Gay Gotha Yojna 2025|गाय गोठा अनुदान योजना 2025

Gay Gotha Yojna 2025 आपला भारत एक कृषिप्रधान देश आहे , देशातील शेतकरी हा शेतीबरोबर कौशल्य पणाला लावून अनेक व्यवसायात उतरलेला आपल्याला दिसतोय.

शेतीबरोबर पशुपालन करताना अनेक शेतकरी आज आपल्याला पाहायला मिळत आहेत .पशुपालन करणे अतिशय सोप्पे जात असल्याने शेतकऱ्यांचा ओढाही तिकडेच जास्त आहे ,पण खंतही वाटते कि अआज कित्येक शेतकऱ्यांकडे पशुपालन करताना त्यांच्याकडे उन वर ,पाऊस याच्यापासून संरक्षण करण्यसाठी व्यवस्थित शेड/निवाराही नसतो .म्हणूनच सरकारने गाय गोठा अनुदान योजना 2025 अर्ज प्रक्रिया नुकतीच चालू करण्यात आलेली आहे .राज्यात २०२३ पासून हि गाय गोठा योजना राबवली जात आहे ,यासाठी सरकारने तब्बल ७८००० पर्यंतची मदत सरकार शेतकऱ्यांना करणार आहे.योजनेमधून शेती बरोबर हा जोडधंदा करताना शेतकऱ्याला दुध धंदा मधून मोठी उलाढाल करणे सोप्पे होणार आहे.याच्यामुळे पशुपालन व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर वाव मिळण्यास मदत होणार आहे .गाय गोठा अनुदान योजना 2025 योजनेंतर्गत २ ते ६ जनावरे असतील तर ७७,८८८ रुपये खात्यावर जमा होतील .१२ जनावरे असतील तर १,५५,००० अनुदान खात्यावर जमा होतील .१८ जनावरे असतील तर २,३१,००० अनुदान खात्यावर जमा होईल .ज्या शेतकऱ्यांकडे शेतात २० ते ५० फळझाडे आहेत आणि त्यात त्यांनी जर मुक्त गोठा करण्याचा मानस केला असेल तर छत नसलेले गोठे या योजनेतून करता येतील .ज्या शेतकऱ्यांकडे ५० पेक्षा अधिक फळझाडे आहेत त्यांना या योजनेतून छतासहित गाय गोठा मिळेल.

Gay Gotha Yojna 2025 थोडक्यात माहिती

योजेनेचे नाव Gay Gotha Yojna 2025 (गाय गोठा अनुदान योजना 2025 )
लाभार्थी कोण असेल महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव
कोणाच्या द्वारे हि योजना अंमलात आणली आहे महाराष्ट्र राज्य
योजनेचा लाभ गोठा बांधण्यास पूर्ण १००% अनुदान मिळेल
अर्ज करण्याचा प्रकार ऑफलाईन ,ऑनलाईन
गायगोठा योजनेचा GR गाय गोठा अनुदान योजना 2025 GR

गाय गोठा अनुदान योजना 2025 उद्देश

शेतकऱ्याकडे योग्य पद्धतीचे गोठे असल्यास जनावरांचे पालनपोषण चांगले होण्यास मदत होईल ,त्याच्यामुळे व्यवसायात वाढ होईल ,गाईंचे आरोग्यही उत्तम राहील .

  • जनावरांचे पालन पोषण योग्य पद्धतीने होण्यास मदत होईल .
  • शेतकऱ्याला याच्या माध्यमातून व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत .
  • दुध उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर चालना देणे .
  • या योजनेमुळे शेतकऱ्याला जनावरांचे उन वारा पाऊस यांपासून संरक्षण करता येईल .
  • पशुपालनामध्ये वाढ होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत मिळेल .

