Maharashtra Vidhansabha 2024 महाराष्ट्र विधानसभा नवनिर्वाचित १० महिला आमदार – नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा २०२४ साठी महिला आमदाराचे प्रमाण हे कित्येक पटीने वाढलेले आपल्याला पहायला मिळेल . सर्वच महत्वाच्या पक्षांनी आपल्या पक्षाचा चेहरा सर्वसमावेशक व्हावा यासाठी महिलांना उमेदवारी दिल्याने कित्येक प्रस्थापित लोकांना पराभूत करून महिला आमदार त्याठिकाणी ‘जायंट किलर ‘ ठरलेल्या आपण सर्वांनी पहिले आहेच. यावेळी विधानसभेला भाजपने १३२ , शिवसेना (एकनाथ शिंदे) ५७ जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकलेल्या आहेत . विधानसभेच्या २८८ जागांपैकी २१ जागेवर यावेळी महिलांनी बाजी मारत आमदारकीची माळ आपल्या गळ्यात घातली आहे . या २१ आमदारांमध्ये यावेळी भाजपला नवीन ४ आमदार मिळालेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे श्रीजया चव्हाण ,सुलभा गायकवाड ,स्नेहा पंडित ,अनुराधा चव्हाण .तसेच शिवसेना ( शिंदे ) नवीन २ आमदार मिळालेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे संजना जाधव तसेच सक्री या विधानसभा २०२४ मध्ये निवडून आलेल्या २१ पैकी १० महिला आमदार यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत .
महाराष्ट्रातील नवनिर्वाचित १० महिला आमदार

महिला आमदारांचे नाव | मतदारसंघ | पक्ष |
माधुरी मिसाळ | पर्वती ,पुणे | भाजप |
श्वेता महाले | चिखली | भाजप |
नमिता मुंदडा | केज ,बीड | भाजप |
संजना जाधव | कन्नड सोयगाव | शिवसेना (एकनाथ शिंदे ) |
मेघना बोर्डीकर | जिंतूर | भाजप |
मोनिका राजळे | शेवगाव-पाथर्डी | भाजप |
अदिती तटकरे | श्रीवर्धन | राष्ट्रवादी (अजित पवार) |
स्नेहा पंडित | वसई-विरार | भाजप |
मंदा म्हात्रे | बेलापूर | भाजप |
मंजुळा गावित | साक्री | शिवसेना (एकनाथ शिंदे ) |
Maharashtra Vidhansabha 2024

१.माधुरी मिसाळ -पर्वती ,पुणे
Maharashtra Vidhansabha 2024 सलग चौथ्यांदा निवडून येणाऱ्या महिला आमदार महाराष्ट्र राज्यात कोण असतील तर त्या आहेत पुण्यातील पर्वती मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या माधुरी मिसाळ.मिसाळ यांचा जन्म १७ जानेवारी १९७५ रोजी झालेला आहे त्याचं सध्याचे वय ४९ आहे .सुरवातीपासूनच घरात राजकीय वातावरण असल्याने नागसेवाकाप्सू केल्लेई वाटचाल आज आमदारकी पर्यंत आलेली आहे , आणि सध्या त्यांचा दांडगा अनुभव अन त्यात त्यांनी आमदारकीचा मारलेला चौकार यामुळे त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळण्याची दाट शक्यता यावेळी वर्तवली जात आहे.विधानसभा २००९ ते विधानसभा २०२४ या कालावधी मध्ये जनतेत असलेली काम , प्रचंड जनसंवाद यामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठा तयर झालेला आपल्याला यावेळी त्यांच्या विधानसभा २०२४ च्या मताधिक्यातून जाणवला आहे. राष्ट्रावादिकडून लढलेल्या अश्विनी कदम तसेच कॉंग्रेस मध्ये बंडखोरी करून उभे असलेले आबा बागुल याचं कडव आव्हान तिरंगी लढत असताना सुद्धा यावेळी मिसाळ यांनी ५० हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवून पर्वती चा चौध्यांदा गड राखला आहे.
