PM Surya Ghar Yojna |पीएम सूर्य घर योजना 2025

PM Surya Ghar Yojna पीएम सूर्य घर योजना 2025 आपल्या भारत देशात साधारणपणे वर्षामधील ३३० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतोच.त्या सूर्यप्रकाशासाठी खर्च नाही.याच सूर्यप्रकाशाचा लाभ अधिक पद्धतीने घ्यायचा असल्यास आपण आपल्या घराच्या छतावर स्वतः साठी मोफत सौर वीजनिर्मिती करू शकता .या वीजनिर्मिती साठी जे सौर पेनल असणर आहेत त्याचे आयुष्यमान २५ ते ३० वर्षाचे असते .या योजनेचा खरा उद्देश सर्वसाधारण कुटुंबाना मोफत वीज प्राप्त व्हावी ,या योजनेची सुरवात नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी केलेली होती. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबाना सौर पेनल आपल्या छतावर बसवता येणार आहेत शिवाय यासाठी सरकारकडून अनुदान सुद्धा मिळणार आहे .हे अनुदान /सबसिडी हि खर्चाच्या ४०% दिली जाणार आहे .या योजनेमुळे भारत देशातील १ कोटी कुटुंबाना सरळ याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे .या योजनेसाठी किमान ७५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहे .

महिन्याचे सरासरी बिल उपयुक्त पेनल क्षमता सबसिडी /अनुदान
० ते १५० १ ते २ किलोवेट ३० हजार ते ६० हजार
१५० ते ३०० २ ते ३ किलोवेट ६० हजार ते ७८००००
३०० ३ किलोवेट पेक्षा अधिक ७८००००

PM Surya Ghar Yojna 2025 भारताचे पंतप्रधान यांच्या सरकारने हि सूर्य घर योजना सुरु केलेली आहे.याच योजनेच्या माध्यामतून देशात सौर उर्जेचा वापर जास्तीत सौर उर्जेचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न सुरु झाले ,या योजनेच्या माध्यमातून ३०० युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात येणार आहे .या योजनेच्या माध्यमातून जवळपास १ कोटी कुटुंबाना सौर उर्जेचा प्रकाश देण्यात येणार आहे.

पीएम सूर्य घर योजना 2025

योजनेचा प्रकार पीएम सूर्य घर योजना
योजना कधी सुरु झाली १५ फेब्रुवारी २०२४
योजना कोणाच्या सरकारने चालू केली पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
लाभार्थी कोण सर्वसामान्य /मध्यमवर्गीय कुटुंब
अनुदान /सबसिडी ३०००० ते ७८०००
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
योजनेचा उद्देश देशातील १ कोटी लोकाना मोफत वीज देणे ,घरावरती सौर पेनल बसवणे
अधिकृत संकेतस्थळ https://www.pmsuryaghar.gov.in/

आपल्या भारत देशात सौर उर्जेचा वापर जास्तीत व्हावा यासाठी अनेक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहेत,या योजनेच्या माध्यमातून मोफत वीज तर मिळेलच शिवाय अनेक फायदेही मिळणार आहेत –

