PM Kusum Solar Pump Yojna|पीएम कुसुम सोलर पंप योजना 2025

PM Kusum Solar Pump Yojna पीएम कुसुम सोलर पंप योजना 2025 या प्रेरणादायी योजनेच्या माध्यमातून सरकार केंद्र शेतकऱ्याच्या शेतावर सौरपंप बसवणार आहे.

त्यामुळे पीएम कुसुम सोलर पंपमधून तयार होणारी वीज शेतकऱ्याला मोफत मिळणार आहे .सरकारच्या या घटक ब मध्ये सौरपंप साठी शेतकऱ्याला एकूण खर्चाच्या फक्त १०% रक्कम भरावी लागणर आहे .कारण यातील ६०% खर्च सरकार अनुदान म्हणुन देईल तर ३०% रक्कम कर्जाच्या स्वरुपात दिले जाईल . मोठ्या प्रमाणावर होणारा शेतकऱ्याचा खर्च कमी कसा होईल ,शेतकऱ्याचे उत्पन्न कसे वाढेल हा या योजनेमागील उद्देश .सरकारच्या घटक अ मध्ये ज्या शेतकऱ्याची जमीन नापीक आहे त्या जमिनीवर सौर पंप प्लांट बसवला जातो , यामध्ये ५००० किलोमेगावाट ते २ मेगावाट पर्यंत सौर उर्जा पंप बसवले जातात व वीज निर्मिती केली जाते .घटक क मध्ये जर शेतकऱ्याच्या आधीपासून विद्यूत पंप आहेत त्याचे रूपांतरण सौरीकरण करता येवू शकतात .शेतात पंप चालवायचे असेल तर कित्येकदा वीज नसते .त्यावेळी पेट्रोल डीझेल वर चालणारे पंप चालवायचे असेल तेंव्हा शेतकऱ्याला खर्चही जास्त प्रमाणात येत असतो त्यामुळे kusum solar yojna मधून सोलर पंप बसवल्यास शेतकरी २४ तास शेतात पंप चालवू शकतो .

PM Kusum Solar Pump Yojna 2025 या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील सर्व शेतकरी सर्वसंपन्न ,समृद्ध व्हावेत यासाठी हि पीएम कुसुम सोलर पंप योजना अंमलात आणली आहे .भारतात अनेक ठिकाणी वीज नसते त्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत असते त्यामुळे जर शेतकरी वर्गणी या योजनेचा लाभ घेतला तर शेताला मुबलक पाणी मिळेल. शेताचे उत्पन्न वाढेल ,वेळेची बचत होईल या सर्व गोष्टीचा फायदा शेतकऱ्याला मिळणार आहे . डिझेल वर चालणाऱ्या पंपामुळे प्रदूषण सुधा वाढत होते ,तेही या योजनेने कमी होईल .या योजनेत सरकारकडून ६०% अनुदान दिले जाते तर ३०% कर्ज उपलब्ध करून दिले जाते .यामध्ये शेतकऱ्याला सुरवातीला फक्त १०% खर्च करावा लागणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारला देशात सौर उर्जेला प्राधान्य द्यायचे आहे जेणेकरून विजेच्या लाप्न्दावापासून शेतकरी मुक्त होईल व देशातील प्रत्येक भागात वीज पोहचावी हाच या योजनेचा प्रमुख उद्देश आहे .

  • या योजनेंतर्गत ७.५ HP चे सौर पंप बसवण्यासाठी आर्थिक मदत / सहाय्य केले जाते .
  • या योजनेंतर्गत सौर कृषी पंपासाठी केंद्रीय आर्थिक सहाय्य दिले जात असते .
  • या योजनेत राज्याचे सरकार, शेतकरी आणि बँक या तिघांचे योगदान राहते .
  • या योजनेसाठी वयक्तिक शेतकरी ,शेतकरी गट ,एफपीओ ,डब्लूयुए यांसारख्या संस्था यात पात्र असतात .

शेतकऱ्याला शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी पाणी खूप महत्वाचे असते ,पाण्याशिवाय शेतीमधील उत्पादन घेणे अवघडच! जगातील एकूण शेतीपैकी २०% शेती सिंचन पद्धतीने केली जाते .शेतीतील उत्पादन याचे एकूण प्रमाण बघितले तर सुमारे ४०% उत्पादने हे कृषी मधून होत असतात .पावसाच्या आधारे शेती व सिंचन शेती मध्ये तुलना केल्यावर सिंचन पद्धतीने केलेल्या शेतीचे उत्पन्न कैकपटीने वाढलेले आपल्याला दिसेल.महाराष्ट्र राज्यात एकूण सिंचन क्षेत्र ४४.१९% लाख हे.असून त्यापैकी जवळपास ८०% क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे .यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक गटातील आहेत .