उमेदवारांचे नाव | मिळालेले मताधिक्य | पक्ष |
माधुरी मिसाळ (विजयी) | १ ,१७,८८७ | भाजप |
अश्विनी कदम | ६७३७३ | राष्ट्रवादी (शरद पवार ) |
आबा बागुल | १०४४६ | अपक्ष |
विजयी उमेदवारांचे मताधिक्य – ५०५१४ |
२.श्वेता महाले -चिखली , बुलढाणा
महाराष्ट्र विधानसभा २०१९ मध्ये पहील्यांदा निवडून आलेल्या श्वेता महाले याचं शिक्षण हे डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे .श्वेता महाले यांनी २०१९ साली दोन वेळचे आमदार असलेले राहून बोंद्रे यांना निवडणुकीत ६८१० मतांनी धूळ चारून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली होती ,नुकत्याच झालेल्या विधानसभा २०२४ मध्ये त्यांनी सलग दुसऱ्यांदा निवडून जिंकत आपली गुणवत्ता ,लोकांमधील संवाद कसा आहे हे सिद्ध करून दाखवले आहे यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेस कडून उभे असलेले राहुल बोंद्रे यांचा पराभव केलेला आहे
उमेदवारांचे नाव | मिळालेले मताधिक्य | पक्ष |
श्वेता महाले (विजयी ) | १०९२१२ | भाजप |
राहुल बोंद्रे | १०६०११ | कॉंग्रेस |
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -३२०१ |
३.नमिता मुंदडा -केज ,बीड
Maharashtra Vidhansabha 2024 बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून राजकीय कारकीर्द सुरु करणाऱ्या नमिता मुंदडा यांना सुरवातीला कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नव्हती ,विधानसभा २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून लढलेल्या मुंदडा यांनी त्यावेळी सहज विजय मिळवत विधानसभेत पाऊल टाकले होते त्यावेळी मतदार संघातील समस्यांवर लक्ष देवून त्यावे आवाज उठवला होता त्यामुळे भाजपने २०१४ साली निवडून आलेल्या संगीता ठोंबरे यांना डावलून तरुण सुशिक्षित नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली आणि ती मुंदडा यांनी जनतेच्या प्रेमामुळे विधानसभा सहज जीणूक आणली होती ,याही वेळी म्हणजे Maharashtra Vidhansabha 2024 मध्ये त्यांचा सामना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पृथ्वीराज साठे यांच्याशी झाला ,अवघ्या २६८७ मतांनी बाजी मारत दुसऱ्यांदा विधानसभेत आमदार म्हणुन जाण्याचा बहुमान त्यांनी मिळवला.
उमेदवारांचे नाव | मिळालेले मताधिक्य | पक्ष |
नमिता मुंदडा (विजयी) | ११७०८१ | भाजप |
पृथ्वीराज साठे | ११४३९४ | राष्ट्रवादी (शरद पवार) |
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -२६८७ |
४.संजना जाधव -कन्नड -सोयगाव , छत्रपती संभाजीनगर
Maharashtra Vidhansabha 2024 मध्ये ज्या मतदारसंघाची बरीच चर्चा झाली त्यातीलच हा एक मतदारसंघ कन्नड सोयगाव ,अनेक कारणांनी चर्चेत असणारा हा मतदारसंघ ,इथे फार पूर्वी रायभान जाधव यांसारख्या प्रामाणिक व्यक्तींनी इथे राजकरण ,समाजकारण केलेले, त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा दोन वेळेस चे आमदार श्री हर्षवर्धन जाधव यांनी मतदार संघाची धुरा सांभाळली होती ,विधानसभा २०१९ मध्ये अवघ्या काही मतांनी पराभव झालेले जाधव त्यावेळी शिवसेनकडून लढलेले उदयसिंह राजपूत यांनी त्यांच्याविरुद्ध बाजी मारली होती .पण पूर्णवेळ समाजासाठी वाहून घेतलेल्या जधव यांना विधानसभा अगदी सोप्या पद्धतीने जिंकता येईल असे वाट्त असताना ,इथे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी संजना यांना उमेदवारी दिली , त्यामुळे दुरंगी असणारी निवडणूक तिरंगी झाली अन संजना जाधव या चांगल्या मतांनी निवडून आल्या.आणि प्रथम आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या
उमेदवारांचे नाव | मिळालेले मताधिक्य | पक्ष |
संजना जाधव (विजयी) | ८४४९२ | शिवसेना (एकनाथ शिंदे) |
हर्षवर्धन जाधव | ६६२९१ | अपक्ष |
उदयसिंह राजपुत | ४६५१० | शिवसेना (उबाठा ) |
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -१८२०१ |
५.मेघना बोर्डीकर -जिंतूर ,परभणी
Maharashtra Vidhansabha 2024 मध्ये ४४ वर्षीय असणाऱ्या मेघना बोर्डीकर यांना पक्षाने २०१९ प्रमाणेच यांही वेळी उमेदवारी देत त्यांच्यावर पक्षाने विश्वास ठेवला होता , तो त्यांनी सार्थकी ठरवला .कृषी व जल , पर्यावरण ,महिला सशक्तीकरण , शिक्षण,आरोग्य या सर्व प्रश्नांवर अगदी लहान मुलांपासून ते जेष्ठ व्यक्ती पर्यंत त्यांनी निष्ठेने केलेले काम, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद देत गेल .त्यामुळेच त्यांनी लहान ते जेष्ठ असा संवाद यशस्वी करत त्यांच्या जीवनाला आधार , समृद्ध करण्याचे काम केले .मेघना बोर्डीकर यांचे पती हे पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ,दुसऱ्यांदा निवडून आलेल्या बोर्डीकर यांना प्रभावी कामामुळे यावेळी मंत्रिपद मिळ्ण्याची शक्यता आहे.
उमेदवारांचे नाव | मिळालेले मताधिक्य | पक्ष |
मेघना बोर्डीकर (विजयी) | ११३४३२ | भाजप |
विजय भांबळे | १०८९१६ | राष्ट्रवादी (शरद पवार) |
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -४५१६ |
६.मोनिका राजळे -पाथर्डी शेवगाव ,अहिल्यानगर
पाथर्डी शेवगाव मात्दारांघातून सलग तीन वेळेस निवडून येण्याचा पराक्रम करणाऱ्या मोनिका राजळे यांना राजकीय बाल हे घरातूनच मिळाले होते त्यांचे सासरे आप्पासाहेब राजळे येथून आमदार राहिले होते ,तसेच त्यांचे पती अतिशय हुशार व्यक्तिमत्व राहिलेले राजीव राजळे हेही येथून आमदार राहिले होते. त्यांच्या पश्चात हा गड कायम राजळे कुटुंबाकडे राहिला आहे ,तिन्ही वेळी चांगल्या मताधिक्याने मोनिका राजळे निवडून आलेल्या आहेत .इथे कायमच राजळे विरुद्ध ढाकणे हा सामना पहायला मिळत असतो ,यात बर्यच वेळी राजळे यांनीच बाजी मारलेली आपण सर्वांनी पहिले आहे याही वेळी त्यांनी प्रताप ढाकणे यांचा पराभव करत maharashtra vidhansabha 2024 तिसऱ्यांदा जाण्याचा बहिमान मिळवला आहे ,त्याही महिलामधून मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत
उमेदवारांचे नाव | मिळालेले मताधिक्य | पक्ष |
मोनिका राजळे (विजयी) | ९९७७५ | भाजप |
प्रताप ढाकणे | ८०७३२ | राष्ट्रवादी (शरद पवार) |
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -१९०४३ |
७.अदिती तटकरे -श्रीवर्धन रायगड
रायगड मतदार संघ अन तटकरे हे जणु काही वर्षापासून समीकरणच झाले आहे .सुनील तटकरे यांचा हा मतदारसंघ .सुनील तटकरे हे २०१९ ,२०२४ मध्ये खासदार झाल्यावर त्या ठिकाणची जागा त्यांच्या मुलीने लढवली विधानसभा २०१९ मध्ये निवडून आलेल्या अदिती तटकरे पुढे ठकारे सरकारच्या आकळत मंत्री झाल्या ,नंतर २०२२ ते २०२४ शिंदे सरकार आल्यावर पुन्हा मंत्री झाल्या ,आताही विधानसभा २०२४ मध्ये एक सक्षम आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते ,म्हणून त्यांना याही मंत्रीपदाची संधी राष्ट्रवादी पक्षाकडून १००% मिळेलच अशी दाट शक्यता आहे .मागील वेळी maharashtra vidhansabha मध्ये महिला व बालकल्याण मंत्री म्हणून यशस्वी कारभार त्यांनी पाहिला होता .
उमेदवारांचे नाव | मिळालेले मताधिक्य | पक्ष |
अदिती तटकरे (विजयी ) | ११६०५० | राष्ट्रवादी (अजित पवार ) |
अनिल नवघणे | ३३२५२ | राष्ट्रवादी (शरद पवार) |
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -८२७९८ |
८. स्नेहा पंडित -वसई विरार पालघर
महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीच्या दिवसांपर्यंत चर्चेत राहिलेला हा मतदारसंघ .इथे कित्येक दशक ठाकूर कुटुंबाची एकहाती सत्ता होती ,बहुजन विकास पक्षाच्या माध्यामतून त्यांनी या भागात आपले एकहाती वर्चस्व ठेवले हितेंद्र ठाकूर सोबत त्यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर हे दोघेही बापलेक २०१९ मध्ये निवडून आले होते , पण यावेळी वसई विरार मधुन मतदार संघातून जोरदार तयारी केलेल्या स्नेहा पंडित यांना भाजपने उमेदवारी दिली . कित्येक वर्षाची ठाकूर यांच्या सत्तेला सुरुंग लावत maharashtra vidhansabha 2024 साठी येथून स्नेहा पंडित विजयी झाल्या .
उमेदवारांचे नाव | मिळालेले मताधिक्य | पक्ष |
स्नेहा पंडित (विजयी) | ७७५५३ | भाजप |
हितेंद्र ठाकूर | ७४४०० | बहुजन विकास पक्ष |
विजय पाटील | ६२३२४ | कॉंग्रेस |
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -३१५३ |
९.मंदा म्हात्रे -बेलापूर नवी मुंबई
Maharashtra Vidhansabha 2024 मध्ये अतिशय संवेदनशील असलेला हा मतदारसंघ ,इथे कायमच म्ह्नात्रे -नाईक हा संघर्ष पहायला मिळत असतो अतितटीच्या झालेल्या या निवडणुकीत मंदा म्हात्रे यांनी पुन्हा एकदा बाजी मारत आपले वर्चस्व याठिकाणी प्रस्थापित केले .अचानक बंडखोरी करत संदीप नाईक हे बेलापूर मधून उभे राहिले ,सहज सोप्पी वाटणारी निवडणूक म्हात्रे यांना नाईक यांच्यामुळे अवघड झाली होती.दुरंगी असणारी निवडणूक मनसे मुले चौरंगी झाली ओटी ,पण तरीही थोड्या मताने मंदा म्हात्रे यांनी बाजी मारली ,तीन वेळेस विधानसभा जिंकलेल्या मंदा म्हात्रे याही नवीन सरकारमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
उमेदवारांचे नाव | मिळालेले मताधिक्य | पक्ष |
मंदा म्हात्रे (विजयी) | ९१८५२ | भाजप |
संदीप नाईक | ९१४७५ | राष्ट्रवादी (शरद पवार ) |
विजय नाहटा | १९६४६ | अपक्ष |
गजानन काळे | १७७०४ | मनसे |
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -३७७ |
१०.मंजुळा गावित – साक्री धुळे
मंजुळा तुळशीराम गावित हे विधानसभा २०१९ मध्ये अपक्ष निवडून आलेल्या आमदार होत्या ,निवडून आल्यानंतर त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठींबा दिला होता , ५० आमदारांच्या उठावावेळी त्याही इतर आमदारांसोबत होत्या .चांगला जनसंपर्क असणाऱ्या गावित यांना एकनाथ शिंदे यांनी maharashtra vidhansabha 2024 साठी शिवसेना पक्षाची उमेदवारी दिली .त्यांही शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवत पुन्हा एकदा बाजी मारत सलग दुसऱ्यांदा विधानसभेत जाण्याचा बहुमान मिळवला आहे .
उमेदवारांचे नाव | मिळालेले मताधिक्य | पक्ष |
मंजुळा गावित (विजयी) | १०४६४९ | शिवसेना (एकनाथ शिंदे ) |
प्रवीण चौरे | ९७८२८ | कॉंग्रेस |
विजयी उमेदवारांचे मताधिक्य -५५८४ |
इतर विजयी उमेदवारांचे निकाल पाण्य्साठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा
इतर शासकीय योजनांच्या माहितीसाठी खालील संकेतस्थळावर क्लिक करावे
विधानसभा २०२४ तरुण ८ आमदार | https://shorturl.at/nEkVL |
लाडकी बहिण योजना २०२५ | https://smartsahyadri.com/mukhyamantri-mazi-ladki-bahin-yojna-2024/ |
महिलांसाठी ६ योजना | https://shorturl.at/sYbKR |
PM Kisan योजना | https://shorturl.at/edLoj |
आयुषमान भारत योजना | https://shorturl.at/jRPsY |
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | https://shorturl.at/niZP9 |
आमचे अधिकृत संकेतस्थळ | https://smartsahyadri.com/ |