Gay Gotha Yojna कागदपत्रे

गाय गोठा अनुदान योजना साठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत –

  • आधार कार्ड
  • बँकेचे पासबुक
  • रेशन कार्ड
  • अर्जदार शेतकऱ्याचा सातबारा
  • ८ अ
  • क्षेत्राचे ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र
  • ज्या जागेत गोठा करायचा आहे त्या जागेचा फोटो
  • जागेची पाहणी केलेल्या अधिकाऱ्याचा पाहणी अहवाल
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट फोटो
  • स्वघोषित प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • गाय गोठा योजनासाठी अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा .
  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतच्या हक्काची जमीन असणे आवश्यक .
  • राज्यात ग्रामीण भागात ,दुर्गम भागात राहणाऱ्या शेतकरी याचा लाभ घेवू शकतात .
  • अर्जदार शेतकरी अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला आवश्यक
  • जमिनीचा सातबारा, ८ अ असणे आवश्यक
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील शेतकऱ्याला प्राधान्य दिले जाईल
  • अर्जदार शेतकरी कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेस पात्र राहत येईल
  • अर्जदार महिला असल्यास पतीच्या निधनाचे प्रमाणपत्र आवश्यक .
  • या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जदार शेतकऱ्याकडे २ जनावरे असणे आवश्यक
  • यापूर्वी जर केंद्र , राज्य सरकार कडून अर्जदार शेतकऱ्याने गाय गोठा साठी अनुदान घेतले असल्यास ,या योजनेस अपात्र असेल
  • द्रारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या अर्जदार शेतकऱ्याला विशेष प्राधान्य दिले जाईल.
  • गाय बैल म्हैस या जनावरांसाठी पक्का गोठा व्हावा यासाठी सरकार आर्थिक सहाय्य करत असते .
  • या योजनेचा अर्ज करण्यास अचानी येत नाहीत ,अतिशय सोप्प्या पद्धतीने हा अर्ज करता येतो .
  • या योजनेमधून मिळणारी रक्कम हि बँकेच्या खात्यावर १००% जमा होते असते .
  • या योजनेला शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुद्धा म्हंटले जाते
जनावरे अनुदान रक्कम
२ ते ६ जनावरे ७७१८८ रुपये
६ ते १२ जनावरे १,५५,००० रुपये
१२ ते १८ जनावरे २,३१,००० रुपये
  • अर्जदाराने गाय गोठा अनुदान योजना अर्ज करण्यासाठी जवळच्या (स्वतःच्या गावच्या ) ग्रामपंचायत मध्ये जाणे आवश्यक आहे .
  • ग्रामपंचायत मधून आपल्याला Gay Gotha Yojna अर्ज घ्यायचा आहे .
  • अर्जदाराने अर्ज व्यवस्थित भरून त्यासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज भरून झाल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये विशिष्ठ कर्मचाऱ्याकडे अर्ज जमा करावा.
  • शेतकरी बांधवांनी गाय गोठा योजना साठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज करावा
  • अर्जामध्ये संपूर्ण माहितीसह ,जमिनीची माहिती ,जनावरांची माहिती द्यावी सोबत सर्व कागदपत्रे जोडावीत
  • अर्ज केलेल्या शेतकऱ्याने जर सर्व अटीची पूर्तता केली असेल तर अर्ज त्वरित मंजूर होतात.
  • या योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे ,याच अनुदांच्या माध्यामतून शेतकरी पशुपालनाचा विस्तार करू शकतील
  • या योजनेतून जर गोठे बांधले गेले तर दुधाच्या उत्पादनात प्रचंड वाढ होईल अन याचा फायदा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर होईल ,आर्थिक सुबत्ता येईल.
  • गोठ्याच्या बांधकामानंतर त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
  • गोठ्यामुळे स्वच्छता राहील त्यामुळे जनावरांचे आरोग्य उत्तम राहील ,त्यामुळे उत्पादन क्षमता वाढेल.

गाय गोठा बांधणीसाठी महाराष्ट्र सरकारने काही गोष्टीची नियमावली बनवलेली आहे –

२ ते ६ जनावरांच्या गोठ्यासाठी गोठा हा २६.९५ चौ मी निवारा असावा ,लांबी ७.७० मी व रुंदी ३.५० मी असायला हवी
२ ते ६ जनावरांची गव्हाण सरकारी नियमानुसार गव्हाण हि ७.७ मी *२.२ मी *०.६५ मी
जनावरांच्या मुत्र संचयासाठी २५० लिटर ची टाकी बांधणे आवश्यक
जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी २०० लिटर टाकी बांधणे आवश्यक

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान वाटप करणे हि प्रमुख बाब आहे ,या योजनेमधील अनुदान हे शेतकऱ्याच्या गरजेनुसार ठरवली जाते.या योजनेच्या मध्यामाने शेतकऱ्याला प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून जनावरांची काळजी कशी घ्यावी ,गोठ कसा असावा ,स्वच्छता कशी असावी .