  • भारतात ज्या शेतकरी मित्रांकडे शेतात वीज नाही ते या योजनेचा फायदा घेवू शकतात .
  • PM Kusum Solar Pump Yojna योजनेंतर्गत शेतकऱ्याला शेतात सौर प्लांट बसविले जाणार आहेत .
  • पीएम कुसुम योजना मुळे डिझेलचा खर्च तसेच प्रदुषण सुद्धा कमी होईल .
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकरी सोलर प्लांट बसवून शेतात २४ तास सिंचन करू शकतात.
  • शेतकरी सोलर प्लांट बसवून वीजनिर्मिती तर करतीलच शिवाय शेतातील उत्पन्नही वाढवू शकतात.
  • सौर पंप पासून तयार झालेली वीज शेतकरी हे विकूही शकतात .
  • विकून आलेल्या पैश्यातून शेतकरी नवीन शेती धंदा किंवा व्यवसाय उभारू शकतात .
  • खुल्या वर्गातील शेतकऱ्याला ९०% अनुदान देण्यात येईल तसेच अनुसूचित जाती ,जमाती साठी ९५% अनुदान देण्यात येते .
  • सौर पेनल हा विशिष्ठ उंचीवर बसवला जातो त्यामुळे शेतकऱ्याला पिके घेण्यास अडचण येत नाही .

कुसुम सोलर योजना ही ३१ मार्च २०२६ पर्यंत असणार आहे ,याच कालवधीत शेतकरी हे या योजनेचा लाभ घेवू शकणार आहेत .

  • पीएम कुसुम सोलर योजनेसाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असावा .
  • या पीएम कुसुम योजना साठी अर्जदाराकडे किसान कार्ड असणे आवश्यक आहे.
  • रहिवाशी (राहत्या ठिकाणचा) पुरावा
  • अर्जदाराच्या जमिनीची कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • अर्जदाराचे पासपोर्ट फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • ज्या भागात आतापर्यंत वीज पोहोचलीच नाही अश्या शेतकरी वर्गाला याचा अधिक लाभ/प्राधान्य देण्यात येणार आहे
  • या योजनेसाठी कुठलीही अट नाही म्हणजेच मोठे क्षेत्र ,अल्प , लघु क्षेत्र असणर्या सर्व शेतकरी वर्ग या योजनेस पात्र असणार आहे.
  • हि योजना सर्व जाती जमाती साठी असणर आहे , खुला वर्ग , अनुसूचित जाती जमाती हे सर्व या योजनेस पात्र आहेत.
  • सुरवातीला अर्जदार शेतकऱ्याला सरकाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल (PM Kusum Solar Pump 2025).
  • समोर अधिकृत संकेतस्थळाचे होम पेज दिसेल त्यावर Solar Kusum Yojna या पर्यायावर क्लिक करावे .
  • त्यानंतर तुम्हाला समोर असलेल्या Make New Application वरती क्लिक करावे. समोर नवीन पेज उघडेल.
  • समोर आलेल्या पेज वर आपला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी आपल्या मोबाईल क्रमांक येईल तो पुनर्स्थापित करावा .
  • शेतकऱ्याने आपल्या बद्दलची सव माहिती भरावी ,त्यानंतर समोर असणाऱ्या Next बटनवर क्लिक करावे .
  • यांनतर शेतकऱ्याला आपली माहिती पुन्हा भरावी लागणार आहे ,त्यात शेतकऱ्याने आधार ई केवायसी ,बँकेचा तपशील ,जातीचे स्वघोषणा,जमिनी संबंधित कागदपत्रे तसेच सौर पंप माहिती भरावी .
  • त्यानंतर शेवटी सेल्फ डीक्लेरशन चेक बॉक्स वरती क्लिक करावे म्हणजे तुमचा अर्ज पूर्ण होईल ,नंतर पेमेंट करावे ,पेमेंट केल्यावर एक क्रमांक प्राप्त होईल आणि मोबाईल वरती याची माहिती मेसेज वरती दिली जाईल .जी माहिती तुम्ही भरली आहे त्याची प्रत म्हणून घ्या म्हणजे भविष्यात काही माहितीसाठी अडचणी येणार नाहीत .

३ HP पंप

एकूण किंमत १,९३,८०३ रुपये
सर्वसाधारण गटातील शेतकऱ्याच्या हिस्सा १९,३८० रुपये
अनुसूचित जाती -जमाती शेतकरी हिस्सा ९,६९० रुपये

५ HP पंप

एकूण किंमत २,६९,७४६ रुपये
सर्वसाधारण गटातील शेतकऱ्याचा हिस्सा २६,९७५ रुपये
अनुसुचित जाती -जमाती शेतकरी हिस्सा १३,४८८ रुपये

७.५ HP पंप

एकूण किंमत ३,७४,४०२ रुपये
सर्वसाधारण गटातील शेतकऱ्याचा हिस्सा ३७,४४० रुपये
अनुसुचित जाती-जमाती शेतकरी हिस्सा १८,७२० रुपये
अडीच एकर जमीन ३ HP
अडीच ते पाच एकर जमीन ५ HP
पाच एकर पेक्षा जास्त जमीन ७.५ HP

पीएम कुसुम सोलर योजनेचा खरा निष्कर्ष म्हणजे शेतीमध्ये खर्च करूनही उत्पन्न कमी , शेतीमध्ये होणारा अवाढव्य खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आणली आहे . या योजनेंतर्गत शेतकऱ्याच्या शेतात सौरपंप बसविले जातात .त्यामुले शेतकरी स्वतःच्या शेतात सौर वीज निर्मिती करून मोफत वीज वापरू शकेल .सौर पंप बसविण्यासाठी शेतकऱ्याला एकूण खर्चाच्या १० % रक्कम भरावी लागणार आहे तर ६० % सरकार अनुदान स्वरुपात भरेल तर ३० % कर्ज स्वरुपात शेतकऱ्याला देता येते.


पीएम कुसुम सोलर पंप योजना 2025https://pmkusum.mnre.gov.in/
पीएम कुसुम सोलर पंप योजना (महाराष्ट्र)https://pmkusum.mnre.gov.in/assets/pdf/Agencies%20component%20B/Maharashtra_17.10.2022.pdf
भारतीय उर्जा विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://www.mnre.gov.in
टोल फ्री कमांक १८००-१८०-३३३३
https://www.mahaurja.com/ASKP/login.php
https://www.mahadiscom.in/solar/index.html

तुकडा बंदी कायदा 2025https://shorturl.at/9btGw
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2025 https://shorturl.at/1kGlw
शेतकरी फार्महाऊस योजना 2025 https://shorturl.at/gu9oD
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना 2025 https://shorturl.at/M7zBo
महाडीबीटी योजना 2025 https://shorturl.at/tio4g
मागेल त्याला सौर पंप योजना 2025 https://shorturl.at/uiZYe
मुख्यमंत्री सहाय्यता निधी 2025 https://shorturl.at/EqFBH
महिलांसाठी ६ सरकारी योजना 2025 https://shorturl.at/sYbKR
आमचे अधिकृत संकेतस्थळ https://smartsahyadri.com/

१.पीएम कुसुम सोलर पंप योजना नक्की कोणासाठी लागू केलेली आहे ?

-ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत सरकारच्या कोणत्याच सौर पंप योजनेचा लाभ घेतला नसेल ते या योजनेस पात्र असतील .

२.सौर पंप (Solar Pump) बसविण्यासाठी एकूण किती खर्च येत असतो ?

– 1 HP सोलर पंपाची किंमत ९००००० हजार रुपये खर्च येतो त्यात शेतकऱ्याला ४०% म्हणजेच ३६००० रुपये भरावे लागतील .

३.पीएम कुसुम सोलर योजना साठी एकूण किती अनुदान सरकार देते ?

-पीएम कुसुम सोलर पंप साठी सौर पंपाच्या एकूण खर्चापैकी फक्त १०% रक्कम भरावी लागणार आहे तर ६०% सरकार अनुदान स्वरुपात देईल व ३०% पर्यंत कर्ज सुद्धा शेतकऱ्याला उपलब्ध होईल

४.पीएम कुसुम सोलर योजना 2025 यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

-या योजनेसाठी शेतकऱ्याकडे किसान कार्ड ,आधार कार्ड , पत्त्याचा पुरावा ,अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचे कागदपत्रे , पासपोर्ट फोटो ,मोबाईल क्रमांक असे सर्व कागदपत्रे आवश्यक आहे .

५.कुसुम सोलर पंप साठी कोण पात्र असेल ?

-या कुसुम सोलर योजनेसाठी केवळ शेतकरीच पात्र असणार आहेत.

६.पीएम कुसुम सोलर योजनेचे सौर पेनल किती काळ टिकतात ?

-या योजनेचे सौर पेनल हे जवळपास २५ ते ३० वर्षापर्यंत टिकतात .

७.पीएम कुसुम सोलर साठी अर्ज कसा करावा ?

– पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे तो सरकारच्या