Farmer ID Card शेतकरी ओळखपत्र 2025 देशातील सर्व शेतकऱ्यांना आता शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यकचं .

Farmer ID ओळखपत्र नोंदणी सुद्धा सुरु करण्यात आलेली आहे .भविष्यात हे ओळखपत्र असेल तरच पीएम किसान , पीकविमा व इतर योजनांचा लाभ मिळणार आहे .ओळखपत्र नसेल तर कुठल्याही योजनाचा लाभ आपणास मिळणार नाही .देशातील शेतकऱ्यांना आता आधार कार्ड प्रमाणे स्वतंत्र नोदणी असलेले हे ओळखपत्र मिळणार आहे Agristack या भारत सरकारच्या अधिकृत डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून देशातील सुमारे ११ कोटी शेतकऱ्यांना विविध टप्प्यात हे ओळखपत्र वितरीत करणार आहे .पूर्वी शेतकरी वर्गाला अनेक योजनांचा लाभ तसेच पीकविमा घेण्यासाठी अनेक अडचणी येत असत. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत Agristack हा डिजिटल उपक्रम राबविला जाणार आहे .या एग्रीस्टेकसाठी देशातील १९ राज्यांनी केंद्रीय कृषी विभागासोबत करार केलेले आहेत. या अंतर्गत शेतकऱ्याला युनिक आयडी कार्ड देण्यात येणार आहे .शेतकऱ्याने नोंदणी केल्यानंतर त्यास आधार कार्ड प्रमाणे कार्ड प्रमाणित केले जाईल .केंद्र सरकारने यासाठी सुमारे २८१७ कोटी रुपयांना मंजुरी दिलेली आहे .
Farmer ID Card 2025 फायदे
शेतकरी ओळखपत्र मुळे अनेक सोई सुविधा ,योजनाचा लाभ सहजरीत्या मिळणार आहे
शासकीय योजनांचा लाभ -देशातील राज्यतील शेतकरी आता ओळखपत्राचा वापर करून योजनांचा लाभ घेवू शकतात .
शेतीचा शाश्वत विकास -शेतकरी शेती यंत्राचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करून स्वतचा , शेतीचा विकास साधू शकतात
डिजिटल ओळख -हे शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांना डिजीटल ओळख ओळख प्रदान करत असते ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना अर्जप्रक्रिया करणे ,अर्ज मंजुरी यागोष्टी जलद गतीने तसेच सुलभ होतील

शेतकरी ओळखपत्र कागदपत्रे
- आधार कार्ड (देशातील ,राज्यातील शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आधार कार्ड गरजेचे )
- आधार कार्ड सोबत जोडलेला मोबाईल क्रमांक (हा क्रमांक चालू स्थितीत असणे आवश्यक आहे )
- पेन कार्ड ( बँकेच्या संबधित गोष्टींसाठी पेन कार्ड आवश्यक )
- बँक खाते संपुर्ण तपशील ( खाते क्रमांक तसेच IFSC क्रमांक आवश्यक )
- उत्पनांचा दाखला (शेतकऱ्याच्या उपन्नाचा दाखला आवश्यक )
- जात प्रमाणपत्र आवश्यक (ठराविक शेतकऱ्यांकडे जात प्रमाणपत्र असेल तर हे त्यांच्यासाठी )
- शेतकऱ्याच्या पत्त्याचा पुरावा आवश्यक
- खसरा खतौनीची प्रत
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- ओळखपत्र साठी शेतकऱ्याला स्वतः उपस्थित राहणे गरजेचे आहे
उद्देश
भारत सरकारच्या या डिजिटल अभियान अंतर्गत तयार झालेल्या या शेतकरी ओळखपत्र अधिक योजनाचा लाभ मिळवून देणारी ,आर्थिक समृद्धी शेतकऱ्यांमध्ये आणेल हा यामागील खरा उद्देश .कृषी क्षेत्रातील केंद्राच्या विविध योजना अन शेतकऱ्यांना सुविधा प्रभावीपणे उपलब्ध होणार आहेत .शेतातील कामांच्या साठी कृषी कर्ज प्रक्रिया सोप्पी होणार आहे .या ओळखपत्रामुळे आता शेतकऱ्यांना विना कागदपत्रांशिवाय योजनेचा लाभ मिळेल ,तसेच बँकेमध्ये न जाता पिकावरील कर्ज उपलब्ध होऊ शकेल .शिवाय हे पीककर्ज एका तासाच्या आत मिळेल.
अर्ज करणारा कोण असावा
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा
- अर्जदाराचे वय किमान १८ असावे
- त्याचा शेती व्यवसाय असावा , अन त्याने तो व्यवसाय केला पाहिजे
- ज्या शेतकऱ्याला शेती करताना शेती संबधी काही योजना ,लाभ हव्या असतील तर त्याने ओळखपत्र काढणे आवश्यक आहे.
Farmer ID Card 2025
नोंदणी खालीलप्रमाणे करावी
१.अधिकृत पोर्टलला भेट द्या
सर्वात प्रथम शेतकरी बांधवांनी अधिकृत संकेतस्थळावर जाने , तिथे ‘नवीन खाते तयार करा ‘हा पर्याय निवडावा .
२.आधार कार्ड तसेच ओटीपी पडताळणी
आपल्याकडील आधार कार्डची माहिती भरून ,ओटीपी सोबत पडताळणी करणे .
३.आपला मोबाईल क्रमांक तसेच इमेल अड्रेस नोंदणी
पुढे आपला मोबाईल क्रमांक तसेच इमेल अड्रेस टाकून नवीन पासवर्ड बनवावा.
४. लॉगीन करणे
संपूर्ण नोंदणी केल्यानंतर लॉगीन करा , नंतर समोर असलेला ‘शेतकरी म्हणून नोंदणी करा ‘ या पर्यायावर क्लिक करावे.
५.आवश्यक माहिती भरणे तसेच आपल्याकडील कागदपत्रे जोडणे
आपल्याकडील संपूर्ण माहिती अचूकपणे भरणे तसेच आपल्याकडील कागदपत्रे स्कॅन्न करून ती अपलोड करावीत.
६.ई -साईन प्रक्रिया पूर्ण करणे
सर्व माहित अचूक भरल्यानंतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून ती जोडल्यानंतर आपली ई -साईन करावी व सर्वात शेवटी अर्ज सबमिट करावा
संपूर्ण अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला एक पावती मिळेल,ती पावती आपल्याला जपून ठेवायची आहे जेणेकरून नंतर ती वेळोवेळी उपयोगी येईल
शेतकऱ्यांसाठी काही सुचना
या ओळखपत्रासाठी साठी अर्ज करताना जे कागदपत्रे जोडायची आहेत ती व्यवस्थित स्कॅन करणे ,आणि योग्य आकारात ती असावीत
अर्ज सादर करताना शेवटी सर्व माहिती अचूकपणे भरली आहे कि नाही हे पडताळून पाहणे
ई-साईन तसेच ओटीपी द्वारे अर्ज पडताळणी पूर्ण करावी शेवटी अर्ज सबमिट केल्यानंतर पावती डाऊनलोड करणे .

शेतकरी ओळखपत्र संबधित काही प्रश्न
शेतकरी ओळखपत्र म्हणजे नक्की काय ?
शेतकरी ओळखपत्र म्हणजेच Farmer ID असेही म्हंटल जात ,हि शेतकऱ्यांची एकप्रकारची डिजिटल ओळख असणार आहे .जी ओळख शेतकऱ्याच्या शेतीसोबत त्याचे आधार कार्ड सलंग्न होणार आहे ,साकारणे राबवलेल्या डिजिटल इंडिया चा हा एक भाग आहे , डिजिटल कृषी अभियानाच हा एक प्रमुख भाग आता असणर आहे .
शेतकरी नोंदणी म्हणजे नक्की काय?
शेतकरी नोंदणी मध्ये शेतकऱ्याच्या जमिनीची नोंदणी केली जाणार आहे.सरकारच्या कृषी योजनांमध्ये काही नवीन बदल करण्याचा हा एक प्रयत्न आहे .शेतकऱ्याच्या शेतीचा संपूर्ण तपशील /नोंद एकत्रित असणे म्हणजेच शेतकरी नोंदणी .
शेतकरी ओळखपत्राची गरजच काय ?
या शेतकरी ओळखपत्रावर शेतकर्याची संपूर्ण माहिती मिळणार/संकलित होणार आहे .यामुळे कृषी विषयक फायदे मिळण्यास खूप सोप्पे होणार आहे .वारंवार करावी लागणारी केवायसीची आता गरज भासणार नाही .याच्यामुळे कृषी विभागात होणारा गैरप्रकार रोखण्यास मदत होईल.
सर्वच शेतकऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य आहे का ?
हो ,सर्वच शेतकऱ्यांना आता ओळखपत्र काढणे अनिवार्य केलेलं आहे ,ओळखपत्र असेल तरच त्यांना आता सरकरी योजनांचा लाभ घेता येणार आहे .
ओळखपत्र कसे बनवावे ?
ओळखपत्र साठी प्रथमतः सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर https://hrfr.agristack.gov.in भेट द्यावी.यावर आपल्याला नवीन ईद बंविण्य्साठी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे .राज्यात अधिक शेतकऱ्यांचे ओळखपत्र बनावेत यासाठी शासन विविध प्रकारे जागरुकता करत आहे . शेतकारी ओळखपत्र साठी जवळच्या पंचायत कार्यलयाशी सुधा संपर्क करू शकतात .
या कार्डमुळे नक्की काय होईल ?
या कार्ड मुळे शेतकऱ्याचे संपूर्ण निरीक्षण सरकारला करणे सहज जमणार आहे , शेतकऱ्याने शेतात घेतलेले पिक ,त्याची जमीन ,त्याचे पशुधन या सर्वांची माहिती या कार्ड द्वारे सरकारला सहज उपलभ होणार आहे
देशातील कोणकोणत्या राज्यात हे ओळखपत्र लागू होईल ?