  • अनुसूचित जाती
  • अनुसुचित जमाती
  • महिलाप्रधान कुटुंब
  • द्रारिद्र्य रेषेखाली असणारे कुटुंब
  • भूसुधार योजनेचे लाभार्थी
  • अल्पभूधारक शेतकरी
  • भटक्या विमुक्त जमाती
  • गोठ्याचे काम सुरु करण्यापूर्वीचा फोटो
  • गोठ्याचे काम चालू असतानाचा फोटो
  • गोठ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याचा फोटो गोठ्याच्या बांधकामासोबत
  • वरील सर्व गोष्टीचे फोटो अंतिम प्रस्ताव / अहवालसोबत सादर करण्यासाठी ७ दिवसाचा कालावधी आहे .

अर्ज केल्यानंतर अनेक तक्रारी पुढे येतात ,कि आम्ही अर्ज केला पण वर्ष झाले तरीही अनुदान मिळाले नाही,वयक्तिक क्षेत्रावर २० ते ५० फळझाडे लावावीत , सार्वजनिक कामावर किमान १०० दिवस काम करणे आवश्यक ,तसे न केल्यास आपल्यला या योजनेचा लाभ मिळणार नाही .

  • एका कुटुंबात एकदाच या योजनेचा लाभ मिळेल
  • हि योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच लागू केलेली आहे ,त्यामुळे राज्यातील शेतकरीच लाभ घेवू शकतील.
  • अर्जदाराकडे २ ते ६ जनावरे असायला हवेत
  • प्रत्येक जनावरांचे टेगिंग करणे आवश्यक
  • अर्जदाराला पशुपालनाची माहिती तसेच अनुभव असणे आवश्यक
  • स्वतच्या जमिनीवर फळझाडे , वृक्षलागवड केलेली असावी

https://mahaegs.maharashtra.gov.in/

शेतकरी फार्महाऊस योजना 2025
तुकडा बंदी कायदा 2025
पीएम किसान योजना 2025
कुसुम सोलर पंप योजना 2025
मागेल त्याला सौर पंप योजना 2025
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना 2025
महाडीबीटी योजना 2025
आमचे अधिकृत संकेतस्थळ (अधिक माहितीसाठी )

१.गाय गोठा अनुदान योजना 2025 साठी कोण अर्ज करू शकतो ?

-राज्यातील कोणताही शेतकरी /पशुपालन करणारा या योजनेसाठी अर्ज करू शकतो

२.योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

-सातबारा, आधार कार्ड ,बँक खाते पासबुक ,गोठ्याचा आराखडा इ .कागदपत्रे योजनेस आवश्यक आहेत

३.गाय गोठा योजना साठी अर्ज कश्याप्रकारे करू शकतो ?

-या योजनेसाठी दोन्ही प्रकारे म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज करू शकतो

४.लाभार्थीला योजनेचा लाभ किती दिवसात मिळतो ?

-लाभार्ठीने अर्जासोबत सर्व कागदपत्राची पूर्तता सुरवातीला करणे गरजेचे ,नंतर अर्ज मंजूर झाल्यानतर काही आठवड्यात लाभ मिळेल.

५.गोठा म्हणजे नक्की काय ?

-पाळीव जनावरांन उन ,वारा ,पाऊस यापासून आश्रय देण्यासाठी केलेला निवारा म्हणजेच गोठा.

६. गाय गोठा अनुदान योजनामधून किती अनुदान मिळते?

-गाय गोठा अनुदान योजनेंतर्गत ७७१८८ रुपये अनुदान देण्यात येते.

७. गाय गोठा याजना अर्ज कुठे मिळेल ?

-गाय गोठ योजनेचा अर्ज आपल्या जवळील ग्रामपंचायत मध्ये मिळेल.

८.गाय गोठा औदान योजना कधी पासून अंमलात आली ?

-३ फेब्रुवारी २०२१ रोजी गाय गोठा योजन अलगु करण्यात आली.

९.गाय गोठा योजनेचा उद्देश काय आहे?

– राज्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांना चांगला पक्का गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे हा योजनेमागचा खरा उद्देश आहे .

१०.गाय गोठा योजना अर्ज कश्या पद्धतीने करावा .

-या योजनेचा अर्ज करताना ऑफलाईन पद्धतीने करावा