Ahilyanagar 12 Aamdar 2024 अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ आमदार – भौगोलिक विविधतेने नटलेला हा अहिल्यानगर जिल्हा ,जिल्ह्याच्या पूर्वेला सततचा दुष्काळ ,पश्चिमेला अति पावसाचा भाग .जिल्ह्याचे एक टोक मुंबईला तर दुसरे टोक मराठवाड्याला जोडलेले .अहिल्यानगर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा ,कोंकण यांच्या मध्यातील हा प्रदेश एकीकडे सह्याद्रीचा कोकणकडा दुसरीकडे जामखेड तालुक्यातील उनाड दुष्काळी डोंगर .अहिल्यानगर जिल्हा म्हणजे गोवा राज्याच्या ५ मोठा असणारा जिल्हा ,जिल्ह्यांचे आकारमान १७ हजार चौरस किमी आहे .१४ तालुके असणारा हा जिल्हा राजकीय दृष्ट्या सुधा खूप महत्वाचा आहे ,या जिल्ह्याचे दोन भाग राजकीय दृष्ट्या पडतात त्यात एक म्हणजे अहिल्यानगर उत्तर अन दुसरा अहिल्यानगर दक्षिण .उत्तरेत अनुक्रमे अकोले , संगमनेर ,राहाता ,कोपरगाव ,श्रीरामपूर ,नेवासा असे तालुके येतात तर दक्षिणेत नगर ,श्रीगोंदा, कर्जत -जामखेड ,पारनेर ,नगर शहर ,राहुरी . महाराष्ट्राच्या राजसत्तेत कायमच मानाचं स्थान नगर जिल्ह्याचे राहिलेले आहे . विधानसभेला १२ Aamdar अन लोकसभेला २ खासदार जिल्ह्यला प्रत्येक वेळी होत असतात .अनेक शैक्षणिक संस्था ,मोठमोठे दुध संघ ,सर्वात जास्त साखर कारखाने यामुळे या जिल्ह्यला कायमच महत्व प्राप्त झालेले आपण पाहिले आहे .यावेळी जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पदरात प्रंचड मोठे यश टाकलेले आपण पाहिले आहे .जिल्ह्यात १२ पैकी १० आमदार महायुतीचे तर फक्त दोनच महाआघाडीला जागा जिंकता आल्या आहेत ,या सर्व जिल्ह्यातून कोणत्या आमदाराला किती मत मिळाले, कोण प्रथमच आमदार म्हणुन निवडून आले याबद्दल विस्तृत जाणून घेणार आहोत.
पक्षीय बलाबल (अहिल्यानगर ) | आमदारांची संख्या |
भाजप | ४ |
शिवसेना | २ |
राष्ट्रवादी (अजित पवार ) | ४ |
कॉंग्रेस | १ |
राष्ट्रवादी (शरद पवार ) | १ |
Ahilyanagar 12 Aamdar 2024 List |अहिल्यानगर १२ आमदार
Ahilyanagar 12 Aamdar 2024 List पुढीलप्रमाणे –

विद्यमान आमदारांचे नाव | मतदारसंघ |
श्री राधाकृष्ण विखे पाटील | राहता |
श्री विक्रमसिंह पाचपुते | श्रीगोंदा-नगर |
श्री शिवाजीराव कर्डिले | राहुरी -नगर |
श्री काशिनाथ दाते | पारनेर-नगर |
श्री विठ्ठलराव लंघे | नेवासा |
श्री रोहित पवार | कर्जत-जामखेड |
श्री अमोल खताळ | संगमनेर |
श्री किरण लहामटे | अकोले |
श्री हेमंत ओगले | श्रीरामपूर |
सौ मोनिका राजळे | पाथर्डी -शेवगाव |
श्री संग्राम जगताप | नगर शहर |
श्री आशुतोष काळे | कोपरगाव |

१.राधाकृष्ण विखे पाटील
Ahilyanagar 12 Aamdar 2024 मध्ये सुरवातीला पाहुया राहाता मतदारसंघबद्दल , राहाता मतदारसंघाचे कित्येक दशकं प्रतिनिधित्व करणारे विखे पाटील कुटुंब ,४ पिढ्यांपासून राजकारण त्यांच्या कुटुंबात आहे .स्व.विठ्ठलराव विखे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात पहिला सहकरी कारखाना उभा राहिला ,त्याच्या माध्यमातून पुढे जावून राजकीय सामाजिक भुमिका विखे पाटील कुटुंबाने अतिशय योग्यरित्या जिल्ह्यात रुजवली.गेली ५ दशकं जिल्ह्यावर राज्य करणे सोप्पे नाही विखे कुटुंबाकडून अनुक्रमे हे स्व.बाळासाहेब विखे पाटील , राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यामातून ते शक्य होत राहिले.