  • देशातील सुमारे १ कोटी कुटुंबाना मोफत वीज मिळणार आहे
  • या योजनेमुळे सरकारच्या वीज खर्चात ५० रुपयांची बचत होणार आहे
  • या सूर्य घर योजनेमुळे प्रदूषण सुद्धा कमी होणार आहे .कारण कोल्श्ह्यापासून होणाऱ्या विजेत भरपूर प्रमाणात कमी होईल .
  • या योजनेत सौर उर्जेचा वापर अधिक होणार असल्यामुळे नैसर्गिक साधनांची बचत मोठ्या प्रमाणावर होणार आहे
  • या योजनेतून कुटुंबाना कायम स्वरूपी वीज मिळणार आहेच शिवाय या योजनेमधून ४०% सबसिडी सुधा मिळणार आहे .
  • अर्थसंकल्पात या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला हिरवा कंदील दाखवला ,जवळपास १ कोटी घरांवर सौर पेनल बसवून मोफत वीज देण्यात येणार आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर ७५०२१ कोटी रुपये खार्ह येणार आहे .
  • प्रत्येक कुटुंबाला १ KW साठी अनुक्रमे ३०००० रुपये तर २ KW साठी ६०००० रुपये अनुदान सरकार देणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे . जे कुटुंब घरावर सौर पेनल बसवतील त्यांना अगदी कमी दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे .यासाठी जवळजवळ ७८००० रुये अनुदान तसेच ३०० युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात येणार आहे.
  • सरकारकडून वितरीत होणाऱ्या विजेच्या मागणीत घट होईल.
  • सरकारकडून या योजनेसाठी मोफत वीज मिळणार आहे.
  • या योजनेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल.
  • नवीकरणीय उर्जेचा वापर वाढणार आहे .
  • या योजनेतून मोफत वीज मिळणार आहे .
  • वीज मोफत मिळणार असल्याने वीज बिल भरण्यासाठी कुठेही चक्कर मारण्याची गरज भासणार नाही.
  • २४ तास वीज प्रवाह मिळणार आहे .
  • पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर संरक्षण होणार आहे अन सौर शक्ती देशात वाढण्यास सुद्धा मदत होणार आहे.

PM Surya Ghar Yojna

पीएम सूर्य घर योजना

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा
  • कुटुंबाकडे वैध पद्धतीने घेतलेले विजेचे कनेक्शन आवश्यक आहे
  • कुटुंबाकडे पक्के छत असावे जेणेकरून सौर पेनल बसविता येणे सहज शक्य होईल
  • यापूर्वी कुटुंबाने सौर उर्जेसाठी कुठल्याही प्रकारचे अनुदान घेतलेले नसावे
  • कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा
  • आधार कार्ड हे बँकेशी लीन (सलंग्न) असावे
  • वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा कमी असावे
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • छत असलेल्या घराचे कागदपत्रे
  • वीज बिल
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • PM Surya Ghar Yojna Registration करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाणे ,तिथे Apply Solar म्हणून असेल त्या पर्यायावर क्लिक करावे .
  • क्लिक केल्यावर समोर एक नवीन पेज उघडेल
  • त्यानंतर समोर Registration Here या पर्यायावर क्लिक करावे
  • समोर आपल्याला तालुका ,जिल्हा यासंबधी माहिती विचारेल ती माहिती अचूकपणे भरावी
  • त्यानंतर सौर उर्जा कंपनी निवडावी तसेच आपल्याला मिळालेला ग्राहक खाते क्रमांक टाकावा
  • यानंतर NEXT बटन यावर क्लिक करावे
  • NEXT बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा ,तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो तिथे टाकावा.
  • यानंतर समोर एक कॅप्चा येईल तो कॅप्चा टाकावा मग सबमिट बटनवर क्लिक करावे.
  • याप्रकारे तुम्ही PM Surya Ghar Yojna यासाठी नवीन नोंदणी पूर्ण केलेली आहे

रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे

  • सुरवातीला रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रथमतः PM Surya Ghar Yojna अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर Login Here हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे
  • त्यानंतर रजिस्टर केलेला मोबाईल क्रमांक तसेच संकेतांक टाकावा
  • यानंतर Next बटन वर क्लिक करावे ,समोर नवीन पेज उघडेल
  • तिथे Apply For Rooftop Solar Installation यावर एक फॉर्म दिसेल तो संपूर्ण फॉर्म अचूकपणे भरावा
  • तुमची स्वतः बद्दल माहिती अचूकपणे त्या फॉर्म भरावी
  • त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे त्यावर अपलोड करावयाची आहेत
  • शेवटी संपूर्ण फॉर्म अचूक भरला गेला कि नाही हे एकदा पाहूनच फॉर्म सबमिट करायचा आहे
  • संपूर्ण फॉर्म तपासणी साठी गेल्यावर मंजुरी मिळेल नंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल

पीएम सूर्यघर योजना मध्ये अर्ज केल्यानंतर आपण खालील प्रकारे स्थिती पाहू शकता

  • आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी सुरवातीला आपल्याला अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल
  • त्यानंतर आपल्याला LOGIN HERE या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल
  • मोबाईल क्रमांक टाकल्यावर तुम्हाला अर्जाची स्थिती पाहण्यासाठी ट्रेक डीटेल्स वर क्लिक करावे लागेल
  • क्लिक केल्यावर समोर तुम्हाला अर्जाची स्थिती पहायला मिळेल

या सूर्यघर योजनेसाठी किती खर्च येईल यासाठी एक केल्क्युलेटर तयार करण्यात आले आहे .यावर सुरवातीपासुन ते शेवटपर्यंत या योजनेसाठी किती खर्च येईल हि संपूर्ण माहिती मिळते.

यावर Know More About Rooftop Solar या पर्यायाच्या बाजूला केल्क्युलेटर पर्याय आहे त्यावर क्लिक करावे

जी माहिती विचारली ती संपूर्ण भरावी नंतर केल्क्युलेटर बटनवर क्लिक करावे ,ज्याप्रकारे तुम्ही माहिती भराल त्याप्रमाणे तुम्हाला माहिती समोर दिसेल

योजनेचे नाव संकेतस्थळ
तुकडा बंदी कायदा 2025 https://shorturl.at/9btGw
कुसुम सोलर पंप योजना 2025 https://shorturl.at/w1you
महाडीबीटी योजना 2025 https://shorturl.at/tio4g
शेतकरी फार्म हाऊस योजना 2025 https://shorturl.at/gu9oD
मागेल त्याला सौर पंप योजना 2025 https://shorturl.at/uiZYe
महिलांसाठी ६ सरकारी योजना 2025 https://shorturl.at/sYbKR
आमचे अधिकृत संकेतस्थळ https://smartsahyadri.com/

१.पीएम सूर्यघर योजना म्हणजे काय ?

-सरकरी योजना असल्यामुळे देशातील सर्वसामान्य कुटुंबाला मोफत वीज मिळावी या योजनेमागील खरा उद्देश आहे

२.पीएम सूर्यघर योजनामुळे सरासरी किती लाखांची बचत होते ?

-या योजनेमुळे सरकारची जवळपास ५० लाखांची बचत होणार आहे

३.सूर्यघर योजनेचा लाभ कश्याप्रकारे आहे ?

-घरांसाठी मोफत वीज देणे ,विजेची बचत मोठ्याप्रमाणावर होणे ,सौर पेनल साठी अनुदान देणे ,कार्बन उत्सर्जन कमी करणे ,नवकरणीय उर्जा वाढवणे .

४.प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरवात कधीपासून झाली आहे ?

-प्रधानमंत्री सूर्यघर योजना १५ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार सुरु करण्यात आली आहे

५.देशातील एकूण किती कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे?

-देशातील सुमारे १ कोटी कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार आहे

६. केंद्र सरकर कडून या योजनेसाठी एकूण कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे ?

-प्रधानमंत्री सूर्यघर योजनासाठी सुमारे ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद सरकार कडून करण्यात आहे

७.या योजनेच्या माध्यामतून किती सबसिडी /अनुदान मिळणार आहे ?

-प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमधून ३०००० ते ७८००० पर्यंत सबसिडी /अनुदान मिळणार आहे.

८.प्रधानमंत्री सूर्यघर योजना अन प्रधानमंत्री सर्वोदय योजना यामध्ये नक्की काय फरक आहे ?

-प्रधानमंत्री सर्वोदय योजनेचे नवे स्वरूप म्हणजेच प्रधानमंत्री सूर्यघर योजना आहे

९.या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे ?

-जो व्यक्ती भारतीय नागरिक आहे तसेच ज्या कुटुंबाकडे सौर पेनल लावण्यासाठी छत असलेले घर आहे त्या सर्वाना या योजनेचा लाभ मिळेल

१०.या योजनेचा अर्ज कश्याप्रकारे करावा लागतो

-योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल .