान १८ वर्ष असावे अन कमाल वय हे ४० वर्ष असावे

जात निहाय श्रेणी वयोमर्यादा सवलत
अनुसूचित जाती जमाती ५ वर्ष
अपंग असलेल्या व्यक्ती १० वर्ष
OBC अपंग व्यक्ती १३ वर्ष
OBC ३ वर्ष
अपंग अनुसूचित जाती / जमाती १५ वर्ष
EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक )काहीच सवलत नाही

महाराष्ट्र

श्रेणी /वर्ग रिक्त पदे
यु आर १३९४
ओबीसी ७५५
एस टी 300
अनुसूचित जाती २८२
आर्थिकदृष्ट्या दुर्बल ३३५
पी डब्लू डी -अ १६
पी डब्लू डी -ब २९
पी डब्लू डी -क ३०
पी डब्लू डी -डी ई १३

Post Office भरतीची निवड प्रक्रिया हि सिस्टम जनरेटेड मेरीट लिस्टच्या आधारे होणार आहे,उमेदवाराला दहावीला मिळालेल्या गुणांच्या आधारे लिस्ट तयार केली जाईल.सर्वच मंडळाची यादी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल .

  • उमेदवारांची निवड हि सिस्टम जनरेटेड यादी प्रमाणे जाहीर केली जाईल
  • उमेदवाराला दहावीला मिळालेल्या मार्कांच्या आधारे आणि ४ दशांश अचूकतेवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल ,मान्यता असलेल्या मंडळांच्या मान्यतेने काही निर्णायक विषयांवर उत्तीर्ण होणे आवश्यक
  • ज्या उमेदवारांना दहावी परीक्षा मध्ये मिळालेले गुण किंवा मिळालेले ग्रेड असे गुण मिळालेले आहेत ,त्यांना मिळालेल्या सर्वच ऐच्छीक विषयात मिळालेले गुण विचारात घेतले जाणार आहेत ,त्याचप्रमाणे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • ज्या अर्जदाराला काही विषयात ग्रेड आहेत त्यांना ग्रेड नुसार गुण दिले जाणार आहेत .

खालीलप्रमाणे ग्रेड नुसार गुण उमेदवारांस दिले जातील

श्रेणी श्रेणी पोइंट एकूण गुणाकार घटक
अ १ १० ९.५
अ २ ९.५
ब १ ९.५
ब २ ९.५
क १ ९.५
क २ ९.५
९.५

ज्या उमेदवारांची निवड झाली असेल त्यांनी त्यांची नावे पीडीएफ मध्ये एकदा खात्रीने पहावीत ,ज्या उमेदवारांना मंडळानुसार निवड झालेली असेल त्यांनी कागदपत्रे पडताळणी साठी उपस्थित राहावे लागेल .खालील कागदपत्रे पडताळणी साठी आवश्यक आहेत –

  • उमेदवाराचे दहावीचे प्रमाणपत्र आवश्यक
  • जात प्रमाणपत्र (प्रवर्ग नुसार )
  • संगणकीय द्यान घेतलेले प्रमाणपत्र
  • उमेदवार अपंग असेल तर अपंगत्व असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे

भारतीय डाक विभागाकडून Post Office Recruitment जाहीर करण्यात आलेल्या GDS भरती मध्ये शाखा पोस्टमास्तर ,सहाय्यक शाखा पोस्टमास्तर अश्या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल या सर्व नवीन नियुक्त झालेल्या उमेदवारांना शासकीय पद्धतीने वेतनश्रेणी मिळणार आहे .सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर यासाठीचे वेतन हे रुपये १०००० ते रुपये २४ ४७० असे राहील .आणि शाखा पोस्ट मास्तरचे वेतन हे रुपये १२००० ते रुपये २९३८० एवढे असणार आहे.

Post Office भरती साठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांकडून शुल्क आकारले जाणार आहे.उमेदवाराने हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे .सामान्य वर्गातील उमेदवारांना रुपये १०० रुपये एवढे शुल्क असणार आहे तर इतर वर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही /त्यना यातून सुत देण्यात आलेली आहे.