राहता मतदारसंघातून ७ वेळा निवडून आलेले राधाकृष्ण विखे पाटील हे सत्तेत असताना नेहमी क्रमांक २ चे मंत्री राहिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत कृषी,पणन ,महसूलमंत्री, कृषिमंत्री राहिलेले आहेत.आताही नवी मंत्रिमंडळात त्यांना पहिल्या २ मधील मंत्रिपद नक्की असेलच असे म्हंटले जात आहे .विखे पाटील यांनी वाळू धोरणावर घेतलेला निर्णय राज्यभर गाजला होता .त्यांचे अनेकांनी समर्थन सुद्धा केले होते .देशातील क्रमांक २ चे मंदिर अर्थात श्री साईबाबा यांचे मंदिर यांच्याच मतदारसंघात आहे तसेच जिल्ह्यातील एकमेव विमानतळ सुद्धा यांच्याच मतदारसंघात आहे .श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या Vidhansabha 2024 च्या मताधिक्यावर थोडक्यात नजर टाकूयात .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री राधाकृष्ण विखे पाटील | १४४७७८ |
सौ प्रभावती घोगरे | ७४४९६ |
श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विजयी मताधिक्य -७०२८२ |
२.विक्रमसिंह पाचपुते
Ahilyanagar 12 aamdar 2024 मधील पुढचे आमदार आहेत अहिल्यानगर दक्षिण भागातून येणारे विक्रमसिंह पाचपुते ,त्यांचा मतदारसंघ आहे २२६ श्रीगोंदा-नगर .प्रथमच आमदार पदी विराजमान झालेले पाचपुते उच्च्शिक्ष्ट आहेत गेले १० वर्ष समाजकारण , राजकरण याच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील गावोगावी आपली ओळख निर्माण केलेली आहे.विक्रमसिंह पाचपुते यांचे वडील म्हणजे श्री बबनराव पाचपुते ,राज्याचे माजी मंत्री असलेले पाचपुते यांच्याकडे गृहमंत्री ,वनमंत्री ,आदिवासी विकास मंत्री ,राष्ट्रवादीचे प्रदेशाद्याक्ष असे अनेक पद येवून गेली आहेत ,त्यांचा निवडून येण्याचा विश्वविक्रम सुधा वेगळाच आहे ,त्यांनी ९ निवडणुका पैकी ७ जिंकल्या त्या सुद्धा वेगवेगळ्या चिन्हावर .आता त्यांचे पुत्र विक्रमसिंह पहिल्यांदा विधानसभेत चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत समोर मात्तब्बर नेते असून सुधा प्रचंड मतांनी तेही पहिल्या वेळेस ,हे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ठळकपणे उमठ्णारे आहे .श्री विक्रमसिंह पाचपुते यांची विधानसभेची आकडेवारी पाहूया
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री विक्रमसिंह पाचपुते | ९९८२० |
श्री राहूल जगताप | ६२६६४ |
श्री विक्रमसिंह पाचपुते यांचे विजयी मताधिक्य -३७१५६ |
३.श्री शिवाजीराव कर्डिले
राहुरी-नगर मतदारसंघातून निवडून आलेले श्री शिवाजीराव कर्डिले हे २००९ पूर्वी नगर मात्दारासंघ्तून निवडून यायचे पण २००९ नंतर त्यांच्या मतदारसंघाची तीन भागात विभागणी अनुक्रमे , राहुरी ,श्रीगोंदा ,पारनेर मध्ये झाली होती त्यामुळे मतदारसंघ निवडणे त्यांना जोखमीचे होते अश्यातच त्यांनी राहुरी मतदारसंघ मधून २००९ ,२०१४ निवडणूक चांगल्या मतांनी जिंकली पण विधानसभा २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे श्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला ,पण त्यांनी पराभवानंतर मतदारसंघ सोडला नाही ,सतत सुखदुखात राहून काम केली त्याचेच फळ म्हणून ते प्रचंड मताधिक्याने Ahilyanagar 12 Aamdar 2024 List मध्ये एकमेव राष्ट्रवादीकडून निवडून आले त्यांच्या मतांवर एक नजर टाकूयात .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री शिवाजीराव कर्डिले | १३५८५९ |
श्री प्राजक्त तनपुरे | १०१३७२ |