देशातील तब्बल १९ राज्यांनी या केंद्राच्या उपक्रमात सहभागी झाले आहेत ,सुरवातीला महाराष्ट्र ,मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश ,गुजरात या राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट राबविले जाणर आहे तर उर्वरित राज्य ज्यामध्ये आसाम , छत्तीसगड ,ओडीसा मध्ये फिल्ड चाचण्या घेतल्या जात आहेत.बाकी राज्यात याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
ओळखपत्राचा कश्याप्रकारे फायदा होईल ?
शेतकऱ्यांना याच्या नोंदणी नंतर अनेक फायदे होणार आहे ,सतत केवायसी करणे गरजेचे नाही .विना कागदपत्रांच्या शिवाय ,डिजिटल केवायसी असेल तरीही रुपये २ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते .सर्व योजनांमधून पारदर्शक पद्धतीने अनुदान मिळणार आहे .शेतकरी वर्गाला कर्ज पीकविमा मिळण्याला कुठलीच अडचण येणार नाही .
कोणत्या पोर्टलवर तुम्ही अर्ज करू शकता ?
राज्य सरकार प्रमाणे इतरही राज्यांचे स्वतंत्र पोर्टल आहेत ,महाराष्ट्र सरकारने Agristack या संकेतस्थळावर जावून नोंदणी करू शकता.

प्रक्रिया
या ओळखपत्र प्रक्रियेला काही दिवस / काही तासांचा कालावधी लागू शकतो ,नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर शेतकऱ्याला ओळखपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरु होते .यासाठी शेतकऱ्यांकडील कागदपत्रे तपासणी ,अचूक माहिती सह अर्ज सदर करणे आवश्यक आहे.
आताची प्रक्रिया-
- सीएससी द्वारे नोंदणी करणे आवश्यक
- शेतकरी वर्गाला सीएससी केंद्रावर जावून तिथे फार्मर आयडी नोंदणी करावी लागेल
- शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याची ऑनलाईन स्थिती जाणून घेण्यासाठी सुधा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ,याच्यामुळे वेळोवेळी शेतकऱ्यांना आपल्या नोंदणीचा पाठपुरावा कुठे पर्यंत आला आहे हे जाणून घेता येईल.
नोंदणी प्रक्रिया –
- शेतकऱ्याला जवळच्या सीएससी केंद्रावर जावून आवश्यक त्या माहितीसह , कागदपत्रांसह नोंदणी प्रक्रिया /अर्ज पूर्ण करावी लागेल .
- नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याला ओळखपत्र मिळेल जेणेकरून अनेक फायदे शेतकऱ्याला मिळवता येतील.
- शेतकऱ्याला आपल्या अर्जाची स्थिती केव्हाही कधीही पाहता येवू शकते ,म्हणजेच नवीन काही सूचना ,अपडेट मिळू शकतील.
निष्कर्ष
सरकारच्या या नवीन ओळखपत्रामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे , सरकरी योजनांचा लाभ घेणे अगदी सोप्पे होणार आहे ,कुठलीही अडचण ,मानसिक त्रास आता होणार नाही .हि संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या आपल्याला करता येणार आहे .यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर नोंदणी करणे आवश्यक आहे .म्हणजेच जलद गतीने सरकारी योजनाचा लाभ शेतकरी घेवू शकेल ,अन शेतकऱ्यांचे जीवन सुखकर ,सुलभ होईल.
सरकारच्या इतर योजनांच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळे पहावे
योजनांचे नाव | संकेतस्थळ |
कुसुम सोलर पंप योजना | https://shorturl.at/w1you |
महाडीबीटी MahaDBT | https://shorturl.at/tio4g |
मागेल त्याला सौर पंप योजना | https://shorturl.at/uiZYe |
तुकडा बंदी कायदा | https://shorturl.at/9btGw |
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | https://shorturl.at/1kGlw |
महिलांसाठी ६ सरकरी योजना | https://shorturl.at/sYbKR |
आमचे अधिकृत संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |
ओळखपत्र काढण्यासाठी संपर्क | ९८९००९८९६२ |
वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न
१.शेतकरी ओळखपत्राचा खरा उपयोग काय ?
-शेतकऱ्याला विविध योजनांचा लाभ त्वरित मिळावा कुठलीही अडचण अनुदान अथवा लाभ घेताना न यावी यासाठी या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे.
२. ओळखपत्र यासाठीचे अधिकृत संकेतस्थळ कोणते ?
–https://mhfr.agristack.gov.in/
३.ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना कुठल्या योजनांचा लाभ मिळणार आहे ?
-शेतकऱ्यांना यामुळे सहजरीत्या पीकविमा ,पीएम किसान योजना यांसारख्या अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे.
४.केंद्र सरकारच्या कुठल्या अभियानाचा हा भाग आहे
-केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाचा हा महत्वाचा भाग आहे.