पोस्ट ऑफिस भरती शुल्क खालीलप्रमाणे असेल

श्रेणी /वर्ग शुल्क /रक्कम
UR / जनरल १०० रुपये
SC /ST अनुसूचित जाती /जमाती शुल्क नाही

पोस्ट ऑफिस भरती 2025 साठी उमेदवारांनी अर्ज हा पुढीलप्रमाणे करावा जेणेकरून अर्जात कुठीली अडचणी येणार नाही आणि अर्ज अवैध होणार नाही.

१.उमेदवाराने नोंदणी करणे –

  • -सुरवातीला उमेदवाराने इंडिया डाक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://indiapostgdsonline.gov.in भेट द्यावी.
  • अर्जदाराने GDS पोर्टल वर नोंदणी करणे आवश्यक आहे .
  • नोंदणी करतेवेळी अर्जदाराने अचूक इमेल आयडी ,आणि मोबाईल क्रमांक देणे गरजेचे आहे जेणेकरून या नोंदणी वेळी पासवर्ड तयार करता येईल.
  • या पासवर्डची गरज पुढील प्रक्रियेसाठी लागणर आहे

२.उमेदवाराने अर्ज शुल्क भरणे

  • ज्या उमेदवारांना प्रवर्ग नुसार शुल्क भरावयाचे अनिवार्य आहे त्यांनी रुपये १०० शुल्क भरावे .
  • अर्जदार महिला किंवा अपंग किंवा इतर अनुसूचित जाती /जमाती श्रेणी मध्ये येत असतील तर त्यना यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
  • ज्या श्रेणीमधील उमेदवाराला अजिबात कुठलेच शुल्क नाही ते सरळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

३.ऑनलाईन अर्ज करणे

  • उमेदवाराने नोंदणी पुर्ण केल्यावर शुल्क भरावे नंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी .
  • नोंदणी क्रमांक तसेच चालू मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर विभागानुसार पसंती क्रम निवडावा
  • अर्जदाराने स्वतःच्या हस्ताक्षरातील स्वाक्षरी तसेच छायाचित्र स्कॅन करून अपलोड करावे
  • उमेदवाराने अर्ज सदर करताना विभागप्रमुख निवडावा जेणेकरून लवकरात लवकर कागदपत्रांची पडताळणी करणे सोप्पे जाईल.

योजनांचे नाव संकेतस्थळ
तुकडा बंदी कायदा 2025 https://shorturl.at/9btGw
कृषी ड्रोन अनुदान योजना https://shorturl.at/v5BN7
शेतकरी ओळखपत्र 2025 https://shorturl.at/iXYFS
पीएम कुसुम सोलर योजना https://shorturl.at/w1you
महाडीबीटी योजना 2025 https://shorturl.at/tio4g
मागेल त्याला सौर पंप 2025 https://shorturl.at/uiZYe
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना 2025 https://shorturl.at/edLoj
आमचे अधिकृत संकेतस्थळ https://smartsahyadri.com/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संपर्क ९८९००९८९६२

सतत विचारले जाणारे काही प्रश्न

१.पोस्ट ऑफिस भरती २०२५ एकूण किती पदांसाठी आहे ?

– पोस्ट ऑफिस भरती हि २१४१३ पदांसाठी आहे

२.इंडिया पोस्टने भरतीसाठी अधिसूचना कोणत्या संकेस्थळावर दिलेली आहे ?

-भरतीसाठी अधिसूचना हि http://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर दिलेली आहे.

३.भारतीय डाक विभागाने डाक सेवक या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे ?

-डाक सेवक अर्ज भरण्याची अंतिम तारीख हि ३ मार्च 2025 आहे

४.GDS पदांसाठी उमेदवारांची पात्रता काय आहे ?

-उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा , सायकलिंग येत असावी , संगणकीय द्यान असावे.

५. पोस्ट ऑफिस भरती साठी उमेदवारांचे वय किती आसवे ?

-पोस्टाच्या भरतीसाठी उमेदवारांचे हे १८ ते ४० असावे ,अनुसूचित जाती /जमाती साठी यात राखीव सुत देण्यात आलेली आहे.

६.पोस्ट ऑफिस भरतीमध्ये नोकरीचे ठिकाण कुठे असेल .

-संपूर्ण भारत नोकरीसाठी उपलब्ध असेल.