श्री शिवाजीराव कर्डिले यांचे विजयी मताधिक्य -३४४८७ |
४.श्री काशिनाथ दाते
Ahilyanagar 12 Aamdar 2024 पारनेर मतदारसंघातून निवडून प्रा काशिनाथ दाते सर ,अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत दाते यांनी सौ राणीताई लंके यांचा पराभव केला आहे .राज्यभर गाजलेल्या या मतदारसंघात खासदार निलेश लंके यांचे मोठे प्राबल्य आहे याच बळावर त्यांना लोकसभेत प्रचंड मताधिक्य मिळाले होते ,लोकसभेला सुजय विखे यांचा पराभव करत जायंट किलर ठरलेले लंके यांना अवघ्या ६ महिन्यातच पराभव पाहावा लागला आहे.राष्ट्रवादीकडून लढलेले दाते यांचा प्रवास तालुकाद्यक्ष म्हणून झालेला होता .श्री दाते यांच्या विधानसभा 2024 मताधिक्यावर थोडक्यात नजर टाकूया .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री काशिनाथ दाते | ११३६३० |
सौ राणीताई लंके | ११२१०४ |
श्री काशिनाथ दाते यांचे विजयी मताधिक्य -१५२६ |
५.विठ्ठलराव लंघे
Ahilyanagar 12 Aamdar 2024 मध्ये नेवासा मतदारसंघ म्हणजे गडाख यांचा बालेकिल्ला असे म्हंटल जायचं. विधानसभा २०१४ साली गडाख यांचा झालेला पराभव जिव्हारी लागणारा होता ,पूर्ण जोशाने ५ वर्ष जनतेत गेलेल्या गडाखाना २०१९ अगदी सहजरित्या जिंकता आली आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना कॅबिनेट मंत्रिपद सुद्धा देण्यात आले होते .पण कित्येक वर्षाची मेहनत अन महायुती सरकारने आणलेल्या योजना यामुळे श्री विठ्ठलराव लंघे चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत.यांच्या विजयात विखे पाटील घराण्याचा खारीचा वाट राहिला आहे असे म्हंटले जाते .शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा लढलेले लंघे जिल्ह्यातील शिवसेनेचे दुसरे आमदार आहेत .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री विठ्ठलराव लंघे | ९५४४४ |
श्री शंकरराव गडाख | ९१४२३ |
श्री विठ्ठलराव लंघे यांचे विजयी मताधिक्य -४०२१ |
६.रोहित पवार
Ahilyanagar 12 Aamdar 2024 मध्ये जिल्ह्यात सर्वात चुरशीची ठरलेली निवडणूक म्हणजे कर्जत जामखेडचीच.शेवटच्या फेरीपर्यंत निकाल अनपेक्षित होता .पण मागील काळात केलेल्या विकासाच्या जोरावर , कार्यकर्त्याच्या संगठन क्षमेतेवर रोहित पवार यांनी अल्प ,मतांनी बाजी मारलीच २०१९ ते २०२४ पर्यंत तालुक्यातील काही गावांचा दुष्काळ कमी केला तसेच बऱ्यापेकी प्रशासकीय इमारतीचे काम त्यांच्या काळात पार पडली .महायुतीची लाट असताना रोहित पवार यांनी मारलेली बाजी उल्लेखनीय ठरली आहे .रोहित पवार यांच्या एकूण विधानसभा मताधिक्यावर एक नजर .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री रोहित पवार | १२७६७६ |
श्री राम शिंदे | १२६४३३ |
श्री रोहित पवार यांचे विजयी मताधिक्य -१२४३ |
७.श्री अमोल खताळ
Ahilyanagar 12 Aamdar 2024 मध्ये जायंट किलर ठरलेला मतदारसंघ म्हणजे संगमनेर .जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाला असणारा मतदारसंघ गेली ५ दशक इथे थोरात नावच वलय होत ,येथून सलग ९ वेळा श्री बाळासाहेब थोरात आमदार म्हणून निवडून आलेले होते पण यावेळी महायुतीची लाट,त्यात विखे यांच्यासोबत असलेले सख्य संपूर्ण राज्याला परिचित .याचमुळे अगदी सामान्य घरातील मुलाला शिवसेनेकडून ऐनवेळी तिकीट देण्यात आले .विखेंची साठी त्यात हिंदुत्ववादी विचार त्यामुळे विजय सहज अन सोप्पा झाला .आज तरुण आमदारांमध्ये श्री अमोल खताळ आहेत ते प्रथमच विधानसभेत पोहचलेले असल्याने त्यानाच्याक्डून बऱ्याच अपेक्षा संगमनेरकरवासीयांच्या असतीलच ,श्री खताळ यांच्या विधानसभा आकडेवारी वर नजर टाकूयात .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री अमोल खताळ | ११२३८६ |
श्री बाळासाहेब थोरात | १०१८२६ |
श्री अमोल खताळ यांचे विजयी मताधिक्य -१०५६० |
८. श्री किरण लहामटे
Ahilyanagar 12 Aamdar 2024 सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले डॉ किरण लहामटे हे अकोले मतदारसंघातून निवडून आले आहेत.२०१४ ला विभव पिचड यांचा पराभव करत विधासभा गाठली होती तर यावेळी श्री अमित भांगरे यांचा पराभव करत त्यांनी दुसऱ्यांदा विधानसभा गाठली आहे ,राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे ते आमदार आहेत.आदिवासी बहुल असलेला हा विधानसभा मतदारसंघ अतिशय नयनरम्य आहे ,या मतदारसंघात भंडारदरा धरण असल्याने पर्यटकांची कायमच रीघ असते .किरण लहामटे यांनी मागील पंचवार्षिक मध्ये याच विषयांवर जास्त काम केल्याने त्यांचा यावेळी विजय अगदी सुकर झाला .त्यांच्या विधानसभेतील मताधिक्यावर एक नजर टाकूयात .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री किरण लहामटे | ७३९५८ |
श्री अमित भांगरे | ६८४०२ |
श्री किरण लहामटे यांचे विजयी मताधिक्य -५५५६ |
९.हेमंत ओगले
Ahilyanagar 12 Aamdar 2024 मध्ये पुढील नाव आहे हेमंत ओगले यांचे ,श्रीरामपूर मतदारसंघातून निवडून आलेले हेमंत ओगले हे सुरवातीपासून काँग्रेसी विचारांचे .राखीव मतदारसंघ असलेला हा श्रीरामपूर मतदारसंघ .येथून मागील वेळी लहू कानडे यांनी विधानसभा जिंकली होती ,गेली १०/१२ वर्ष कॉंग्रेसच्या तिकिटाची मागणी करणारे ओगले यावेळी मात्र यशस्वी झाले ,त्यांना तिकीट जाहीर झाले त्यांनी याआधी मतदारसंघात जोडलेली माणस यावेळी कमी आली अन ते सहजरीत्या विजयी झाले ,ओगले हे श्रीगोंदा मतदारसंघातील पेडगाव या गावचे पण हा मतदारसंघ खुला प्रवार्ग्साठी असल्याने त्यांनी श्रीरामपूर मधून बऱ्याच वर्चाषापासून चाचपणी सुरु केली होती ती यावेळी यशस्वी झाली आन ते चांगल्या मतांनी निवडून येवून विधानसभा मध्ये प्रथमच दाखल झाले .ओगले यांना मिळालेल्या मताधिक्यावर एक नजर –
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री हेमंत ओगले | ६६०९९ |
श्री भाऊसाहेब कांबळे | ५२७२६ |
श्री हेमंत ओगले यांचे विजयी मताधिक्य -१३३७३ |
१०.सौ मोनिका राजळे
Ahilyanagar 12 Aamdar 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या सौ मोनिका राजळे या पाथर्डी-शेवगाव या मतदारसंघातून निवडून येतात .याठिकाणी राजळे-ढाकणे संघर्ष कित्येक दशकांपासून आहे .स्व.राजीव राजळे यांच्या अकाली निधनाने सौ मोनिका राजळे यांनी २०१४ विधानसभा लढवली अन जिंकलीही .त्यानंतर मतदारसंघात केलेली काम तसेच युतीच्या महिला योजना जनतेपर्यंत त्यांनी वेलेल्त पोहचवल्या याचाच पाह्यदा त्यांना यावेळच्या विजयात झाला आहे .यावेळी त्यांच्या समोर शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रताप ढाकणे होते ,यावेळची लढत दोघांमध्ये जोरदारपणे झाली अटी तटीच्या या लढतीत अल्पशा मताने मोनिका राजळे विजयी झाल्या अन तिसऱ्यांदा विधानसभेमध्ये दाखल झाल्या .त्यांना मिळालेली मत यावर एक नजर टाकूयात .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
सौ मोनिका राजळे | ९९७७५ |
श्री प्रताप ढाकणे | ८०७३२ |
सौ.मोनिका राजळे यांचे विजयी मताधिक्य -१९०४३ |
११.संग्राम जगताप
Ahilyanagar Aamdar 2024 मध्ये नगर शहर असा एक मतदारसंघ होता जो एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा ,येथून ४ वेळेस अनिल राठोड निवडून आले यायचे ते युती सरकार मध्ये मंत्रीही राहिले होते पण त्यांचा हा मतदारसंघ vidhansabha 2014 मध्ये श्री संग्राम जगताप यांनी खेचून घेत विधानसभेत मुसंडी मारली होती २०१४, २०१९ अन आता २०२४ मध्ये श्री अभिषेक कळमकर यांना नमवत तिसऱ्यांदा विधानसभामध्ये धडक मारली आहे .यावेळी त्यांच्या विजयाचे मताधिक्य सुद्धा वाढलेले आहे .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री संग्राम जगताप | ११८६३६ |
श्री अभिषेक कळमकर | ७९०१८ |
श्री संग्राम जगताप यांचे विजयी मताधिक्य -३९६१८ |
१२.श्री आशुतोष काळे
Ahilyanagar Aamdar 2024 मधील पुढील नाव म्हणजे श्री आशुतोष काळे यांचे तरुण अभ्यासू, उच्चशिक्षित असलेले आशुतोष दुसऱ्यांदा विधानसभामध्ये गेले आहेत ,विधानसभा २०१९ मध्ये भाजपच्या सौ स्नेहलता कोळे यांचा पराभव करत ते पहिल्यांदा Aamdar झाले होते त्यावेळी त्यांचे विजयी मताधिक्य अगदी कमी होते यावेळी महायुती सोबत असलेले काळे यांना कोल्हे यांचा मोठा फायदा झाला त्यामुळे त्यांचे मताधिक्य बऱ्याच प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसतेय .यावेळी त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणुन नवखे संदीप वर्पे होते पण त्यांना बर्याच अंतराने पराभव पाहावा लागला ,एक नजर आशुतोष काळे यांच्या विधानसभा मताधिक्यावर .
उमेदवारांचे नाव | मताधिक्य |
श्री आशुतोष काळे | १६११४७ |
श्री संदीप वर्पे | ३६५२३ |
श्री आशुतोष काळे यांचे विजयी मताधिक्य -१२४६२४ |
इतर जिल्ह्यातील निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा
सरकारी योजना तसेच राजकीय माहितीसाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा
राष्ट्रवादी अजित पवार यांचे ९ मंत्री | https://shorturl.at/A9kQB |
शिवसेना एकनाथ शिंदे यांचे ११ मंत्री | https://shorturl.at/4ewzM |
महाराष्ट्र नवनिर्वाचित १० महिला आमदार | https://shorturl.at/gfbHc |
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२५ | https://smartsahyadri.com/mukhyamantri-mazi-ladki-bahin-yojna-2024/ |
महाराष्ट्रातील सर्वात तरुण ८ आमदार | https://shorturl.at/nEkVL |
आमचे अधिकृत संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |
सतत विचारले जाणारे प्रश्न :-
१ .महाराष्ट्र विधानसभा मध्ये किती सदस्य संख्या असते ? -महाराष्ट्र विधानसभेत एकुण २८८ सदस्य असतात
२.विधानपरिषद मध्ये एकूण किती सदस्य असतात ? -विधानपरिषद मध्ये एकूण ७८ सदस्य निवडले जातात .
३.सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्र विधानसभा मध्ये किती सदस्य बहुमत असावे लागते ? -महाराष्ट्र विधानसभा मध्ये सत्ता स्थापनेसाठी १४५ आमदारांची सदस्य संख्या लागते
४.विधानसभा अन विधानपरिषद सदस्याचा कालावधी किती वर्षाचा असतो ? -विधानसभा सदस्य ५ वर्षासाठी असतो तर विधानपरिषद सदस्य कालावधी ६ वर्षाचा असतो.
५.विधानपरिषदेचे सध्याचे सभापती कोण आहेत ? -श्री राम शिंदे हे सध्याच्या विधानपरिषदेचे सभापती आहेत .